अब भी एक उम्र पे जीने का न अंदाज आया । ज़िंदगी छोड दे पीछा मेरा, मै बाज़ आया ।।
Wednesday, June 29, 2011
का पण का ?
संत म्हणती क्षण मोहाचा टाळा
मोह फार वाईट .
फारच वाईट.
आता वारकऱ्यांच्यासाठी बनवलेली ही अशी चमचमीत, रस्सेदार भाजी पाहिल्यावर ती एखाद्याचा विश्वामित्रच होणे स्वाभाविकच.
त्यात परत सेवाभावी वृतीने वारकऱ्यांची भोजनाची व्यवस्था करणाऱ्यांचा आग्रह. थोडेसे तरी जेवा.
पण
भरल्यापोटी घरी परतल्यावर ज्या काही शिव्यागाळी खायला लागल्या असत्या त्या ध्यानी घेता राजाभाऊंनी मनी निग्रह करुन स्वतःला या पासुन दुर ठेवले.
बायकोने केलाला जंगी बेत. त्याच भावनेने खास राजाभाऊंसाठी.खास वालाची खिचडी, काजुची भाजी.

Sunday, June 26, 2011
Monday, June 20, 2011
असतं एकेकाचं नशिब
मुंबई मधे जन्मलेल्या शेफ फॉईड कार्डोझ यांना America’s much-watched “Top Chef Masters” contest मधे USD 100,000 चे प्रथम पारितोषक मिळाले.
त्यांनी बनवलेला खाद्यपदार्थ होता
"उपमा"
तिने बनवलेला खाद्यपदार्थ होता
"उपमा"
तोच उपमा मस्तपैकी खोबरेबिबरे पेरलेला.
तिलासुद्धा बक्षिस मिळाले.
राजाभाऊंनी आणि तिच्या मुला कडुन.
" तुला कळत कसं नाही ?
तुला दुसरे काय बनवता येत नाही ?
तुला माहिती नाही आम्हाला उपमा आवडत नाही ते ?
जगात एवढ्या डिश असतांना तुला काय फक्त उपमाच बनवता येतो ?
दुसरे काय बनवायला शिकवले नाही काय ? इ.इ,इ, "
झक मारले आणि आपण ह्यांच्या साठी नास्ता बनवतो असे नक्कीच तिला वाटले असणार ?

Wednesday, June 15, 2011
Tuesday, June 14, 2011
अलिखित - सचिन कुंडलकर
काही काही वाक्य बराच काळ लक्षात रहातात.
सारे चर्चेचे गुर्हाळ जे साध्य करु शकले नसते ते सचिन कुंडलकरांच्या एका वाक्याने साध्य व्हावे आणि गहाण ठेवलेले डोके त्वरीत जागेवर यावे, भुरळ घातले गेलेले डोळे खाडकन उघडावेत.
" भगव्या वेशातील एका करोडपती योगगुरुंकडून देशाच्या अर्थव्यवस्थेच्या सुधारणा आपण समजुन घेणार असू, तर आपल्यात आणि मुल्ला-मौलावींच्या इशाऱ्याने चालणाऱ्या देशांमधे काहीही फरक उरणार नाही "
अतिथी डायनींग हॉल
केव्हा केव्हा सरकारला कठोर पावले उचलुन आपल्या अस्तिवाची जाणीव करुन द्यायला लागते. अगदी तसचं. केव्हा तरी राजाभाऊंना आपलेही स्वतंत्र अस्तित्व जाणवुन द्यायला लागते, मग सर्वांची पावले मुकाट्याने साधे, घरगुती जेवण जेवायला जाण्यासाठी वळु लागतात.
आणि हे "अतिथी डायनींग हॉल " मधले हे जेवण व त्यातला आमटीभात पाहिल्यावर कोणता मुलगा "मी जेवणार नाही, मी उपाशी राहीलो तरी चालेल " हा बालहट्ट करत राहिल ?
( सरकारनेही ह्या पासुन काही तरी शिकावे. कोणी आमरण उपोषणाला बसला रे बसला की त्याच्यासमोर गरमागरम, वाफाळलेला मऊसुत आमटीभात ठेवावा किंवा ठेवावा वरणभात सोबत गोडयालिंबाच्या लोणच्याची एखादी फोड आणि वरती घरगुती शुद्ध तुपाची धार सोडलेली.
काय कोणाची बिशाद आहे आपल्या हटवादी स्वभावाला चिकटुन रहाण्याची ? )
पुण्यामधे घर होण्याआधी "नंदनवन " मधे रहाणे आणि अतिथीत जेवणे. तेव्हा पटवर्धन हे डायनींग हॉल चालवत असतं. राजाभाऊंच्या बायकोच्या मते तेव्हा जेवणाची मजा काय और होती.
पटवर्धन आत्ता ते कुठे गेले आहेत देव जाणे. त्यांच्या नावाचा बोर्ड अलकासमोरील एका बंद दुकानावर दिसतो खरा.
चालतच राहते, ती चालतच राहते ....
जेव्हा राजाभाऊंनी हे फोटो काढले तेव्हा त्यांच्या नजर्रसमोर श्री. ४२० मधला नर्गीस व राजकपुरचा पावसातील् सीन होता.
पण तसे झाले नाही.
जेव्हा ही Suranga Date यांनी या फोटोवर रचलेली एक अप्रतिम कविता वाचली तेव्हा जाणवले की या प्रसंगाला आणखीही कंगोरे आहेत-
पायाखाली रखरखीत जमीन ,
काहीतरी उगवल्याचा भास देणारे गवत,
आणि आई पृथ्वी,
निळ्या आभाळाच्या छत्राखाली
थोडा गारवा अनुभवत
संथ पायपीट करते ....
घरातला मिळवता सूर्य
तिला त्याच्या मागे मागे
आणि भोवताली फिरवतो ;
आयुष्यातले ऋतू बदलतात ,
कधी तो तळपतो ,
की कोणाला ग्रहण लागतं,
कधी तो तिचे श्रम ओळखून
ढगामागे तोंड लपवतो ....
पण ती
चालतच राहते, ती चालतच राहते ....
आणि आई पृथ्वी,
निळ्या आभाळाच्या छत्राखाली
थोडा गारवा अनुभवत
संथ पायपीट करते ....
घरातला मिळवता सूर्य
तिला त्याच्या मागे मागे
आणि भोवताली फिरवतो ;
आयुष्यातले ऋतू बदलतात ,
कधी तो तळपतो ,
की कोणाला ग्रहण लागतं,
कधी तो तिचे श्रम ओळखून
ढगामागे तोंड लपवतो ....
पण ती
चालतच राहते, ती चालतच राहते ....
Sunday, June 12, 2011
कॅफे बे लीफ - हॉलीडे इन - पुणॆ
आज राजाभाऊंनी सर्वात जास्त कोणती गोष्ट एन्जॉय केली असेल तर ती हे ग्रेट आर्टीस्ट ज्या नजाकतीने बुफेतील साऱ्या डेलीकेट पदार्थांची रचना करताहेत, मांड्णी करताहेत ही, त्यात विशेषता सॅलॅडस व डॆसर्ट्स ह्याची.
ह्या बल्लावाचार्यांची त्या क्षणासाठी तुलना करायचीच झाली तर ती तन्मयतेने चित्र रंगवणारा एखादा चित्रकार किंवा मुर्ती घडवतांना देहभान विसरलेला एखादा शिल्पकार.
हॉलीडॆ इन.
दुपारचे पावणे बारा वाजलेले. अजुन नानाविध खाद्यपदार्थांनी सजलेले, नटलेले बुफे सुरु व्ह्यायला पाऊण तास आहे. ह्याच वेळी नेमके राजाभाऊंचे लक्ष ह्या साऱ्या कलावंतांवर गेले. मग काय त्यांची देहबोली, त्यांच्या हालचाली, त्यांचे निटनेटकेपणा, टापटीपपणा, प्रत्येक डिश नी दिश, प्रत्येक ग्लास लावतांना घेतली गेलेली काळजी. प्रत्येक गोष्टीतले perfection.
आजचे खाल्ले गेलेले खाद्यपदार्थ. (भीमाची कसम , हे सच आहे )
Cream of Asparagus Soup , सोबत नानाविध पाव.
Salads - Roasted Potato with Garlic mayonnaise , Pasta salad, Baby Corn & Tomato Salad , Garden Green Salads. with lot's n lot's of fruits.
Main course -
(Indian ) Makhamali Paneer ( Excellent ) , Dhoodi Channa , Aloo Capsicum. Mushroom Mutter
Western - Cajun Potato Wedges , Baked Corn and peas, Caponate, Herb tossed vegetables
Oriental - Black bean veg,
Staples - Biryani, Hakka Noodles.
Dal - Dal Makhani / Dal Tadka
Desserts - Creme caramel, Creme Brulee, Raising Pudding, Green Tea , Bevarian Cream , Mixed fruit pie, Chocolate cake slice, Fruit tart, Apricot Jelly, Banana Custard, Kiwi Parfait, Banana Mousse , Strawberry Tart, Caramel Cooler.
आता बास करत न खाल्लेले - सेमीया खीर आणि सुजी हलवा.
दर - रु.३५० + कर.

परमेश्वराची कृपा की चमत्कार
ही अशी माणसे द्रुतगती महामार्गावर अपघातात न सापडुन जिवंत रहातात, सुखरुपपणे इच्छीत स्थळी पोहोचतात हा एक चमत्कारच म्हणायचे.
पावसाळ्याचे दिवस. खंडाळा घाट. डावीकडॆ रस्तावर आलेले दगडधोंडे आणि लाल माती.
पावसाळ्याचे दिवस. खंडाळा घाट. डावीकडॆ रस्तावर आलेले दगडधोंडे आणि लाल माती.
कांचन - यवत जवळ
कांचन.
काय राजाभाऊ अगदी मणी"कांचन"योग जुळुन आला म्हणायचा.
छानसे खाद्यगृह. शाकाहारी. मस्त पावसाळी माहोल, रम्य संध्याकाळ, सुंदर अंतर्गत सजावट, अतिथ्यशील कर्मचारीवर्ग व स्वःत मालक. चविष्ट जेवण. सजवुन समोर आणलेले अन्न.
आतापर्यंत हे नजरेतुन सुटलेच कसे याचा राहुन राहुन विचार. किती वेळा आपण पुणॆ-सोलापुर हमरस्तावर प्रवास केलेला. अगदी भुकेल्या पोटी वहान हाकलेले, हायवेवर कुठे काय चांगले जेवायला मिळणारच नाही हा विचार करत.
भुलेश्वर वरुन परततांना स्नेहींनी हायवेवर एखाद्या धाब्यावर जेवु करत केलेली फर्माईश. राजाभाऊ त्या कल्पनेत फारसे उत्साही नसलेले. जेव्हा का त्यांनी "कांचन" मधे पाऊल ठेवले तेव्हा त्यांचा पुर्वग्रह मावळलेला.
यवत पासुन पुण्याला येतांना हे "कांचन " लागते. अगदी सायंकाळी मुद्दामुन पुण्याहुन येथे जेवायला जाण्यासाठी उत्तम ठिकाण. दुपारी मिळणारी महाराष्ट्रीय भोजनाची थाळी . सायंकाळ पर्यंत मिळणारे खाद्यपदार्थ. रात्री पंजाबी व चायनीज जेवण.
राजाभाऊ आणि त्यांच्या बायकोचे एकमत झाले. आयुष्यातील फार दुर्मिळ घटना. नाहीतर नवऱ्याला एखादी गोष्ट पसंद आली की त्याला नाक मुरडायचा हा यांच्या स्वभाव.
परत एखाद्या रात्री येथे जेवायला यायचेच यायचे, मुलाला घेवुन.
Thursday, June 09, 2011
Wednesday, June 08, 2011
एक नवे कारण
मुलाला चांगली नोकरी नाही.
मुलगा व्यसनी आहे,
मुलगा दिसायला चांगला नाही,
मुलगा अगदीच बावळट आहे.
मुलाची आई खाष्ट आहे
मुलाचे स्वःतचे घर नाही.
मुलावर पाठच्या बहिणींची जबाबदारी आहे.
आणि आता
मुलगा व्यसनी आहे,
मुलगा दिसायला चांगला नाही,
मुलगा अगदीच बावळट आहे.
मुलाची आई खाष्ट आहे
मुलाचे स्वःतचे घर नाही.
मुलावर पाठच्या बहिणींची जबाबदारी आहे.
आणि आता
Subscribe to:
Posts (Atom)