Thursday, June 04, 2009

वेटिंग फॉर गोदो

"आता पर्यंत काही मागीतले आहे काय मी तुझ्याकड़े , सांग मला । एक साधी इच्छा ती पण पुर्ण होत नाही ।"
राजाभाऊंच्या मुलाचे त्यांच्या कड़े बघून , आपल्या आईची नजर चुकवुन एक छद्मी हास्य. आनंदाच्या उकाळ्या नक्कीच फुटत असणार , आपल्या बापाला आता कितीचा खड्डा पडणार आहे याचा विचार करत।
तारुण्यात आणि त्या मस्तीत तिला " हजारों ख्वाहिशें ऐसी कि हर ख्वाहिश पे दम निकलेबहुत निकले मेरे अरमाँ, लेकिन फिर भी कम निकले " ऐकवले होते । आता ते तारुण्य नाही राहिली आणि ती मस्ती देखील
"आपण बरेच दिवस झाले नाटकाला गेलेलो नाही , तु मला कधीच नाटक बघायला घेवुन जात नाही । "
नक्कीच तिच्या मनात साहित्य संघात "तुम्ही म्हणाल तसे " पहायला जायचे असणार.
राजाभाऊं, राजाभाऊं, हाच मौका आहे, हिच वेळ आहे तिला धडा शिकावायची , परत नाटकाला जायचे नाव काढायची नाही ।
आणि राजाभाऊं तिला "वेटिंग फॉर गोदो " पहायला घेवुन गेले।
"फारच जड़ आणि अवघड नाटक होते ग, काही कळालेच नाही बघ , मला काय माहीत हे नाटक असे असेल म्हणुन , मला वाटलं, एवढे जगप्रसिद्ध नाटक आणि टॉम आल्टर मराठीतुन काम करत आहे तर ........ "
मानभावी , मानभावी पणा म्हणतात तो हाच काय ?
पण
" रात्री जेवायला घरी काहीही केलेले नाही , आज आपण "वे साइड इन " मधे जेवायला जाणार आहोत। "
तेव्हा।
या बायका आपल्या पेक्षा दोन पावले पुढे असतात हेच खरे ।

2 comments:

मन कस्तुरी रे.. said...

हरेक्रिश्नाजी,
कसे आहात? आजकाल ब्लॊगवर लिहीत नाही फारसे?
नवीन पुस्तकांचे वाचन चालू आहे की नाही?
मी सद्ध्या निशाणी डावा अंगठा वाचते आहे...फारच भारी पुस्तक आहे...
हे "निमोरी का बोरा है"...त्याचा अर्थ काय? फ़ार सुंदर शब्द वाटतात....

(वेटींग फ़ॊर गोदो..फारच बोअर आहे...)

HAREKRISHNAJI said...

मी विचार करत होतो , आपण आहात कुठे ? आयुष्य खुप कठिन होत चालले आहे , वेळ मिळणे अवघड झाले आहे आणि त्यात परत मुलगा computer घेवुन पुण्याला गेला आहे ।

कुमार गंधर्व रचित चैती भूप रागातील ही रचना आहे , चैत्रात नीमाला खुप सुरेख पालवी फुटते, तो निमोण्यानी (?) बहरून येतो । त्याला वर्णन केले आहे व यासारखे माझेही मन बहरू देत असा विचार मांडला आहे। शब्दशा अर्थ मला आत्ता आठवत नाहीय ।
सध्या मी अविनाश बिनीवाले यांचे "पूर्वांचल " वाचायला घेतले आहे । निशानी डावा अंगठा कोणाचे आहे ?
अधुन मधुन ब्लॉगला भेट देत रहावी