Saturday, June 20, 2009

लट उलझी सुलझा जा रे बालम आणि तात्या. तात्या अभ्यंकर

केव्हा केव्हा एखादे गाणे ऐकल्यानंतर ते आपल्याला ऐवढे झपाटुन टाकते, ते नुसते डोक्यात गरगरा, गरगरा फिरत रहाते, वाटते आपणही असे मुक्तहस्ते ते दिलखुलास , मनसोक्त गावे , अगदी जी भरके , पुरेपुर ते उपभोगावे, निदान बऱ्यापैकी ते गुणगुणावे, पण आपला भसाडा, अर्थहीन , कापरा आवाज आपली उपज, क्षमता लक्षात घेता ते कठीणच असते.

आज तात्या अभ्यंकर भेटले. आतापर्यंत ते त्यांच्या ब्लॉग वर तसे अधुन मधुन भेटत होते. खऱ्या अर्थाने भेटले असे काही अजुन म्हणता येणार नाही. पण भेटले. यु ट्युब वर त्यांनी सादर केलाला बिहाग रागावरचा कार्यक्रम पाहिला आणि. आता पर्यंत त्यांच्या ब्लॉग च्या प्रेमात पडलेले राजाभाऊ आता तात्यांच्या व्यक्तिमत्वाच्या प्रेमात पडले आहेत.

तात्या आप महान हो. तुसी ग्रेट हो. ( ही वाक्य आठवली कि त्या बरोबर अप्पुराजा चित्रपटातील तो पोलीस इंन्स्पेक्टर आणि त्याचे ते चमचे हवालदार, त्यांच्या चेहऱ्या वरचे ते ओथंबलेले भाव हमखास आठवतात )
बहार आली.
आता कधी एकदा तात्यांच्या कार्यक्रम प्रत्यक्षात ऐकतो किंवा त्यांना भेटतो असे झाले आहे.


3 comments:

Tatyaa.. said...

साहेब, मी आपला मनापासून आभारी आहे. माझ्यासारख्या लिंबुटिंबू गायकाबद्दल, सामान्य माणसाबद्दल आपण चार ओळी आपुलकीच्या, प्रेमाच्या लिहिल्यात याबद्दल मी आपला ऋणी आहे..

-- तात्या.

HAREKRISHNAJI said...

तात्या ,

आपल्याला कधीतरी भेटायचे आहे

भानस said...

लट उलझी सुलझा जा रे बालम...... अतिशय आवडते. हे वाचले अन आता दिवसभर यु ट्युब मधून मधून...... मजा आला.धन्यवाद.