Sunday, June 21, 2009

ऋतुराज


जलकणांनी भरलेले कृष्णमेघ

हे मिरवणुकीच्या अग्रभागीचे

मदमस्त गजराज आहेत,

विद्युत लतांच्या

पताका फडकत आहेत,

मेघगर्जनांचे नगारे वाजत आहेत,

चहुकडे तेज पसरत आहे,

असा कामीजनांचा आवडता

वर्षा

हे प्रिये

येत आहे

एकाद्या राजासारखा !

श्री. ज्ञानेश्वर कुलकर्णी यांनी अनुवादीत केलेले कालीदासाचे "ऋतुराज" मधुन साभार

1 comment:

भानस said...

अरे वा!! आता कालीदास भेटीला येत राहणार.....:)