Friday, June 26, 2009

आषाढाच्या दुसऱ्या दिवसे आणि मोती महाल

वांद्राला टर्नर रोड वर असलेले मोती महाल कधीतरी नजरेत भरले होते, केव्हातरी येथे जेवायला जायचे मनात धरले होते , पण जाणे काही होत नव्हते. मग अचानक योग जुळुन आला. रात्रीच्याला तेथे जेवायला जायचा. राजाभाऊंचे काका त्यांना घेवुन मोतीमहाल मधे जेवायला गेले.


सुरवातीला आम्ही क्रिस्पी भेंडी मागवली, पाताळ्शी भेंडी कापुन ती कुरकुरीत तळलेली. व्हे. कबाब नक्की कोणते मागवायचे या बाबतीत राजाभाऊंच्य मुलाचा चांगलाच गोंधळ माजला, त्या वर तोडगा म्हणुन त्याने मग सर्व मिक्स कबाब मागवले, ते ही चवीला चांगले होते. त्यातली ती लहानुशी तंदुरी, धुरकटलेली बटाटी, अहा, लाजबाब, ती त्यांनी आणखीन द्यायला हवी होती, भरमसाठ पनीरच्या ऐवजी


पण भाज्यांनी मात्र अंमळ निराशा केली. काश्मिरी दम आलु, लहानसे आलु, त्यात मस्तपैकी काहीतरी गोडुस भरलेले , पण एकंदरीत ही भाजी आणि त्या बरोबर मुलानी मागवलेली बहुदा पनीर मसाला चांगल्या पैकी सुकी होती, त्या मुळे खाणे जड जात होते, डाळ मागवायला पाहिजे होती.

मग पुढे आणखीन काही मागवायचा कंटाळा आला.

मग राजाभाऊंच्या बायकोला अचानक सांताकृझ मधल्या "गोकुळ" मधे मिळणारे श्रीखंड आठवले. मग काय ते आणायला वाटेत रस्तात थांबणे.

2 comments:

Mints! said...

mala vatale tumhi vegan aahat?

HAREKRISHNAJI said...

पनीर माझ्या मुलाने मागवले त्याच्या साठी. पण हल्ली मधेच कधीतरी माझा तोल सुटतो, निराशेपोटी आणि वैफल्याकारणे खाणे खाणे आणि खाणे. पण मी मांसाहारी नाही. परत संपुर्ण वेगन बनण्याचा प्रयत्न करत आहे