Monday, December 31, 2007

लालच बहुत बुरी बला है ! बचेंगे तो और भी खायेंगे !!














वजन कमी करायचा संकल्प नव्या साला साठी, आज त्याचे काय ? आजची रात्र हाण गणप्या हाण.

गुड बाय २००७

जाते हो तो जावो, हम भी यहां यादोंके सहारे जी लेंगे. गुड बाय २००७ , तु तुझ्या कालाविधीत मला जेवढा तळ दाखवलास तेवढेच त्या मधुन वर ही उचललेस. ज्या बद्द्ल मी तुझा फार आभारी आहे. केव्हातरी हे आयुष्यात घडायला हवेच, नाहीतर जीवनातील अमुल्य धडे शिकायला कसे काय मिळाले असते ?

मौजे गम से कोई न हो मायुस, जिंदग़ी डुबकर उभरती है ! नेहमी हे मी मला सांगत असे, खरच जिंदग़ी नेहमीच डुबकर उभरत असते, गरज असते ती आपण आपला तोल सावरण्याची, एगो न सांभाळण्याची, एक ना दो ना तीन , चार, कैक वेळा संधी दरवाजावर ठोकत असतांना देखील , आवाज न ऐकु येण्यासाठी कानात घातलेली बोटे आपणच बाहेर काढण्याची.
वर्ष सरता सरता अखेरीस का होईना पण ते जमले. बर ते जर जमले नसते तर होणाऱ्या परीणामाला सामोरे जाण्याची उमेद खरच शिल्लक राहीली होतीच असे नाही.

पण बर का २००७ , जाता जाता तु मला खरच खुप काही दिलेस, शिकवलस.

आता प्रतिक्षा २००८ ची.

येते नवे वर्ष सर्व बॉगर्स ना आनंदमयी, हसरे, ताणतणाव रहीत, जावो ही सदिच्छा.

Sunday, December 30, 2007

संकल्प २००८.

नवे वर्षे उजाडण्याचा दिवस जसजसा जवळ येवु लागते तस तसे या नव्या सालात आपण काय करायला हवे या साठी संकल्प केले जातात.

दरवर्षी प्रमाणेच यंदाचा संकल्प ही तोच. प्रामाणिक पणे तो पाळण्याचा ही दॄढनिश्चय हि तोच, तेवढाच प्रखर. ( फक्त त्याची अंमलबजावणी आजचा दिवस नको , उद्या पासुन करुया. )

भरपुर खर्च करायचे व त्याच बरोबर खुप बचत करायची.
कॅलरी भरपुर खर्च करायच्या, भलतेच वाढलेले वजन आटोक्यात आणायचे, पुर्वीसारखे सडपातळ व्हायचे , एकदम फीट , पैश्याची बचत करायची, वाढते खर्च आटोक्यात आणायचे हे प्रमुख संकल्प , मग त्याच बरोबर बायकोशी चांगले वागायचे , दर महिन्याला एकदातरी ट्रेक ला जायचेच जायचे, आकाशनिरीक्षणाला जायचे, शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमाला जायचे हे मग दुय्यम संकल्प.
पाहुया किती दिवस आठवणीत टिकतात ते हे विचार.

Traffic Jam


Bumper To Bumber Traffic Jam at Market Place , Mahabaleshwar

Traffic Jam



Bumper To Bumber Traffic Jam at Market Place , Mahabaleshwar

Saturday, December 29, 2007

राजकारण मोठे गहन हो

राजकारण मोठे अवघड हो . आपणच आपल्या विरुद्ध महाप्रचंड मोर्चा काढायचा म्हणाजे लई भारी काम.
अहो काय बोलता तरी काय ?
म्हणजे बघा, व्यक्ती एक भुमिका दोन, एक राजकारण्याची, दुसरी बिल्डरची. मग त्यातल्या राजकारण्यानी आपल्यातल्याच बिल्डर विरुद्ध मोर्चा ??

छे छे फारच कठीण , समजायला अवघडच.

रीसीका मिश्रा - कथ्थक - स्वामी हरीदास संगीत संमेलन



छलांग, हीच ती छलांग, झनक झनक पायल बाजे चित्रपट पाहिलेल्यांच्या सदैव स्मरणात राहिलेली, एका सीन मधे कथ्थक नॄत्य करीत असता गोपीकॄष्णांनी मारलेल्या त्या छलांगची परत एकदा आठवण करुन दिली ती रीसीका मिश्रा यांनी. ही कलावंत गोपीकॄष्ण यांच्या भाचीची मुलगी.

दोनच दिवसा पुर्वी रीसीका चा कार्यक्रम याच रंगमंचावर झाला होता, पण अत्यंत अवमानक परीस्थीतीत तिला तो सादर करायला लागला होता , आणि याला कारणीभुत होती तिचीच आजी, दस्तुरखुद्द द ग्रेट सीतारा देवी. काही जणांना आपण कोठे थांबावे हे कळात नाही, आपला जमाना केव्हाच संपला आहे हे कळत नाही, या मशहुर नर्तकी त्या पैकी एक. त्यांनी आपल्या नातीच्या कार्यक्रमाचा विनाकारण जीवघेणी प्रेमळ लुडुबुड करत सारा विचका करुन टाकला. गायला बसलेली आपली आई , स्टेज वर खुर्चीत ठाण मांडुन बसलेली, सतत सुचना देणारी . बेटा ये करके दिखाव, वो करो, ऐसा करो , वैसा करो, हमारे जमानेमे, सांगत गोंधळात गोंधळ करणारी आपली आजी व तबल्यावर साथसंगत करणाऱ्या पं. कालीनाथजी या तिहेरी कात्रीत सापडलेल्या रिसीकाने कसेबसे आपले नॄत्य संपवले. असा प्रसंग वैऱ्यावर ही न यावा.

या लहान मुलीला सितारादेवींनी अवघड व न येणारे नॄत्यप्रकार करायला लावले , एकीकडे आई व ती, जे काही सादर करायचे ते ठरवुन आलेल्या. सावळा गोंधळामधे सर्वच कठीण होत गेले.

मला वाटते, दोन दिवसांनी तिला परत संधी दिली गेली , पण जित्याची खोड ! या वेळी सुद्धा माफक प्रमाणात जे व्हायचे ते झाले. रस्सी जली मगर बल नही जला. परंतु आपला तोल न जावु देता रिसीका ने अप्रतीम कथ्थक नॄत्य सादर केले. मजा आली.

या मुलीचे भवितव्य खुप उज्ज्वल आहे, कथ्थक त्यांच्या रक्तात आहे, एक दिवस ही सर्वोत्तम नॄंत्यागना बनणार आहे.

तेव्हा माझ्या नातवंडांना सांगण्यासाठी माझ्या कडॆ सांगण्यासाठी काहीतरी असेल.

(ही माझी वैयक्तीक मते आहेत, कोणाचाही अपमान करण्याचा माझा हेतु नाही )

Thursday, December 27, 2007

बेनझीर भुट्टो


पाकिस्तानात आणखी एका राज्यकर्त्याचा बळी. हे बळी सत्र केव्हा थांबणार आहे व या देशात शांतता कधी नांदणार आहे अल्ला जाने.

काही खर नाही

खरच , राजकारण मोठे गहन हो ! नारायणअस्त्र सोडते कोण आणि गुढ्ग्याला बाशिंग बाधुन बसते कोण !

Wednesday, December 26, 2007

सखी आज कैसी ब्रीज मे धुम मचायी - नंदीनी अशोक - काव्यम बॅले - भरत नाट्यम

व्यवसाय व चटके


यांचा व्यवसाय व चटके मात्र रस्तावरुन जाणाऱ्या येणाऱ्यांना, गरमागरम चणे खाल्याने तोंडाला व अनवधाने तप्त कढईस हात लागल्यास.

नंदीनी अशोक - काव्यम बॅले - भरत नाट्यम


मौत अगर आनी है तो बस्स इसी वक्त आजा ये !
यांच्या अप्रतीम काव्यम बॅले - भरत नाट्यम नी स्वामी हरीदास संगीत संमेलन मधील नॄत्य पर्वाची अखेर झाली. आठ नर्तकींना रंगमंचावर आपले नृत्य सादर करताना पहाणॆ , बस्स बहुत हुवा, जी भर गया, आगे कुछ नही देखना .

कैसा है ये बंधन अनजाना !!

काय हो राजाभाऊ, राजकारण मोठे गहन असते का हो ?

आ ! आज अचानक राजकारण काय आहे काय ?
नाही हो, जरा मनात संभ्रम निर्माण झाला आहे, तुम्ही पुर्वी राजकारणात लुडबुड करत असायचेत , म्हणुन म्हटले शंकासमाधानासाठी आपल्याला विचारावे.

काय असे झाले तरी काय ?
अहो , आपले बॉगवाले आशिष चांदोरकर (http://ashishchandorkar.blogspot.com/) त्यांचा अंदाज या लोकांनी तीन जागांनी चुकवला न ! १२० चा त्यांचा अंदाज , एकदम सही होता, पण !
सरळ सरळ बोला ना , असे आडुन आडुन काय बोलता ?

नाही म्हणजे त्यांच्या विरुद्ध जोमाने निवडणुका लढवायच्या, त्यांच्या हमखास निवडुन येणाऱ्यां तीन उमेदवारांस पाडायचे, वर परत त्यांच्याच राज्याभिषेकाच्या वेळी त्यांच्याबरोबर व्यासपिठावर उभे राहुन त्यांची गळाभेट घ्यायची , येथे त्यांच्याशी मैत्री तेथे त्यांच्याच राज्यात त्यांच्याशीच लढत, म्हणजे जरा अतीच झाले नाही ?

नो कॉमेंट्स, तुम्हाला काय पण मला पण हे गणित नाही सुटायचे. त्या पेक्षा आपण दुसऱ्या कोणत्या विषयावर बोलुया ना.

सावधान गनिमाचा वेढा गडाला बसलाय


आदेश केवळ एक आदेश पुरेसा आहे , आपले कुलदैवताचे ,आई एकाविरेचे ,निवासस्थान असलेल्या कार्ला गडाला स्वच्छ, सुंदर, हिरवा, करण्यास , प्लास्टिक च्या विळख्यातुन सोडवण्यास, नारळाच्या शेब्यातुन सोडवण्यास, सारा परिसर कचरा मुक्त करण्यासाठी
बघवत नाही हो ही दुर्दशा , हजारो , लाखो भाविक येथे येतात , हार वेण्या, नारळ खरेदी करतात , प्लास्टिक च्या पिशव्या , सारा कचरा डोंगरा वरुन खाली लोटून मोक़ळे होतात, परिसराच्या साफसफायीचे नाव नाही, परत नैसर्गीक विधी करता योग्य त्या सोई नसल्यामुळे सर्व काही खुल्लमखुल्ला ।
कार्लाचे सर्वात मोठे दुर्दैव कोणते असेल तर या देवळाजवळील असलेल्या अद्वितिय बुद्धलेण्यांचे.
3rd to 2nd century B.C या काळात ती बांधली गेली. अश्या प्रकारची ती भारतातील एक्मेव लेणी असावीत. ना आम्हाला त्याची जाणीव ना महत्व.
अपूर्ण



Saturday, December 22, 2007

ब्लोग चे स्वरुप

मराठी ब्लोग चे स्वरूप हे फक्त कथा , कविता लिहिण्यापुरते मर्यादित असावे काय ? त्यात समाजात आपल्या अवतिभवती जे काय योग्य अयोग्य चालले असते त्याचे प्रतिबिंब पडायला हवे का



आपल्याला कायं
वाटते ?

Friday, December 21, 2007

अल्ला मालिक


अजब तेरी दुनिया । ज्या फकिराने आयुष्य साधेपणानी गुजारले, चिध्या बाधलेल्या लाकडी फळीवर पड्क्या मशिदित निद्रा केली , भिक्षा मागुन गुजारा केला , त्याच्या मूर्ति साठी दहा कोटी रुपये किमतीचे सुवर्णसिंहासन ??
वाहारे किस्मत , अजब तेरी दुनिया मेरे मालिक !!

देण्याराने दिले घेणारयाने घेतले , मला त्याचे काय ?
माझा जीव उगीचाचा हळहळतोय। या पैश्यात कितीतरी समाज उपयोगी काम झाली असती । एकीकडे साधी लस टोचायला पैसे नाहीत म्हणुन दोन मानवी जीव आपला प्राण गमावातात, शेकडो शेतकरी आत्महत्या करतात , अजूनही दरिद्री रेषेखाली करोडो लोक आहेत , एक वेळ जेवण हे देखील त्यांच्या साठी चैन आहे, हजारो बालके कुपोषण ग्रस्त आहेत।
या मानवातावादासाठी कधी या धनिकांच्या थैल्या रित्या होतांना दिसत नाहीत । हे सारे यांच्या स्वप्नात कधी येत नाही का ?

Tuesday, December 18, 2007

सरीता कालेले व सायली शेट्ये - कथ्थक - मुंबई

पि.बी.पल्लवी - हैद्राबाद- कुचीपुडी

डोळ्याचे पारणॆ फिटले.

स्वामी हरिदास संगीत संमेलन, दिवस - ४

गौरी भोपे - मुंबई
सरीता कालेले व सायली शेट्ये - मुंबई
मरामी मेधी - गुहाटी
पि.बी.पल्लवी - हैद्राबाद

जरा डोळे, कान उघडुन पहा, गुणी तरूण पिढी उद्याचा इतिहास घडवत आहे. अजुन किती आपण त्याच, त्याच आणि त्यांचेच ऐकुन, पाहुन स्वतःला धन्य समजणार आहोत ? किती काळ भुतकाळात रमणीय होणार आहोत ? हे सोनेरी क्षण चुकवु नकात.

अंगात ज्वर भिनत चालला आहे, जागेपणी काय पण झोपेतही ना धीं न ना धीं न ,

सुर सिंगार संसदेचे किती आभार मानावे तेवढे थोडे आहे केवळ त्यांच्याच मुळे हे होत आहे.


आजचे कलावंत.

Monday, December 17, 2007

रिसीका मिश्रा - कथ्थक - तिसरा दिवस - स्वामी हरीदास संगीत संमेलन.

Watch this young lady. Mark my words, One fine day this young highly talented , one of the finest artist, is going to be very very successful Kathak Dancer. I would say she is going to be "Rolls Royce of Kathak Dancers " .
She has earned and she really deserves such compliments. Inspite of all odds she has managed to survive and gave her best.



मराठी बॉग ऑफ द इयर

साधारणातहा वर्षे संपत आले की इवेंट ऑफ द इयर, परसन ऑफ द इयर, वगैरे वगैरे ठरवण्याचा शिरस्ता आहे. मग आपण मराठी बॉग ऑफ द इयर का बरे ठरवु नये ?

माझी पहिली पसंद

http://kasakaay.blogspot.com - पर्यावरण, मानवतावादा साठी अणि http://tulipsintwilight.blogspot.com - सर्वोकॄष्ट लेखनासाठी .

Fight Against Global Warming

Mumbai pulls the plug, almost ???????

Sunday, December 16, 2007

सुहाग नलीनी दास - माहीरी नॄत्य

या नावाचा नॄत्य प्रकार आहे हे आजच कळाले

राजश्री शिर्के आणि शिष्या

असा प्रयोग कधी पाहीलाच नव्हता

अपुर्वा वडके -मुंबई = कथ्थक -

लाजबाब

अपुर्वा वडके -मुंबई = कथ्थक -

लाजबाब

अरुनीका कुमार -नवी दिल्ली - कुचीपुडी

Brillant performance by highly qualified artist from New Delhi

राजश्री शिर्के , अरुनिमा कुमार आणि सुहाग नलिनी दास




अनुज मिश्रा

नज़र नवाज़ अनुज.

श्री देबासीश पटनाइक

ग्रेसफुल

स्म्रिती मिश्रा व अमरसिंन्घा धनुजा

आकाशातुन धरतीचा वेध घेणाऱ्या, कोसळणाऱ्या विद्युलतेने ही लाजावे.

स्वामी हरीदास संगीत संमेलन

"मला संगीत कळते पण वळत नाही". कट्यार काळजात घुसली या नाटकातील विदुषकाची ही खंत.
मग मी कशाकशाची खंत करु ? मला तर वळतही नाही आणि कळत ही नाही. काल स्वामी हरीदास संगीत संमेलनाच्या पहील्या दिवशी हि भावना फार प्रबळ होती. दोष असला तर माझाच. मीच त्या साठी काहीच प्रयत्न केले नाहीत. पण हे वैगुण्य कलेचा आस्वाद घेताना आड येवु नये म्हणजे पुरे. नाहीतर मला त्यातले काय कळते करुन कार्यक्रमला जाणेच झाले नाही तर जीवनातील अलौकीक अनुभुतीस मी मुकलेलो असीन.

कालच्या सत्रात सर्व प्रथम श्री देबासीश पटनाइक यांचे ओडीसी नॄत्य झाले त्यानंतर स्म्रिती मिश्रा व अमरसिंन्घा धनुजा यांचे कथ्थक , श्रीमती गीता राधाकॄष्णन यांचे मोहीनी अट्ट्म, अनुज मिश्रा यांचे कथ्थक, ऐश्वर्या राजगोपाल यांचे भरत नाट्यम, पं.कृष्णमोहन मिश्रा यांचे कथ्थक झाले.

Saturday, December 15, 2007

If you can afford to and dare to wear




Once Busybee had said in one of his article " If you can afford to and dare to wear "


How true.

बुद्धीबळ

विजयाचा क्षण जवळ आला असतांना त्यात कोठेतरी एका बेसावधपणी पराभवाचा क्षण दडलेला असतो. बऱ्याच वेळा बुद्धीबळ खेळतांना याची प्रचीती येते. विजय जसा जसा जवळ येत जातो, द्रुष्टीक्षेपात येत रहातो, तसे तसे सावध मन सैलावत जाते, मग आतापर्यंत दडुन राहीलेला पराभवाचे भुत अचानक समोर येते.

बुद्धीबळ मग ते पटावरचे असो का राजकारणातील असो. .

देव

आज सकाळी उठल्याबरोबर जर पहिला विचार मनामधे कोणता आला असेल , कोणाची आठवण आली असेल तर ती "त्या" व्यक्तीची, ज्यानी, मी गेले काही वर्षे नैराश्याच्या भरात वाईट व विचित्र वागत असुन सुद्धा , माझ्या मुळे त्यांना त्रास होत असुन सुद्धा , माझी मनस्थीती लक्षात घेवुन मला नुसतेच सांभाळून घेतले नाही तर त्या अवस्थेतुन बाहेर ही काढले. परत नुसतेच बाहेर काढले नाही माझे भले ही केले, उध्वस्त होण्यावाचुन वाचवले.

आणखीन एका दुसऱ्या व्यक्तीची, ज्यानी मला माझा गमावलेला आत्मविश्वास मला परत मिळवुन दिला, आपल्या अतिशय चांगल्या वागणुकीतुन.

जीवनाच्या अनेक टप्पावर आपणास जेव्हा जेव्हा हे असे देव भेटतात तेव्हा आपण एका कडयाच्या टोकाला जावुनही, सुखरुपपणे माघारी पोहोचलेलो असतो.

Friday, December 14, 2007

जब जब फुल खिले तुम्हे याद किया हमने

जब जब फुल खिले तुम्हे याद किया हमने
मिलने के है लाख बहाने लेकीन मन का मीत ना माने
दिल तोडा हर बार मेरे भोले हमदमने

गुजरात निवडणुक

गुजरात निवडणुक - भुकेपेक्षा भयाला जास्त महत्व.

सिद्धु गुरुजींचे लाफ्टर शोज - हास्य निर्माण करायचे हास्यास्पद प्रयत्न .

Thursday, December 13, 2007

अतिथी देवो भवः



त्यांनी मागीतेले दाणापाणी आम्ही पाहुण्यांना दिली गोळी , बंदुकीची गोळी.
उरणमधील चार फ्लेमिंगोच्या रविवारी झालेल्या शिकारीबाबत न्हावा-शेवा पोलिसांनी बुधवारी एफआयआर दाखल केल्यानंतर पोलिसांनी नेरुळजवळील करावे गावातील तानाजी रामकृष्ण तांडेल (५२) आणि ऐरोलीचा सुजीत सजेर्राव पाटील (३२) यांना दुपारी अटक केली. पक्षीनिरीक्षणासाठी पनवेलमधील निसर्गप्रेमी सुदीप आठवले व निखिल भोपळे रविवारी न्हावा-शेवा पोलिस ठाण्याजवळील पाणथळावर आले असताना त्यांना एक बंदूकधारी फ्लेमिंगोंची शिकार करताना दिसला.

Wednesday, December 12, 2007

ते रुपये गेले कोठे ?

विक्रमा आज तु माझ्या प्रश्नाचे उत्तर देवु नकोस, जा मी तुला सुट दिली, वेताळ वदला.
विक्रम संशयाने वेताळाकडे पाहु लागला, कारण कोणी काही सुट देतो म्हटले की त्यात काही तरी खोट असणार हे नक्कीच. (* * Conditions Apply )
वेताळा मग आपला मार्गक्रमण करतांना वेळ कसा काय जाणार ?
अरे विक्रमा, आज तु माझ्या नव्हे तर भारताच्या पंतप्रधानांनी विचारलेल्या प्रश्नाचा जबाब द्यावा असे मला वाटते.
विक्रमाचे धाबे दणाणले. वेताळाला हाताळाणे सोपे आहे पण ? असा कोणता अवघड प्रश्न आपल्या पंतप्रधानाने विचारला आहे ? तो बुचकळ्यात पडला.

"आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रासाठी केंद्र सरकारने राज्याला कोट्यावधी रुपये दिले. मात्र त्यातून राज्याचा विकास झालच नाही, ते रुपये गेले कोठे ?

विक्रमाने सवाल ऐकुन सुटकेचा निश्वास टाकला.

बा वेताळा, असला कसला रे सोपा सवाल विचारलास ? याचे उत्तर तर लहान पोरालाही ठावुक आहे. मग ते विचारणाऱ्याला ठावुक नसेल असे तुला प्रामाणिकपणॆ वाटते ? राज्याचा विकास होवो ना होवो, लाभार्थींचा विकास झाला न बास झाले. आणि मी असे ऐकले की तुझ्या पिंपळाच्या झाडाभवती यातुन बसण्यासाठी, सुशोभीकरणासाठी " पार " , "लादीकरण, वगैरे

विक्रमा, तु बोललास आणि मी हा चाललो.

स्वामी हरीदास संगीत संमेलन

स्वामी हरीदास संगीत संमेलन मुंबईत १५ डिसेंबर पासुन सुरु होते आहे. सवाई गंधर्व संगीत महोत्सव, गुणीदास संमेलन आदी संगीत महोत्सव खुप गाजतात, पण स्वामी हरीदास संगीत संमेलन, कल के कलाकार संगीत संमेलन सारखे कार्यक्रम उपेक्षीत रहातात याची फार खंत वाटते. केवळ संपुर्ण भारतातील अनेक शहरातुनच नव्हे तर परदेशातील तरुण कलावंत या येथे आपला कार्यक्रम करण्यासाठी येत असतात.


स्वामी हरीदास संगीत संमेलनात अनेक नामावंत कलाकार ही भाग घेत आहेत.


१५ डिसेंबर ते १९ डिसेंबर - ओडीसी, कथ्थक, मोहीनी अट्ट्म, भरत नाट्यम, कुचीपुडी, आदी नुत्य प्रकार
२० ते २४ डिसेंबर - शास्त्रीय गायन व वादन (सरोद, तबला, गिटार, व्हायोलीन, पखावाज्, सतार )

रोज संध्याकाळी ६ वाजता, रोज जवळ जवळ ६ कलाकार, आयोजक - सुर सिंगार संसद,
स्थळ - विद्यापिठ विध्यार्थी भवन , बी रोड, चर्चगेट, मुंबई.

माझा एक सहकारी नेहमीच उशीरा उशीरा पर्यंत कार्यालयात काम करीत बसायचा, मी त्याला नेहमी गमतीने म्हणायचो, अरे बाबा, लवकर घरी जात जा, नाहीतर तुझी मुले तुला काका म्हणु लागतील व तुझ्या शेजाऱ्याला बाबा. या संमेलनामुळे माझ्यावर ही वेळ येवु नये.

उमेदवारीची घोषणा

अखेरीस श्री. लालकॄष्ण अडवाणीजी हे भाजपाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार असल्याची घोषणा झाली. पण याच बरोबर श्री. अटल बिहारी बाजपैयी

डॉ.संगीता शंकर = व्हायोलीन वादन

Tuesday, December 11, 2007

थंडक

माणसाच्या जीवाला थंडक केव्हा बरे पोचत असेल ? पदासाठी त्याच्या नावाची घोषणा झाल्या वर की पत्ये

भुलभुलय्या मधील भुल

भुलभुलय्या या चित्रपटात शेवटला नाही का नायकाला मेल्याचे सोंग घ्यायला लावतात, त्याला एका फळीवर झोपवुन ती फळी नायीकेच्या समोर ढकलतात, तिच्या हातात नंगी तलवार, मग धुर करुन ती फळी खाली फिरवतात, नायक खालच्या भुयारातुन बाहेर पडतो, फळीच्या खालच्या भागावर एक पुतळा बांधलेला असतो, तो वर येतो, नायीका आपल्या हातातील तलवारीने त्या पुतळ्याच्या त्वेषाने राई राई येवढ्या चिंधड्या, चिंधड्या करते, तिला वाटते आपण राजाचाच वध केला, तिचा मानसीक रोग बरा होतो.

हीच ट्रिक फळी फिरवण्याची जादुगारही वापरतात.

पण हाच प्रयोग प्रत्यक्षात जर मानसतज्ञ, मानासीक उपचार करताना करायला लागले तर ? Duel Personality असणाऱ्याच्या हातात असे खरे शस्त्र द्यायला लागले तर ? किंवा अश्याच प्रकारचे धक्कादायक प्रयोग करायला लागले तर ?
रुग्णाला फरफटत आणुन तांत्रीका समोर जबरदस्तीने आणुन उभे करायचे , त्याने भुत उतरवण्याचे आपले प्रयोग करायचे, रुग्णाला वेताच्या फोकाने मारायचे, त्यच्या हातात तलवार देवुन तो ज्याचा द्वेष करतो त्याला समोर आणुन त्याचा खुन करायला रुग्णाला सांगायचे ?
हे असे उपचार ? डॉक्टर कडुन ?

चित्रपटात आपण काय मांडतो आहे याचे भान संबधीतांना हवे.
अनामीकाने लिहीलेल्या कॉमेंट्स ला माझे उत्तर.
"jaadooche prayog? yaat kuthale jaduche prayog dakhavale aahet? "

Monday, December 10, 2007

मी उतावळा नारद

निवांत पणा म्हणजे तरी किती ? काळ जणु थबकलाय . चहाचा प्याला हळुवार पणे उचलीत आपल्या ओठी लावत एक हल्कासा घोट घेत परत त्याच वेगाने मेजावर प्याला परत, काळ पुन्हा गोठला, एक लंबीसी पॉज. परत तीच क्रिया. वैशालीत एकच गॄहस्थ चार जणांचे टेबल अडवुन बसलेले. सकाळची वेळ. नेहमी प्रमाणॆच बऱ्या पैकी गर्दी, आम्ही ही सर्व भुकेले, नुकतेच मुंबईवरुन केवळ वैशालीत न्याहारीला जायचे म्हणुन न थांबता तडक पोहोचलेलो. त्या व्यक्तीस जगाशी काहीच देणेघेणे नाही , आपल्याच विश्वात गर्क. चला आता, राव साहेब आटपा आता लवकर, येवढे सुख उपभोगायचेच आहे तर पंचतारांकीत हॉटेलात जावे. उडप्या कडे काय काम ? खुप इतर जण खोळंबलेले आहेत, माझा भुकेल्या पोटी चरफराट. येथे उभे रहा , ही जागा रिकामी होत आहे, म्हणुन आम्ही तेथे जागा अडवुन प्रतिक्षेत. भरवश्याच्या म्हशीला टोणगा.

प्रसंग दुसरा. विमानातील गॅंग वे. साहेबांनी आपला सुट काढुन तो प्रवासात जपुन ठेवण्यासाठी हवाईसुंदरीच्या हाती दिला. अर्धा मिनीटाचेच हे काम असावे. पण मग सुचना सुरु, अनुभव कथन चालु. गेल्या खेपेच्या प्रवासात आलेला अनुभव तिला साग्रसंगीत सांगणॆ, तिच्या कडुन प्रत्येक खिसा तपासुन घेणे, शायनींग शायनीग आणि शायनींग, आपल्या प्रभावी व्यक्तीमत्वाचा भक्ष्यावर एक प्रयोग. राव साहेब मागे रांग लागली आहे आम्ही सारेच जण आपापल्या आसनाकडे जाण्यासाठी ताटकळत उभे आहोत. आधीच विमान सुटायला चांगलाच उशीर झालाय. चला आता , आपले स्थान ग्रहण करा. मधेच एक शहाणे आपल्या मोबाईल वरुन घरच्यांची संभाषणात मग्न. पपा, मी विमानात शिरलो, आता जागेवर बसत आहे, साडे आठच्या सुमारास मुंबईस पोचीन, मग घरी येईन, इ.इ.इ. हवाईसुंदरीच्या मोबाईल बंद करा या सांगण्याकडॆ संपुर्ण दुर्लक्ष. भाऊसाहेब आपण किती महत्वाची व्यक्ती आहात. आता तरी सुचना पाळा.

घरी लवकर जाण्याची घाई. समोरच टॅक्सी उभी राहीली. आत एक तरुणी मोबाईल वर बोलण्यत तल्लीन, भाडे किती झाले माहीती करुन घ्यायची गरज नाही , एका हातात मोबाईल, सारे लक्ष बोलण्यात केंद्रीत, दुसरा हात पर्स मधे घालुन पैसे शोधण्याचा विफल प्रयत्न , पैसे काही सापडत नाहीत, बोलणे काही संपत नाही, मागचे गाडीधारकांचे कर्णॆ कोकलताहेत, मग ३०-३५ रुपयाच्या भाडे देणासाठी ५०० ची नोट , त्याच्या कडे स्वाभाविकपणे सुटे पैशे नाहीत, मग एका तोंडाने चालकाशी संभाषण, दुसऱ्या मुखाने मोबाईल वर. कसरत काही संपत नाही, मोबाईल काही सोडवत नाही.

मी उतावळा नारद का यांनाच दुसऱ्यांचे भान नाही ?

INS VIKRANT

The Beauty and The Beast




Surrounded by the rich architectural heritage, the ugly structure created in recent times looks odds. But who cares and who bothers ?

The figure on the high dome represents the Godess of Progress.

Is this called a progress ?

भुलभुल्लया

मानसिक रोग्यांवर उपचार करण्याचा एक मार्ग "भुलभुल्लया " या चित्रपटात दाखवला गेला आहे. त्याचा वैद्यकिय अभ्यासक्रमात समावेश केल्यास जगातील सर्व मानसीक रोग असणाऱ्यांना तसेच मानसोपचार तज्ञांना त्याचा चांगलाच लाभ होवु शकतो.

या मोठ्या विषयाला हात झालण्या प्रुर्वी दिर्दशकाने जरातरी विचार करायला हवा होता !

मानसिक रुग्णावर उपचार करण्यासाठी डॉक्टरने तांत्रिक मांत्रीकाची मदत घ्यावी ? रुग्णाच्या हातात तलवार देवुन जादुचे प्रयोग करावेत ?

नवल वाटते ते वैद्यकिय क्षेत्रातले या बाबत गप्प का आहेत ?

मी हे बोललोच नव्हतो

"मी हे बोललोच नव्हतो. माझ्या बोलण्याचा विपर्यास केला गेला आहे, त्याला चुकिचे संदर्भ लावण्यात आलेले आहेत. "
हे नंतर स्पष्टीकरण दिले की सर्वच आलबेल.
"मी जे काही बोललो तेच मला बोलायचे होते , आणि त्याचा तोच अर्थ आहे " असे कोणीच का बोलताना आढळुन येत नाही ?

उन्माद

एखाद्याला उन्माद चढलेला आपण पहात असतो, पण त्याचे फारसे आश्चर्य वाटत नाही कारण या ठिकाणी पोहोचण्यासाठी, पॉवरफुल होण्यासाठी त्याने बरेच काही केले असते, पचवले असते.
दुःख असते ते आपण विवेक शुन्य झाल्याचे, त्याचा कॄत्याचे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष समर्थन केल्याचे किंवा त्या प्रवृत्तीला विरोध न केल्याचे, आपल्या मुक संमतीचे, त्याने उभारलेल्या मायावी तत्वज्ञानात गुंगुन जाण्याचे.

Thursday, December 06, 2007

कानउघडणी

बस्स ऐवढेच ? केवळ कानउघडणीवर सुटका ? निर्दोष वाघीणीला तब्बल ३९ गोळ्या झाडून ठार मारल्या बद्द्ल ? काय पण अज्ञानाची किंमत ? ताशेरे आणि खुलासे ? वन्य प्राण्यांना केवळ फोटोत बघण्याची वेळ आल्या नंतर ही ?
धन्य ते वनखाते धन्य ते वनमंत्री.
महाराष्ट्र टाईम्स मधुन -
प्राण्यांना गुंगी आणणाऱ्या बंदुका कमी, * कर्मचाऱ्यांचीही वानवाच - संजय व्हनमाने, मुंबई वन्यप्राण्यांचे संरक्षण करा, अशी हाकाटी करणाऱ्या वन विभागाकडे संरक्षित वनक्षेत्राबाहेर आलेल्या प्राण्यांना बेशुद्ध करून पुन्हा जंगलात सहीसलामत सोडण्यासाठी प्रशिक्षित अधिकारी-कर्मचारी तसेच या कारवाईसाठी आवश्यक बंदुका यांची मोठी कमतरता असल्याचे समजते. सुमारे शंभर प्रशिक्षित अधिकारी-कर्मचाऱ्यांची आवश्यकता असताना जेमतेम दोन ते तीनच अधिकारी असल्यानेच चंदपूर जिल्ह्यातील ब्रह्मापुरीत वाघाचा बळी गेला, असे वनखात्यातच बोलले जात आहे. ब्रह्मापुरीत एका नरभक्षक वाघाने चार जणांचा बळी घेतल्याने गावकऱ्यांमध्ये असंतोष होता. लोकक्षोभ लक्षात घेऊन नरभक्षक वाघाला मारण्याचा निर्णय झाला; पण दिसलेला वाघ नरभक्षकच असल्याचे समजून तब्बल ३९ गोळ्या झाडून त्याला ठार मारण्यात आले. तो वाघ नरभक्षक नव्हताच! वाघ वा अन्य प्राण्यांना बेशुद्ध करण्यासाठीच्या विशिष्ट बंदुका वन विभागाकडे नसल्याने हा प्रकार झाल्याची माहिती पुढे आली आहे. प्राण्यांना गुंगी आल्यानंतर त्याच्यावर योग्य ते उपचार करुन पुन्हा जंगलात सोडले जाते. मात्र असे तंत्र अवगत असलेले जेमतेम दोन ते तीनच अधिकारी वन विभागाकडे सध्या आहेत. अधिकारी व कर्मचारी यांच्या अज्ञानातून विनाकारण एक वाघ मारला गेला याबद्दल वनमंत्री बबनराव पाचपुते यांनी त्यांची कानउघडणी केली आहे. राज्यात संरक्षित वनक्षेत्राबाहेर वन्यप्राण्यांची अवस्था दयनीय असल्याचे ताशेरे त्यांनी या पत्रात मारले आहेत. राज्यातील काही धाब्यांवर वन्यप्राण्यांचे मांस खायला मिळत असल्याच्या तक्रारी आल्या असून त्याबद्दलही त्यांनी अधिकाऱ्यांकडून खुलासे मागवले आहेत.

Wednesday, December 05, 2007

आज रामशास्त्री हवे होते.

शाब्बास, भले बहादुर, शाब्बास , शर्तीने वाघ मारलात, फार मर्दुमुखी केलीत, मोठे शौर्य गाजवलेत, आपला जीव धोक्यात घालुन एका निरपराध वाघीणीला मारलेत. आता माहीती पडले, मारले गेलेले श्वापद भलतेच होते, नरभक्षक नव्हते.

मग बिघडले कोठे ? पुराण काळात पांडवांनी खांडव वन नाही का जाळले ? त्यातल्या सर्व पशुपक्षांना नाही का यमसदनी पाठवले, परीक्षीताने नाही का सर्पयज्ञ आयोजीत करुन समस्त सर्प कुळाचा वंशविच्छेद केला ? मानव जातीची कुरापत काढणाऱ्या वाघ्र कुळास अशी जीवघेणी सजा होणे जरुरीचे होते. आपण समस्त मानवसमाजाचे रक्षण केले आहेत.

लानत आहे, शरम वाटते, या निरपराध वाघीणीस अती उत्साहाच्या भरात, मागचा पुढचा विचार न करता मारणाऱ्या विचारहीन ,संवेदनाशुन्य माणसांचा, त्यांच्या विचारसरणीचा, त्यांच्या कृत्याचा.

या बेजबाबदार कृत्यात जे जे कोणी प्रत्यक्षपणे, अप्रत्यक्षरित्या जबाबदार असतील , या वधास जे जे कारणीभुत असतील, ज्यांनी ज्यांनी दबाब आणला असेल, प्रवॄत केले असेल त्यांच्या, त्यांच्या वर तत्काळ अटक करुन वन्यप्राण्यांच्या हत्येसंबधी असणाऱ्या सर्व कायदे कलामा नुसार खटले चालवुन त्यांना योग्य त्या शिक्षा झाल्याच पाहीजेत.
आज रामशास्त्री हवे होते.
सकाळ चा अग्रलेख - (खालील प्रमाणॆ )
बेपर्वाईचा मूक बळी!जंगलाची शान असलेल्या वाघांना वाचविण्यासाठी जगभरातील प्राणिप्रेमी, निसर्गवादी करीत असलेला आक्रोश महाराष्ट्राच्या वन खात्याच्या बंद कानांवर गेलेला नसावा. चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्‍यात एका "नरभक्षक' वाघाला चार "शूटर'मार्फत गोळ्या घालून संपविण्याचे काम वन खात्याने नुकतेच पार पाडले. वन्य प्राण्यांच्या रक्षणासाठी असलेल्या या खात्याला प्राण्यांबद्दल किती प्रेम आणि आस्था आहे, हे यानिमित्ताने अधोरेखित झाले. ठार झालेला वाघ नरभक्षक होता की नाही, याची ठाम खात्रीही वन खाते देऊ शकत नाही. लोकांच्या म्हणण्यानुसार नरभक्षक वाघीण आहे. म्हणजे वन खात्याच्या कर्तबगारीमुळे निसर्गाच्या साखळीतील एक अनमोल जीव फुकाफुकी प्राणाला मुकला.

विनंती अर्ज

माननीय, मायबाप सरकारला माझी एक हात जोडुन नम्र विनंती, अर्ज करण्यास कारण की आमचे लाडके क्रिकेटपटु, तरुणांचे दैवत, भारतीय क्रिकेटसंघाचे प्रमुख आधारस्थंभ, जाहिरातीतील ठळक मॉडेल, श्रीयुत सचिन तेंडुलकर यांना त्यांची देय असलेलेली आयकराची एक कोटी सहासष्ट लाखाची थकबाकी, त्यांनी केलेली देशसेवा लक्षात घेता माफ करण्यात यावी.

कॄपया करुन त्यांना थकबाकी मासीक हप्तात भरायला लावली जावु नये, आमच्या पगारातुन परस्पर कापल्या गेलेल्या आयकरातुन आपण देशाचा खर्च चालवु शकाल याची मला खात्री आहे.

माझ्या या अर्जाचा आपण सहानभुतीने विचार कराल अशी मी आशा बाळगुन आहे.
कळावे,
लोभ असावा,
आपला नम्र,

Tuesday, December 04, 2007

स्मरणशक्ती ही शक्ती आहे का विस्मरण ही ताकद आहे ?

नको असलेल्या दुखःद्द आठवणी, कटु अनुभव लांबवर मनात खाली खोल कुठे तरी रेंगाळात रहातात, फार त्रास देतात .
स्मरणशक्ती ही शक्ती आहे का विस्मरण ही ताकद आहे ?
गोड, सुखद आठवणी लगेच विस्म्रुतीत जातात.
खरच, विस्मरण ही ताकद आहे ?

Monday, December 03, 2007

धोका कोणाला माणसाला की वाघाला ? वाघाने दयेचा अर्ज कोणाकडे करायचा?


चंद्रपूरमधील जंगलात नरभक्षक वाघाला अखेर संपविले
आणि हाच गुन्हा माणसाने केला तर ? आधी तो पकडला गेला पाहिजे. त्यात तो सामान्य माणुस असावा, नेताअभिनेता नसावा. मग त्या वर वर्षोनुवर्षे न्यायालयात खटला चालणार, यानेच तो खुन केला हे पुराव्यानिशी सिद्ध करावे लागणार, शिक्षा झाल्यावर तो वरच्या न्यायालयात अपिल करणार, मग त्या वरच्या, दरम्यानच्या काळात तो जामीनीवर बाहेर मोकळा असणार, कधी तो पुराव्याअभावी सुटणार, तर कधी त्याला संशयाचा फायदा मिळणार, तो पैसे मोजुन नामांकीत वकिलांच्या फौजाच्या फौजा आपल्या सहाय्याला नेमणार, ते कायद्याचा किस पाडत रहाणार, आरोपीला आपले ज्ञान व कौश्यल्य पणाला लावुन सोडवणार.

जर का त्याने केलेला गुन्हा सिद्ध झाला की मग त्याला जास्तीत जास्त जन्मठेपेची , सक्तमजुरीची शिक्षा होणार, तुरुंगात त्याला सर्व सुखसोयी मिळणार, त्याच्या मानसीक स्वास्थासाठी आर्ट ऑफ लिव्हींगचे वर्ग घेतले जाणार.

आणि त्यातुन यदाकदाचीत फाशीची सजा झालीच तर तो राष्टपतींकडे दयेचा अर्ज करणार, एखाद्याचे आयुष्य आपण का काढुन घ्यावे यावर मानवतावादी काथ्याकुट करत बसणार.

वाघाने दयेचा अर्ज कोणाकडे करायचा?

मानवाने त्याच्या जंगलात अतिक्रमण केले, निसर्गाचा तोल बिघडवुन टाकला, त्याचे नैसर्गीक भक्ष्य नष्ट केले, आपल्या सर्व मर्यादा ओलांडल्या, वाघाने मात्र सर्व नीतीनियम पाळावेत, अन्यथा, चार चार शुटर शिकारी त्याला घेरुन त्यावर बंदुकीच्या गोळ्यांचा वर्षाव करुन त्याला यमसदनी पाडणार, त्याच्या छातडावर पाय रोवुन आपले फोटो घेवुन ते दिवाणखाण्यात टांगणार, आपल्या मर्दुमुखीची, मर्दांनगीची निशाणी मिरवीत.

सकाळ - तळोधी नागभीड (जि. चंद्रपूर) ता. ३० - मागील दोन-तीन महिन्यांपासून नागभीड तालुक्‍यात धुमाकूळ घालणाऱ्या तीन नरभक्षी वाघांपैकी एका वाघाला आज सकाळी साडेआठ वाजता गोविंदपूरच्या जंगलात गोळ्या घालून ठार करण्यात आले. त्यामुळे तालुक्‍यातील नागरिकांनी सुस्कारा टाकला असला, तरी वन्यजीवप्रेमींमध्ये मोठी अस्वस्थता पसरली आहे......

वन्यजीवप्रेमी अस्वस्थ
वन्यजीवप्रेमींमध्ये मात्र या घटनेने प्रचंड अस्वस्थता पसरली आहे. "वाघ' या कादंबरीचे लेखक व वाघ अभ्यासक अतुल धामणकर यांनी या घटनेवर प्रचंड नाराजी व्यक्त करून, लोकांना भयमुक्त करण्याचा हा मार्ग नसल्याचे सांगितले. याच लोकांनी वाघांचे नैसर्गिक भक्ष्य मारून टाकले. प्रचंड शिकारी केल्या. यामुळे वाघांसाठी आता जंगलात खाद्यच उरले नाही. परिणामी वाघ गावात येऊ लागले. मात्र, त्यासाठी वाघाला मारणे हा उपाय होऊच शकत नाही. असे अनेक वाघ आता गावात येतच राहतील. त्यामुळे आणखी किती वाघ मारणार, असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला.
कोणॆ एके काळी आपल्या महाराष्ट्रात आपण किती पुरोगामी आहोत, सुधारणावादी आहोत, आम्ही जात पात मानत नाहीत याचा फार अभिमान असे, अनेक थोर विभुतींचा आम्ही वारसा सांगत असु,

पण आता आम्ही किती मागासलेले आहोत हे सांगायला लागले आहेत, आमचा O.B.C. मधे समावेश करा, आम्हाला या सर्व सरकारी सुखसोयी पुरवा.

वास्तविक पहाता २१ व्या शतकात सर्व बंधने गळुन पडायला हवी होती, मानव केवळ मानव म्हणुन ओळखला जायला हवा होता.

पण !
कोणॆ एके काळी आपल्या महाराष्ट्रात आपण किती पुरोगामी आहोत, सुधारणावादी आहोत, आम्ही जात पात मानत नाहीत याचा फार अभिमान असे, अनेक थोर विभुतींचा आम्ही वारसा सांगत असु,

पण आता आम्ही किती मा

कुणी तरी माझ्या बायकोला हे सांगा रे

दैवाला तो म्हणाला "हात'तिच्या!


त्याचा हसरा चेहरा पाहीला आणि मला माझा सदैव दुर्मुखलेला, रडका, त्रासीक चेहरा आठवला.

तुसी ग्रेट हो. संजय.

( डॉ. योगिनी रा. कुलकर्णी )
आकाशातील वीज कोसळावी तसा संजयला बावीस हजार व्होल्टचा झटका बसला. त्यात एक हात व दुसऱ्या हाताचा मनगटापासूनचा भाग गमवावा लागला. प्रचंड वेदना, अनेक शस्त्रक्रिया सहन करून संजय पुन्हा उभा राहिला आहे. कधीही हार मानायची नाही असे संजयने ठरवले आहे. आजच्या "जागतिक विकलांगता दिना'निमित्त आपणही दैवाला म्हणू या, हात्तिच्या एवढंच ना...!

सकाळ - ०३/१२/०७.

माउली सारे काही तुझ्या दर्शनासी रे

कधी कधी मला प्रश्न पडतो, या २१ व्या शतकात, दळणवळणाच्या सर्व सुखसोयी उपलब्ध असतांना देखील ही सारी माणसे अशी चालत चालत, मजल दरमजल करत, दिवस दिवस प्रवास का बरे करत रहातात ? केवळ आपले पुर्वज त्या काळी असा प्रवास करायचे म्हणुन ? यांच्या कडे येवढी फुरसत असते कशी ?
परत हे भाविक एक्प्रेस्स वे वर काय करत आहेत ? या रस्तावर माणसांना येण्यास बंदी आहे ना. त्यांच्या साठी व वहानचालकांसाठी हे धोकादायक आहे.


Friday, November 30, 2007

सौ. नेने काकुंची जादु चालेल काय ?


जाब मधले "१, २.३,४ ,तेरा करु गिन गिन के इंतजार, आजा पिया आयी बहार", आणि सैलाब मधील "हमको आपका है इंतजार कोई लेके आये प्यार " ची मजा या "आजा नचले " मधे नसावी बुवा.

बंगळुर हवाई अड्डा.

आमच्या कड पुण्यात सहा आसनी रिक्षात बसल र बसल की प्रवासी लगेचच चालकाच्या माग तगादा लावायला सुरवात करतात, अगदी रिक्षा पुर्ण भरायची असली तरी, बोंबाबोंब सुरु, "चला की राव , किती उशीर होतोय , किती कमवाल ? अजुन किती भरायचे आहेत ? किती भराल ? चला, चला, सुटा आता. देणार पाच रुपय , वर रुबाब काय ? वर परत चारच रुपये घेतात तुम्ही काय पाच मागता ?
हीच माणस, विमानात बसल्याबसल्या पायलटबाबाला सांगतात काय ? "बाबारे ६.२० ची वेळ, सात वाजायला आले निघतोयस ना ! घरी बायकामुले वाट बघत असतील . चल ना रे . उशीर होतोय ! "
आपला प्रवाशी बस वाला उगीचच इंजीन चालु करुन ठेवतो, वाटते आता निघेल , आता निघेल , मग तो जरा पुढे बस नेतो, चला, सुटला एकदांचा, परत थांबतो, मग इकडुन तिकडुन प्रवासी गोळा करत निघतो, आतले कावतात, विमानही तसेच, आपले या इथुन त्या तिथुन हवाईअड्डावर फिरव फिरव फिरवतात, वाटत, आली आता आपली धावपट्टी आली, आता उडेल, मग उडेल," देरी की लिये माफी चाहते है कंट्रोल टॉवर की अनुमती न मिलनेके कारण"
उडल रे एकदांचे. हुश्श. बस, ट्रक मागे घेताना कंडक्टर, क्लीनर, हे मागे उभे राहुन "आन देन आन देव करत, गाडी वर थपडा मारत, ड्रायव्हर ला इशारा देतात, तो ड्रायव्हर पण मुंडक काचेतुन बाहेर काढत गाडी मागे घेतो. विमान मागे घेतांना हवाईसुंदरी खाली उतरते काय ?
मग आपल खाण पिण, ऐवढ्याशा जागेत केवढी कसरत करायला लागते!
मुंबईला विमान टच झाल, लगेचच तुंबलेल्या गडयांनी आपापले मोबाईल बाहेर काडुन स्विच ऑन करायला सुरवात केले. आत्ताच प्लेन लॅड झाल ,तासाभरात पोचतो.
एवढा वेळ "स्टे कनेक्टेड " नाही म्हणाजे काय ? हाउ हॉरीबल !

Thursday, November 29, 2007

एक्प्रेस वे वर पुण्याला जाताना थांबण्यासाठी बहाणा - १


एक्प्रेस वे वर पुण्याला जाताना थांबण्यासाठी बहाणा - १ भगत ताराचंद आणि डाल फ्राय , मके की रोटी, मुंगडाल हलवा, आल्हाददायक रात्र, सुखद गारवा, ती आणि मी.

या या या गंमत जंमत

आमचा विश्वासघात झालाय ! चिंतन आणि मननवाले अध्यक्ष गरजले. तुम्ही दिलेला शब्द मोडलात.

मग हळुच म्हणाले वा ! मज्जा आली असा खेळ खेळायला. परत करतायना विश्वासघात ? अस काय करता, कराना, प्लीज, एकदाच. मग आपण निवडणुक, निवडणुक खेळु.
मग त्यांनी सरकार स्थापन केले. परत विश्वासघात करुन घेण्यासाठी.
पण त्यांना कुठे ठावुक होते कोणती ही गोष्ट एकटी, एकटी मिळत नाही. मग त्यात बॅक मॅजीक आले, जारण मारण आले. ( हे माझे मत नव्हे. सिंहासनावरुन पाय उतार झालेल्यांचे हे थोर विचार )
अंधश्रद्दावाल्यांनो ऐकता आहात ना ? आपली भारताची घटना याबाबत कात म्हणते ?

Wednesday, November 28, 2007

मनोहर मंगल कार्यालयात - खाण्यासाठी . लग्नासाठी नव्हे.


डामडौल नसलेले, फुकटचा भपका नसलेले, पोटाला सोसेल असे, तरी पण रुचकर, चविष्ट , स्वादिष्ट, अश्या उपहारगॄहाच्या शोधात असतांना अचानक नजर गेली बाहेर झळकणाऱ्या पाटॊ वर, "अंबाडयाची भाजी व भाकरी ". आत डोकावुन बघितले ते पुढच्यावेळी नक्की येण्याचा पोटाला वायदा करुनच. ( खर म्हणजे अंबाडयाची भाजी हा प्रकार माझ्यासाठी परकिय )
कार्यक्रम संपल्यानंतर तॄप्त मनाला तॄप्त पोटाची साथ हवी या योग्य विचारांती आम्ही पोहोचलो, मनोहर मंगल कार्यालयाच्या आवारात असलेल्या साध्या, सोप्या, सरळ, उपहारगृहात, सफेद वाटाणा उसळ -भाकरी व ओल्या कांद्याच्या पातीची भाजी-भाकर खाण्यासाठी व ब्रांम्हणी पद्धतिची आमटी ओरपण्यासाठी. येथे ठराविक वारी पिठलेभाकरी ही मिळते.
सोबत थालीपिठ , इ. पण मिळते. स्मॄतीने धोका दिला. इतर पदार्थ आठवत नाहीत.


पुर्ण चंद्रमा गगन बिराजे



त्रिपुरी पोर्णिमेचा चांद.
तु चंदा शितल कहलाता फिर क्यु मेरे अंग जलाता !
फुलसा कोमल बाण मदनका शुल बनके तनमे क्यु चुभ जाता !

वाहे गुरु वाहे गुरु सतनाम वाहे गुरु




Sunday, November 25, 2007

मस्त सुरमई शाम व रात्र



"आमच्या घरात अजूनही पुरुषप्रधान संस्कृति आहे,

ती राणी आहे आणि मी प्रधान "


प्रसाद शिरगावकर आपला कविता वाचनाचा कार्यक्रम करत होते, खुले घरकुल लौंन, नभीत पूर्ण बहरालेला त्रिपुरी पौर्णीमेचा चंन्द्र, हवेत सुखद हवाहवासा गारवा, मदहोशी धुंदफुंद वातावरण, सोबतीला "ती " (राणी ) , वर परत सुरांची नशा ,


और क्या चाहिये जीने के लिए ?


डी.एस.के नी काल त्यांच्या परिवारातील लोकांसाठी सुरेख मराठी गाण्यांच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते। खास मुंबई वरुन पुण्याला आलो ते या कार्यक्रमाचे निमित्त घेवुन, डी.एस.के वरील प्रेमापोटी ।

त्यात परत वहिनींचे ( डी.एस.के. यांच्या पत्नी ) एक नवे रूप पाहायला मिळाले। त्यांनी दोन सुरेल भावगीते गायली ।


बहार आली।