फाट्' संतानं सत्ताविसाव्या वेळा डास मारण्याच्या हेतूने स्वत:च्याच मुस्काटात मारून घेतली आणि त्याचा बांध फुटला... ''च्यामारी या डासांच्या, रक्त पितायत माझं'', असं म्हणत तो बिछान्यातून संतापानं उठला. कपाटापाशी गेला. कपाटातून विषारी औषधाची बाटली काढली आणि तोंडाला लावून घटाघटा संपवली. पुन्हा बिछान्यावर जाऊन उघडाबंब पडून तो गडगडाटी हसला आणि म्हणाला, ''आता चावा साल्यांनो, सगळे मरून पडाल फटाफटा! हा हा हा!!!!''
खळ्ळ्ळ्ळ्'... आवाज झाला. म्युझियमचे संचालक त्वरेनं आवाजाच्या दिशेनं धावले. काचेचे तुकडे गोळा करत असलेल्या संतावर ते जीव खाऊन ओरडले, ''अहो, तुम्ही ५०० वर्षांपूवीर्चा ग्लास तोडलाय!'' संता म्हणाला, ''शुकर है भगवान का! मला वाटलं नवा होता की काय!!!!!''
तंदूरी चिकनवर आडवा हात मारत संता बायकोला म्हणाला, ''ओय कुलविंदर, आज चिकन तो बहुत टेस्टी है... स्पेशल मसाला लावलास की काय?'' कुलविंदर म्हणाली, ''काही खास नाही हो, तंदूरमध्ये कोंबडी जरा जास्त भाजली गेली म्हणून तिला बरनॉल लावलंय थोडंसं!!!'' ................. संता आणि कुलविंदर सिनेमाला निघाले होते. झकास नटलेली कुलविंदर एकदम देखणी दिसत होती. दोघे टॅक्सीत बसले. टॅक्सीवाल्यानं रिअर व्ह्यू मिरर अॅडजस्ट केला. ताबडतोब संताची खिट्टी सटकली. त्यानं टॅक्सीवाल्याला दरडावलं, ''आरशात माझ्या बायकोला पाहतोयस काय रे चोरून? आता चांगलाच धडा शिकवतो तुला. चल उठ. मागे माझ्या जागेवर बस. आता मीच चालवतो टॅक्सी!!!!'' बंता संताला म्हणाला, ''चल येतोस का चेस खेळायला?'' संता म्हणाला, ''तू पुढे हो. मी आलोच स्पोर्ट्स शूज घालून!!!!''
No comments:
Post a Comment