Friday, April 29, 2022

गिरगाव चौपाटी वरचे " ठक्कर्स " मधली गुजराती थाळी

 तेव्हाच राजाभाऊंनी विचार केला होता पक्का. 

ह्या वेळी फक्त गुजराती, गुजराती आणि गुजरातीच. ह्या खेपेस फक्त तेच निवडायचे.

एवढे मस्त गुजराती. आता आपण ह्याच्या पासुन इतके वर्ष लांब राहिलो , त्यांना राहून राहून आश्चर्य वाटुन राहिले .  का पण का आपण येथे कधीच आलो नाही ? आपण याची निवड आधीच का बरं केली नाही ? 

खरं म्हणजे कधीच नाही हा शब्दप्रयोग तसा चुकीचा. दहाएक वर्षापुर्वी किंबहुना जास्तच झाली असावी राजाभाऊ येथे सपत्नीक आले होते पण त्या वेळी याचे पडते दिवस सुरु होते. वाईट अवस्थेतुन एकंदरीच सर्व चालले होते. पण ह्यानी पुन्हा भरारी घेतली आणि नव्या रुपात , नव्या अवतारात  सामोरे आले, लोकप्रिय झाले. कदाचित हे आता आपल्या आवाक्याबाहेर आहे असा समज करुन घेवुन राजाभाऊ यापासुन दूर राहिले असावेत. पण आता लांब रहाणे नाही. आपण उगीचच घाबरत होतो हे ते आज जाणुन गेले.

आंबरस, पुरी, भाकरी, वटाणा पॅटीस, सफेद ढोकळा. सफेद वटाणा , बटाट्याची सुकी, भेंडी,  दोडकी आणि अळुवडी ह्या भाज्या, कढी, डाळ, खिचडी, ताक आणि मग चटण्या वगैरे. 

गिरगाव चौपाटी वरचे " ठक्कर्स " मधली गुजराती थाळी खुप आवडली, ते आज अगदी आवडीने येथे जेवले . 

आपली निवड चुकली नाही ह्याचे राजाभाऊंना फार समाधान झाले. 



आता येणारा उद्याचा दिवस फार चांगला असणार ही खात्रीच.. सुरवात तर चविष्ट झालीयं.

Tuesday, April 26, 2022

थाळी. घरीच.

 


छोले भतुरे व बिर्याणी

 



मस्तपैकी खाली बसु आणि आमटीभातावर आडवा हात मारु.

 मांडी ठोकुन खाली जमिनीवर जेवायला बसायचे हे किती साधे सोपे काम आहे. आपल्याला त्याची सवय आहे. 

मस्तपैकी खाली बसु आणि आमटीभातावर आडवा हात मारु.

पण खाली बसल्यानंतर राजाभाऊंच्या लक्षात एक गोष्ट आली. आपण आणि जेवणाचे ताट या मधे एक अडसर आहे. आपल्या भल्यामोठ्या पोटाचाच. 

शेवटी ताट मांडीवर घेवुन जेवावे लागले.




थंडा थंडा कुल कुल.


 

राजाभाऊंनी अद्याप नाही खाल्लेले.

 राजाभाऊंनी अद्याप  शेपूचे डोसे, मेथीच्या आंबोळ्या, मुटकुळे, वांगी व ज्वारीचे थालीपीठ, गाकर, भाताचा ठेपला, मुळ्याचा उत्तप्पा नाही खाल्लेले.

आंब्यांचा भात , आंबरसाचा भात, कैरीचा पुलाव, मोदकाची आमटी, जवसाचा तिखट पराठा, ही अजुन खायचे आहे.

आता हे रेस्टॉरंट बंद झाले आहे. केवळ आठवणी उरल्या आहेत

 आता हे रेस्टॉरंट बंद झाले आहे. केवळ आठवणी उरल्या आहेत








मामा काणें

 बटाटा वडा नाही. ह्याचे मुळ नाव "बटाटवडा"  मामा काणेंकडचा.




Monday, April 25, 2022

बार्बेक्यू नेशन

 वा, राजाबाबु . बढीया है ! 

रात्री कॉपर चिमनी (वरळी) , सकाळी बार्बेक्यू नेशन (नेरुळ)

बढीया है !

बार्बेक्यू नेशन मधे सध्याला आफ्रिकन खाद्यमहोत्सव चालला आहे.   खरं म्हणजे हे असे चमचमीत खाणे हा राजाभाऊंचा स्वभाव नाही. त्यांना आपला आमटीभातच जास्त भावतो. पण काय करणार, खाना पडता है । 

राजाभाऊंना आज सर्वात जास्त कोणती डीश आवडली असेल तर ती म्हणजे "गरमागरम गुलाब जामुन आणि व्हॅनीला आइस्क्रिम. "

Repost









Sunday, April 24, 2022

राजाभाऊची खाद्यभ्रमंती वडगाव मावळ येतील "भालेकर" मधे.

 राजाभाऊची खाद्यभ्रमंती वडगाव मावळ येतील "भालेकर" मधे.   


सावंतवाडीच्या "भालेकर" यांची एक शाखा वडगाव मावळ येथे जुन्या मुंबई-पुणे हायवे वर उघडल्याचे  काळे आणि कं. जाणुन होते. मग सर्वजण तेथे मासे खायला गेले. राजाभाऊ शाकाहारी असल्यामुळे त्यांनी जाणे टाळले होते. 


पण दुसऱ्यावेळेस टाळणे शक्य झाले नाही आणि राजाभाऊ मग सर्वांबरोबर "भालेकर" मधे शाकाहारी थाळी खायला गेले. अश्या ठिकाणी गेले की जेथे प्रामुख्याने मासे आणि मासेच मिळतात.





आधी राजाभाऊंच्या मनात शंका होती, आपला येथे काय निभाव लागेल याची. पण गरमागरम मऊसुत तांदळाच्या भाकरीने व ओल्या काजुच्या भाजीने त्यांचे मन व पोटही जिंकले.  

Saturday, April 23, 2022

बर्मा बर्मा

 आज राजाभाऊंची तकदीर खुल गई, किस्मत का दरवाजा समझो खुल गया । 


राजाभाऊंचे चिरंजीव व त्याचा बाहेरगावावरुन आलेला मित्र दुपारी बाहेर जेवायला निघाले होते. अचानक का आणि कसे त्याचे मन बदलले. आणि त्यांनी राजाभाऊंना व काळेकाकुंना आमच्या बरोबर जेवायला येता का विचारले. खरं म्हणजे दोन मित्रांनी ,ते ही जवळजवळ तीन वर्षानी भेटलेल्या दोघांनी बाहेर जायचे बरोबर होते.


मनातुन जरी होकार असला तरी सुरवातीस राजाभाऊ जरा नौटंकी करत राहिले. जायचे होते खरं म्हणजे "ब्रिटानीया" मधे बेरी पुलाव खायला पण अचानक बेत बदलला व ते पोचले "बर्मा बर्मा" मधे ब्रम्हदेशाचे जेवण जेवायला.


येथे जाण्याची ही दुसरी वेळ. गेल्याच वेळी जसे येथले जेवण आवडले होते तसेच आजही आवडले. 


आवडले.

https://www.zomato.com/mumbai/burma-burma-fort

Samuza Hincho

Tayat Thi Thoke.

Kyar Yoe Thoke.

Wa Potato.

Burmese Fried Rice.

आज राजाभाऊ आणि कं. यांचा भर सुप आणि स्टार्टर्स वर होता. त्यानेच पोट भरले. मग मेन कोर्स मधे फक्त फ्राईड राईस मागवला.

तृप्त मनाने, भरलेल्या पोटाने आणि खाली झालेल्या पाकीटाने ते बाहेर पडले.











कुल्फी ,कुल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्फी, कुल्फीए

 "कुल्फी ,कुल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्फी, कुल्फीए "

रस्त्यावरती  आवाज ऐकु आला की मग साद घालायची.

 "अहो कुल्फीवाले, वर या."

दिवसभर गरमीने पोळलेला देह, थकलेला, भागलेला घरी पोचलेला जीव, जेवण जेवुन झालेले आणि मग थंडगार कुल्फी, दुधाची.

धोंडींबा, त्या पल्याड राजगडाच्या पायथ्याच्या गावचे. दुपारी डोक्यावर कुल्फीचे भांडे घेऊन निघायचे ते पार रात्रीपर्यंत, कुल्फी संपेपर्यंत रस्तावर, गल्लीबोळात भटकत रहायचे.

इतक्या वर्षात काहीच बदल नाही चवीत. बदलले काही गेले असेल तर त्या मटक्याची जागा आता प्लॅस्टीकच्या बालदीने घेतली आणि ती पाने गायब. काडीने कुल्फी चोखुन खाण्यापेक्षा तिच्या गोल चकत्या कापुन पानावर खाण्यात जी मजा होती, कुल्फीबरोबर त्या पानाची देखिल चव घेण्यात जो आनंद होता, तो काय सांगावा.






तुमच्या कडे तांदळ्याच्या भाकऱ्या मिळतात काय

 ज्याच्या नशीबी जेथे खाणे लिहिले असते तेथे ते त्याला ओढुन घेवुन जाते ही बाकी खरे.

आज राजाभाऊंच्या मनात तांदळ्याच्या भाकऱ्या खाण्याची इच्छा खुप प्रबळ होती. पंचवीस एक वर्षापुर्वी अर्नाळाल्या त्या खाल्लेल्या स्मरणात होत्या. त्या तांदळ्याच्या भाकऱ्यांच्या ओढीने राजाभाऊ अर्नाळ्याला पोचले खरे पण तेथे काय त्यांचे मन रमले नाही. मग तशेच उपाशी पोटी ते तेथुन परतीच्या मार्गाला लागले, दुपारचे दोन वाजलेले. जीव भुकेने नुसता कासावीस झालेला, प्राण कसेबसे धरुन ठेवलेले.  आता येथे काय कुठे घरगुती जेवण मिळायचे ? 

अचानक त्यांची नजर आगाशी मधे एका फलकावर गेली. चमचमीत मराठी भोजन. "अन्नपुर्णा " घरगुती. मग काय, गाडीला करकच्चुन ब्रेक. 

विचारायला काय जाते म्हणुन सहजच त्यांनी विचारले "तुमच्या कडे तांदळ्याच्या भाकऱ्या मिळतात काय ?  " , ज्याचे उत्तर होकारार्थी मिळाले. मग काय. गरमागरम , अप्रतिम चवीच्या दोन भाकऱ्या, कोबेची भाजी आणि मसुऱ्याची रस्सेदार भाजी.

जेथे उपाशी पोटी परतण्याची वेळ आली होती तेथे अचानक मेजवानी मिळली.

अन्नदाता सुखी भवः  

ताडगोळे

 चला दिवसाची सुरवात मस्त झाली. ताडगोळे फार छान होते, जरा जास्तच खायला हवे होते.

भुईगाव-निर्मल रस्त्यावर.




जर शार्क माणुस असता तर !

 जर शार्क माणुस असता तर !

जर शार्क माणुस असता तर, तो छोट्या मासोळ्यांशी जास्त चांगला वागला असता का ? 

नक्कीच.

जर शार्क माणुस असता तर, त्यानी समुद्रातील छोट्या मासोळींना अनेक सुखसोयी उपलब्ध करुन दिल्या असत्या. अशा सुखसोयींमुळे छोट्या मासोळीं उत्साही व आनंदी झाल्या असत्या. छोट्या मासोळींनी निराश होवु नये यासाठी शार्क माशांनी समुद्रात मोठाले उत्सव साजरे केले असते. 

कारण

उत्साही व आनंदी मासोळ्या या निराश मासोळ्यांपेक्षा चविष्ट असतात.

जर शार्क माणुस असता तर ! या कथेतील वरील परीच्छेद मला फार भावला.

मुळ लेखक - बट्रोल बेस्त. स्वैर रुपांतर - नितीन जोगळेकर

पोळी नुडल्स

पोळी नुडल्स

आता पर्यंत मी शिळ्या पोळॊचे लाडू खाल्लेले आहेत. आज मी पोळी पासुन बनवलेला नवीन पदार्थ खाल्ला.

साहीत्य -

पोळ्या - चांगल्या लांब पट्टीत कापुन घ्याव्यात.

पाव भाजी मसाला

कांदा (Sliced) - 1

भोपळी मिर्ची (Sliced) - 1

टॉमेटो - (cubed) - 1

लसुण, मिरच्या ( (finely chopped )- 1 tsp

लिंबाचा रस - चवी पुरता

मिठ, मिरपुड, मिरची पावडर - चवी पुरती

कोथीबीर

मस्का , किंवा ऑलीव्ह ऑईल व तेल ( एकत्र केलेले)

एका पॅन मधे मस्का , किंवा ऑलीव्ह ऑईल व तेल ( एकत्र केलेले) गरम करुन घेणे.

त्या मधे कांदा,भोपळी मिर्ची , टॉमेटो, लसुण, मिरच्या परतुन घेणॆ, त्यात पाव भाजी मसाला, मीठ, मीरपुड, व शेवटी पोळीच्या केलेल्या लांब पट्टया टाकणॆ, चांगले परतुन घेणॆ, वरती लिंबाचा रस ब कोथीबीर मारणॆ,

मला वाटते त्यात थोडॆसे बारीक कापलेले आले ही टाकले होते.

गरमागरम पोळी नुड्ल्स खाताना हिंदी चीनी भाई भाई म्हणत म्हणात खावे.

चुकभुल द्यावी घ्यावी.

फर्माईश चॅनल

 फर्माईश चॅनलनी काल रात्रीच ऑर्डर सोडली होती.

उद्याला सकाळी नास्त्याला बटाटा वडा.

त्यांच्या कुठे लक्षात होते बाहेरगावी गेली असली म्हणुन काय झाले शेवटी रिमोट कंट्रोल हा हाय कमांडच्याच हातात असतो.

" हे काय ? उपमा ? तुला माहिती आहे ना मला फारसा आवडत नाही. मी बटाटा वडे करायला सांगितले होते ना ?"

"काकी जातांना सांगुन गेल्या होत्या काय करायचे ते "

काळेकाका गप्प. तोंड बंद ठेवुन गपचुप मुकाट्याने समोर आलेला उपमा खात बसले. 

डिश मधला सर्व संपवला. ना जाणे कोणी काळेकाकुंकडे बातमी पोचवली तर.

काका, ओ, काका, आंब घ्या की. जी मजा चोखी आंब्यात आहे हापुसात नाही

 काका, ओ,  काका, आंब घ्या की.






जी मजा चोखी आंब्यात आहे हापुसात नाही