एखादी साधी इच्छा, पण ती पुरी होण्यासाठी एवढी वर्षे लागावी ?
कधीतरी हजारदिडहजार वर्षापुर्वी राजाभाऊंनी कोचीन मधे "इडीअप्पम " खाल्लेले. तो पदार्थ खुप आवडलेला.
माटुंग्याच्या "आर्य भवन " मधे इडीअप्पम आणि कोकोनट स्टु मिळतो हे राजाभाऊंना जरी ठावुक असले तरी का कोण जाणे येथे जावुन खाणे झालेच नाही.
ती इच्छा आज अचानक अवचितपणे पुर्ण झाली.
काही कामानिमित्ते माटुंग्याला जाणे झाले. माटुंग्याला पोचल्यानंतर, गाडी रामा नायकच्या खाली उभी केल्यानंतर अचानक भुक लागणे आणि समोरच सोमवार असुनही "आर्य भवन " उघडे असलेले दिसणे हा केवळ निव्वळ योगायोग.
ही इमारत पाडल्यामुळे हे उपहारगृह बाजुच्या गल्लीत गेले आहे.
No comments:
Post a Comment