आज काळेभाऊंचा खिसा खाली झाला आणि तुंदीलतनु पोट अंमळ जरा जास्तच वर आले.
आधीच महिला बचत गटांचे प्रदर्शन म्हणजे राजेशभाईंचा विक पॉईंट. त्यात बचत गट यांची उत्पादनं व त्यांचे खाद्यपदार्थांचे स्टॉल्स, जणु गरमागरम पुरणपोळी आणि त्यावर धरलेली साजुक तुपाची धार.
काय खरेदी करु आणि काय खाऊ, किती खाऊ ,कसे खाऊ . जणु मोकाट सुटलेला वळु. या वळुला वेसण कशी घालायची ते त्यांना बरोबर ठावुक.
तरी बरं त्यांची आपली छोटी छोटी , लहानसहान वस्तुंची खरेदी असते. आणि तसं बघायला गेलं तर खाणे पण फारसं काही जास्त नसतं.
खानदेशी मांडे , वांग्याचे भरीत आणि ज्वारीची भाकरी. बारामतीकरांकडुन गरमागरम बाजरीची भाकरी, मिरचीचा ठेसा आणि पिठलं, तोंडी लावायला बिनपाण्याची कांद्याची भजी व आपलं उगीचच नावाला थालीपिठ.
उकडीचे मोदक (नव्हता चांगला ) आणि घावनं तव्यावरुन ताटामधे चटणी सोबत.
पण मी काय म्हणतो माणसांने वटारलेल्या या डोळ्यांना येवढे कशासाठी घाबरुन रहायला हवं ?
हुरड्याचे थालीपीठ खाण्याचे राहुन गेलं ना.
Re-post
No comments:
Post a Comment