बापसे बेटा सवाई असे जे म्हणतात ते उगीचच नाही.
रात्री जेवायला कुठे जायचे असा विचार सुरु झाल्यानंतर राजाभाऊंना काहीच जागा सुचेना. मांसाहारीसाठी त्यांनी आपलं नेहमीचच "कॉपर चिमणी " चे घोडे पुढे दामटले. पण अनेक वेळा तेथे गेल्याने ते नकोसे झालेले, परत त्यात तेथे होणारी गर्दी, मग आतमधला प्रचंड कोलाहल. सारे नकोसे होते. कुठेतरी अश्या ठिकाणी जायचे होते की जेथे जावुन शांतपणे गप्पागोष्टी करत जेवणाचा आस्वाद घेता येईल. छोकऱ्याने मग "कोयला" शोधुन काढले. तसं राजाभाऊंनाही कधीपासुन गच्चीवरील उपहारगृहात जावुन जेवायचे होते. नाही म्हणजे कोणताही नवीन बदल स्विकारण्याची तयारी नसलेल्या हिटलरी राजाभाऊंनी काहीसे आढेवेढे घेतले खरे पण आजकलच्या जमान्यात पोरांचे ऐकायला लागते ना.
कुलाब्याल्या "अरबी" एरीयामधे पोचल्यानंतर वाटले, अरे येथे आपण कशाला आलो ? मग एका लहानश्या लिप्टनी व पुढे दोन अरुंद जिने चढल्यानंतर जेव्हा गच्चीवरी "कोयला" मधे प्रवेश केला तेव्हा मन एकदम प्रसन्न होवुन गेले. तेथला रागरंग, वातावरण, माहोल बघुन दिल खुष झाले. छोटेखानी तंबु, त्यातली प्रकाश व्यवस्था, कॅंडल लाईट डिनर. एकदम लाजबाव. मग तेथे जेवायला आलेले मॉड , हायफाय लोकं पाहिली, कसं बरं वाटले. ह्या टोकापासुन त्या टोकापर्यंत संपुर्ण गच्चीभर फिरुन झालं. पलीकडचा ताजचा सजलेला डोम काय छान दिसत होता.
मग स्टार्ट्स मागवली. स्टफ्ड आलु तिलवाला, कोलीवाडा प्रॉन्स , मुर्ग कबाब. नटलेल्या डिशीस समोर आल्या , चवीचवीने गप्पा मारत जेवणाला सुरवात केली. चव मस्त होती.
पण पुढे मागवलेल्या शाकाहारी जेवणानी साफ निराशा केली. पनीर लजीज आणि डाल फ्राय. पनीर फारसे काही चांगले नव्हते , भाजी सुरवातीला भुकेल्यापोटी चांगली लागली खरी पण जसजसे पोट भरत गेले तसतशी नकोसी व्हायला लागली. डाल बऱ्यापैकी खारट आणि दाट होती. त्यात दुर्दैवानी जागा भिंतीकडची मिळाली होती. बाहेरच्या बाजुला जी टेबले आहेत त्यात जास्त माणसं बसण्याची सोय नाही म्हणुन. जेवतांना बाहेरचे दृष्य पहाण्याऐवजी भिंत पहात जेवावे लागले. मांसाहारी जेवण चांगले असावे.
परत जाईन का ?
तर ह्या माहोलची मजा लुटायला , यस.
जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी, नो.
Old Post.
Restaurant is closed now.
No comments:
Post a Comment