Saturday, January 21, 2023

सोडाबॉटल ओपेनरवाला

 सोडाबॉटल ओपेनरवाला.

सध्या राजाभाऊ आहारनियत्रणाचे प्रचंड प्रयत्न (पुन्हा एकदा) करताहेत. आता लक्ष एकच. वजन निदान १०० कि. पर्यंत आणायचे आहे.

पण ह्याचा अर्थ असा होत नाही की त्यांनी रेस्टॉरंट मधे जावुच नये. जावे, जरुर जावे आणि आपण किती संयम बाळगु शकतो ह्याची प्रचीती घ्यावी.

"सोडाबॉटल ओपेनरवाला" बद्दल बरचसं ऐकले होते. काळेकाकु नको, नको म्हणत असतांना देखील ते ह्या ठिकाणी घुसले.

मेन्यु पाहतांना राजाभाऊंचे नजर दोन पदार्थांवर गेली, ह्या पदार्थाने येथे स्ठान मिळवल्याचे बघुन त्यांना झालेला आनंद डोळ्यात मावेना. मग त्यांना किंमत पाहिली. डोळे आणि जीभ एकदम बाहेर आली. 

कांदा भजीची किंमत एवढी ? रुपये २२५\= फक्त ? आणि वडापाव ९० रुपये. कॅन्सल.

कांदा भजी :Thinly sliced onion tossed in spices and fried. Served with green, garlic, and tomato Chutani.

मग बनमस्का आणि इराणी चाय मागवला. स्व:तासाठी सोडा विथ कोकम आणि कालाखट्टा.

पण एकंदरीत हे पारशी रेस्टॉरंट भन्नाट आहे. .

Re-post





No comments: