राजाभाऊंचा मुलगा म्हणजे बाप शेर तर मुलगा सव्वाशेर, नवीन नवीन रेस्टॉरंट्स शोधुन काढण्यामधे उस्ताद. त्याचा बाप त्याच त्याच रेस्टॉरंट्स मधे अजुन पर्यंत अडकुन पडलेला.
काल रविवार. रात्र. घरातले सारे बदमाश मंडळी मुलानी शोधलेल्या "The Colonial Palate " ह्या रेस्टॉरंटमधे जेवायला गेले, काळेकाकांना घर सांभाळायला ठेवुन. न सांगता. राजाभाऊंचा समज की जातील जेवायला इथे तिथे. आणि वरती फोन करुन त्या जागेची, तेथे मिळणाऱ्या खाद्यपदार्थांचे वर्णन करुन सांगत राहिले. त्यात परत तुझी खुप आठवण येते हे सांगण्याचे सौजन्य पण नाही. नाक और कान मे से गरमागरम धुवां.
मग राजाभाऊंनी त्यांना तेथुन "Paneer Tikka Pate " ही एक डिश आणायला सांगितली. होती मस्त, चविष्ट परंतु रेस्टॉरंटच्या त्या माहोलमधे बसुन गरमागरम जेवणात जी मजा आहे ती घरी कुठली ?
ठिक है ! बेटे रिश्तेमे हम तुम्हारे बाप लगते है !
ताक. काळेकाकु ह्या पदार्थाच्या प्रेमात पडल्या. मग दुसरे काहीच खाल्ले नाही.
Crunchy Lotus Stem
Repost. This restaurant is shut down permanently.
No comments:
Post a Comment