दाने दाने पर लिखा है खानेवाले का नाम
राजाभाऊंच्या नशिबी कधी, कुठले, कोणते अन्न असेल हे सांगणे मुश्किल.
कालचीच गोष्ट. वसई-विरार पट्टातील खलार आणि कळंब ह्या गावात राजाभाऊ काही कामानिमित्ते गेलेले.
दुपारचे दोन अडीच वाजलेले. प्रचंड भुक लागलेली, आता ह्या गावांमधे कुठे काय जेवण मिळेल का ? आणि मिळालचं तर ते कसं असेल ह्या विवंचनेत असलेले राजाभाऊ गाडी चालवतांना रस्ता चुकले व कळंब बिच कडे जाणाऱ्या रस्त्याला लागले.
साधारणता समुद्रकिनारी असतात तश्या हॉटेलात जेवणाची राजाभाऊंची इच्छा नसते. आता जेवणासाठी थेट वसई गाठावी लागणार . तो पर्यंत भुक कशीबशी आवरु लागणार ह्या विचारात असलेल्या राजाभाऊंची नजर एका लहानश्या बोर्डाकडे गेली. " हॉटेल अस्मिता"
बाहेरुन कुठलाही भपका नसलेली ही जागा, म्हटलं बघुया तर खरं. आत गेल्यावर प्रसन्न वाटले, अंतर्गत सजावट उत्कृष्ट होती. त्यात परत शाकाहारी थाळी मिळते म्हटल्यावर काय ?
लगेच मागचापुढचा विचार न करता थाळी मागवली.
पावट्याची भाजी, बटाट्याची भाजी, वटाण्याची भाजी, अप्रतिम चव असलेली डाळ, छानश्या मऊसुद चपात्या, भात आणि वरती श्रीखंड सुद्धा. पाहुनच दिल खुष झाले.
रस्ता न चुकते तर भुलेल्या पोटी हे रुचकर अन्न, जसे पाहिजे असेल तसे अन्न कुठले मिळाले असते ?
दिल खुष हुआ ।
No comments:
Post a Comment