गॉडची कसम. काल रात्री St.Thomas' Cathedral मधे Festival Music "For Christmas & Midnight Holy Eucharist ला जातांना राजाभाऊंच्या मनातही नव्हते आज आपण बोरीबंदरच्या "पंचम पुरीवाला" कडे पुरीभाजी खायला जावु. नाही म्हणजे बराच काळ त्यांच्या मनात येथे जाण्याचे घाटत होते खरे पण ते एकंदरीत टाळत होते.
मग काल रात्री एक संकल्प, जो कधीही पुरा न करण्यासाठी सोडला जातो, तो संकल्प सोडण्याआधी शेवटच्या म्हणुन पुऱ्या खावुन घ्याव्यात, मग नव्यावर्षी वजननियंत्रणाला एकदा का सुरवात झाली की मग जवळजवळ वर्षभर हे असे तेलकट खाणे काही व्हायचे नाही असे आपल्या मनाला समझावत राजाभाऊ "पंचम पुरीवाला " कडे पोचले. काल रात्री तेथे बऱ्यापैकी गर्दी होती. काही काळ थांबाव ही लागले.
ही अशी बटाट्याची रस्सेदार भाजीची चव राजाभाऊंच्या आवडीची. सोबत अशीच भोपळ्याची रस्साभाजी पण असते. पण ती नाही कधी खाल्लेली. "पंचम पुरीवाला " कडे संपुर्ण जेवण जरी मिळत असले तरी संबंध आयुष्यात राजाभाऊंनी ह्यांच्याकडे पुरीभाजी शिवाय दुसरे काहीच खाल्लेले नाही. त्यात परत अनेक प्रकारच्या पुऱ्या, जसे की पालक पुरी, मसाला पुरी इ.इ. मिळत असल्या तरी साध्याभोळ्या राजाभाऊंची पसंती ही फक्त साधी पुरी व साधीच भाजी ह्याला असते.
महंगाईके जमानेमे अवघ्या पत्तीस रुपयामधे काम भागले.
Repostt
No comments:
Post a Comment