Monday, December 12, 2022

बार्बेक्यु नेशन


 कालचा दिवस राजाभाऊंसाठी खास , विशेष, अत्यंत महत्वाचा आणि आनंदाचा होता. तो दिवस साजरा करण्यासाठी ते पोचले "बार्बेक्यु नेशन " मधे.

केव्हा केव्हा राजाभाऊंना आहारनियंत्रणाचे झटके येतात. दुर्दैवाने ते आत्ताच यावेत ?

भगवंतांनी म्हटले आहे , जेव्हा सारे झोपलेले असतात तेव्हा संयमी माणुस जागा असतो. हाच संयम त्यांनी काल दाखवला. आजुबाजुला मस्त मस्त खाद्यपदार्थ असतांना, खमंग वास सुटला असतांना मनावर ताबा ठेवणे तसे कठिण होते, पण मुश्किल नव्हते. 

राजाभाऊंसाठी काहीच नाही, अगदी मॉकटेल सुद्धा.

निभावले कसे तरी.  

घरुन निघतांनाच त्यांच्या साठी वालपापडीची भाजी जी बनवली होती ती  खावुन निघाल्यामुळे काहीसे सुसह्य झाले होते खरे.

पण. 

ठिक है,  बचेंगे तो कभी और भी खायेंगे.





Repost.

No comments: