Wednesday, December 21, 2022

गुज्जुभाई नी थाली

 डॉक्टरांनी निरोगी आयुष्य काढायचे असेल किंबहुना जिवंत रहायचे असेल तर किमान तीस किलो वजन कमी करायलाच हवे असा निर्वाणीचा इशारा राजाभाऊंना काल दिला.

आज पासुन राजाभाऊंचे आहार नियत्रणाचे प्रयोग सुरु.

पण.

डायटींग सुरु करण्यापुर्वी शेवटचे म्हणुन राजाभाऊंनी एका भोजनगृहात जाण्याचे ठरवले.  तेवढीच आपली डायटींगपुर्वीची आठवण.

राजाभाऊंच्या घराजवळ "गुज्जुभाई नी थाली" नामक गुजराती थाळी मिळण्याचे एक छान रेस्टॉरंट सुरु झाल्याचे मित्राकडुन कळले मग राजाभाऊंची पावले तेथे वळली.

त्यात परत एक लॉटरी लागली. येथे दर बुधवारी थाळीचा दर कमी म्हणजे रुपये २९९.०० असतो . जेवण चविष्ट होते आणि मुख्य म्हणजे आज जेवणात "उंधियो" होता. पाची बोट "उंधियो"मधे बाजरानी रोटला साथे (भरपुर घी टाकलेला व गुळही) बुडवुन बुडवुन असा जो ताव मारला की बस्स रे बस. पनीर, चणा, बटाटा ह्या इतर भाज्या. कढी, दाळ, पापडी चाट आणि .............

आणि स्वीटमधे  बासुंदी अने गाजर हलवा. (डायटींगची सुरवात होणार असल्यामुळे ते कमीच खाल्ले गेले.

एकुण काय मजा आली.

https://www.zomato.com/.../gujjubhai-ni-thali-kemps-corner





















No comments: