फार पुर्वी आपल्या ब्लॉगवर "हरेकृष्णाजी" यांनी ऑपेरा हाऊसच्या समोर असलेल्या " तिवारी ब्रदर्स मिठाईवाला " यांच्याबद्दल जरा जास्तच स्तुती केली होती. "रोल्स-रॉईस ऑफ ऑल मिठाईवालाज " वगैरे वगैरे असे काहीसे लिहिले होते.
केव्हातरी एकदा मधेच असे काळेकाका आणि काळॆकाकू येथे समोसे आणि क्लब कचोरी खायला गेले होते आणि मग हे खातांना आपण पुर्वी ह्या दुकानाबद्दल काय लिहिले होते हे राजाभाऊंना आठवले. मग त्यांनी समाधानाने मान डोलवली, आणि आणखीन एक प्लेट क्लब कचोरी मागवली.
क्लब कचोरी, पुऱ्यांसारख्या आणि त्यासोबत असलेली आलुमटारची टॉप भाजी, सोबत चटणी.
तिवारी यांचा समोसा पण खुप चविष्ट असतो, बेष्ट इन द होल वर्ड " .गोड व तिखट चटणीसोबत समोसा खातांना जणु ब्रम्हानंदी टाळी लागते.
राज कचोरी हा आणखीन आवडीचा पदार्थ. येथला प्रत्येक खाद्यपदार्थ व मिठाया ह्या अगदी खणखणीत असतात.
आणि ह्या खेपेस तेथे बसुन खातांना खुप मस्त वाटले.
ह्या दुकानाचे जवळजवळ वर्षापुर्वी नुतनीकरण झालेले आणि गंमत म्हणजे घराच्या अगदी जवळ असलेल्या "तिवारी ब्रदर्स मिठाईवाला " यांनी आपल्या दुकानाची अंतर्गत सजावट बदलली आहे हे राजाभाऊंना ठावुकच नसावे ?
दोनचार वर्षे आपण ह्या दुकानापासुन दूर राहिलो की काय हा प्रश्न आता सतवु लागला आहे.
No comments:
Post a Comment