आज प्रथमच राजाभाऊंना आपण आपल्या आवडीच्या मरिन प्लाझा मधल्या बे व्हु मधे बुफे खायला जावु नये असे वाटत होते, सतत उठायचा कंटाळा आलेला, त्यात परत सोबत म्हातारी माणसे, त्या ऐवजी मस्त पैकी कॉपर चिमनी मधे जावुन शांतपणे मोघलाई जेवणाचा आस्वाद घ्यावा असे त्यांचे मत झाले.
कॉपर चिमनी, उत्कॄष्ट, चविष्ट, अस्सल मोघलाई खाना मिळण्याचे मुंबईमधले फार पुर्वी पासुनचे ठिकाण. जवळजवळ १८-१९ वर्षापुर्वी ते तेथे जेवायले गेले होते. त्या वेळी त्यांचे जेवण एवढे आवडले होते, एवढे आवडले होते की आपण येथे नेहमी जेवायला यायचे असा त्यांनी ठाम निश्चय केला होता. हे सतत जायचे प्रकरण मधे इतका कालावधी लोटल्या नंतर अखेरीस साजरे झाले.
सुरवात झाली ती टॉमेटो सुप नी. त्या पाठोपाठ मागवले गेले ते आलु चटणीवाला व मकई मलाई शीग कबाब, मस्त पैकी त्या हिरव्या चटणी सोबत.
मजा आली. बऱ्याच दिवसाने चांगले जेवल्याचे समाधान मिळाले.
आज पंचाहत्तरीला पोचलेले आजोबा खुष झाले आणि राजाभाऊ पण, कारण येथे दर तसे रिझनेबल आहेत. VFM.






4 comments:
फिनिक्स मिल्स मध्ये सुद्धा कोंपर चिमणी आहे... मस्त आहे एकदम... :)
कॉपर चिमनी माझंही फ़ार आवडीचं होतं...मला पुर्वी कामानिमित्त त्यांच्याकडे जायची (आणि अर्थात खायची पण) संधी मिळाली होती...एक बांद्रालाही होतं मला वाटतं.....
फ़ोटोसाठी जबरदस्त निषेध...
मरीन प्लाझा ची समुद्राकडली खिडकी पकडुन बसलं की मस्त वेळ जातो. माझं पण फेवरेट !! कुठल्या एखाद्या ’सरकारी साहेबाला ’पार्टी द्यायची असेल तर मी त्तिथेच नेतो !
वरळीच्या चिमणी मधे गेलोय बरेचदा, पण हे सिटी मधल्या हॉटेल मधे गेलो नव्हतो कधी.
एका विस्मरणात (माझ्या) गेलेल्या छान रेस्तोरांतची आठवण करून दिलीत! आता कधी भेट देतोय असे झाले आहे!
Post a Comment