बरं झाले शनिवार, रविवारी पुण्यात " नभ मेघांनी आक्रमिले, तारांगण सर्व ही झाकुन गेले " म्हणण्यासारखी परिस्थिती नव्हती.
वरना ये ऐसा नजारा कहा देखने मिलता ?
माणसे आपल्या जोड्या जुळवतात, पशुपक्षी देखिल आपापल्या जोड्या जुळवुन रहात, मग ग्रहताऱ्यांनी तरी का मागे रहावे ?
मावळतीकडॆ महातेजस्वी शुक्रमहाराज जणु माझ्यासाठीच उघडले आहे हे स्वर्गाचे द्वार करीत पुनर्वसू नक्षत्रात पोलक्स व कॅस्टर मधे बिराजमान झाले होते.
आणि त्यांच्या मागोमाग मंगळस्वामी,
ते तर सिंहेमधल्या मघाशी उरीभेट , गळाभेट घ्यायला आतुर झालेले.
मग गुरुदेवांनी तरी काय पाप केलयं ? चंद्रकोरी सोबतच, समावेतच ते पुर्वेला उगवत होते.
हे केवळ ढग विरळ असल्यामुळे, सारे आकाश ढगांनी भरुन न गेल्यामुळे पहायला मिळाले.
1 comment:
mangal aani prati-mangal (maghaa) baghitale, pan shukra aani guru kade maatra laksha gele naahi.
Post a Comment