Saturday, February 10, 2007

KRISHNA RADHEKRISHNA

फक्त तुझा!!

का असा चिडून रोज अंत बघतेस माझा?
राधे, मी तुझाच गं.. फक्त फक्त तुझा!!
(काय आहे..)

रुक्मिणीचा प्रॉब्लेम होता भावाबरोबर घरी
सत्यभामा कटकट करते.. आधी होती बरी
बाकी सोळा हजार नुसती शरणार्थी प्रजा..
राधे, मी तुझाच गं.. फक्त फक्त तुझा!!

हेल्थ रीझन्ससाठी तुळस.. अं.. पित्त शमवायला..(?!)
ओठांवर मुरली धरली तुझंच मन रमवायला
रासक्रीडा? मी?? छे!! क्लोन असेल माझा!
राधे, मी तुझाच गं.. फक्त फक्त तुझा!!

भोळाभाबडा सापडलो म्हणून अशी रुसतेस!
तूच खरी अनयासोबत आनंदात दिसतेस!!
जीव तोडून प्रेम केलं त्याची ही सजा??
राधे, मी तुझाच गं.. फक्त फक्त तुझा!!

HOW TRUE.
TO ME NAWHECHA, ( NOT ME)
THE BEST POEM I HAVE READ SO FAR IN MY LIFE.

FROM THE BLOG OF http://paarijaat1.blogspot.com/

1 comment:

स्वाती आंबोळे said...

Thanks, Harekrishnaje for the encouraging words.