Monday, February 07, 2022

All Stir Fry

 मुख्य जेवण आता येईल, मग येईल ह्याची वाट बघत राहिलेल्या राजाभाऊंना मग जाणवले की अरेच्चा आपण आत्ता जे बाऊल भरुन बीन सॉसमधे बनवलेले  नुडल्स खाल्ले तेच जेवण. 

अस्स होय, "The Wok " म्हणजे ही अशी भानगड आहे तर मग कुठे डोक्यात प्रकाश पडला आणि मग परत एकदा शेजवान सॉसमधे बनवलेले नुडल्स जावुन आणले. 

अलीकडे ज्या झपाट्याने ह्या नवीन नवीन गोष्टी येत आहेत ते समजायला राजाभाऊंना जरा जडच जाते. 

"All Stir Fry" मध्ये भांड्यांमधे रचुन ठेवलेले टॉमेटो नुडल्स, पालक नुडल्स, बॉईल नुडल्स, राईस नुडल्स, चपटे नुडल्स , व सोबत सॅलड्स बनवतांना लागणारी सर्व सामग्री समोर दिसली होती खरी, पण हे बघितल्यानंतर वाटले होते की असेल बाबा हे सारे मुख्य जेवणाआधी खाण्याचे पदार्थ.

पण एकंदरीत हा प्रकार न परवडणारा आहे, आठशे रुपये मोजुन खाल्ले काय तर दोन बाऊल भरुन नुडल्स. 

अरे गड्या त्यापेक्षा आपली मॅगी बरी.







No comments: