Wednesday, February 09, 2022

गुरुकृपा

 आजतोवर राजाभाऊ "गुरुकृपा" पासून वंचित राहिलेले. पण आज त्यांच्यावर कृपा व्हायचीच होती.

अणजुर वरुन संध्याकाळी घरी परतांना पोटात पेटलेला वडवानल. 

धगधगत्या यज्ञात समोसा छोले, पॅटीस छोले, दही वडा आणि गुलाब जामुनची आहुती दिल्यानंतर ही तृप्त न झालेला.

आतापर्यंत आपण गृरुकृपामधे कधीच कसे गेलो नाही याचा त्यांना प्रश्न पडला आहे. आजही कदाचीत मॅडम व युवराजांनी आदेश दिला नसता तर ते नक्कीच माटुंग्याला वळले असते.

No comments: