Monday, November 07, 2022

ऑरेंज ॲंड कं.

 सकाळचा वचपा अखेरीस राजाभाऊंनी रात्री काढलाच. साधे जेवायला पाहिजे काय?


पहिला घास. पहिली प्रतिक्रिया. "मस्त आहे". काळेकाकुंची.


"ऑरेंज ॲंड कं." 


सिंहगड रोडवर आता असंख्य उपहारगृह झाली आहेत पण फाईन डायनींग रेस्टॉरंटची उणीव भासत होती. ती ह्या "ऑरेज ॲंड कं" नी पुरी केली. अखेरीस राजाभाऊंनी सिंहगड रोडवरती जेवायला जायला उत्तम, सर्वोत्तम, सर्वश्रेष्ठ अशी जागा शोधली तर.


टॉमेटो सुप आणि पनीर बटर . बरोबर खस्ता रोटी आणि बटर कुलचा.


पण येथे एके गोष्ट खटकली. मेन कोर्समधे शाकाहारी खाद्यपदार्थ निवडण्यास जास्त वाव नाही. पनीरच्या डिशीसचाच भर आहे.  हे रेस्टॉंरंट नुकतेच उघडले आहे. मेन्युत बदल घडवतील अशी आशा आहे.












No comments: