हे रेस्टॉरंट काही वर्षापुर्वी बंद झाले आहे.
राहिल्या फक्त आठवणी.
"मनालीला नाही तर नाही , निदान मनालीत तरी"
काही माणसं असी असतात की त्यांना आपण कधी भेटलेले नसतो, ओळखत देखील नसतो पण का कोण जाणॆ त्यांच्या बद्दल आपल्या मनात कोठेतरी आदर असतो, आपुलकी असते, ममत्व असते
हिमाचल प्रदेशातील मनाली येथे हॉटॆल व्यवसाय करणारे श्री. मकरंद कुलकर्णी. त्यांच्या बद्दल ऐकुन होते , कधी तरी वाचनात ही ते येत होते, एक मराठी माणुस आपल्या मुलखापासुन दुर वर हा व्यवसाय करतो म्हटल्यावर कौतुकही होते. दोन तीन वेळा मनालीला जाण्यापुर्वी त्यांच्याशी दुरध्वनी वरुन बोलणॆहे झालेले होते , पण जाणॆ रहित झाल्याने गाठभेट पडली नव्हती.
पुण्यामधे त्यांनी मेहंदळे गॅरेज जवळ रेस्टॉरंट सुरु केल्याचे वर्तमानपत्रात वाचल्यापासुन राजाभाऊची चुळबुळ सुरु झाली होती. तेथे जावुन जेवल्याशिवाय त्यांची जिव्हा व पोट शांत होणार नव्हते
आज संध्याकाळचा बेत ठरवला होता, सौ. सानीया पाटणकरांचे गाणॆ व मनालीत जेवण.
पण धीर धरवेना, राजाभाऊ सपत्नीक दुपारीच मनालीला पोचले , दम आलु काश्मीरी, पनीर रसभरे, पुलाव खाण्यासाठी.
चांगली प्रशस्त जागा, चवदार, रुचकर अन्न, जसे हवे होते तसेच.
चोखंदळ पुणेकरांनी मनालीला भर भरुन दाद दिली आहे. भर दुपारी देखील मनाली नुसते तुडुंब भरले होते. दाक्षिण्यात पदार्थ, पंजाबी, चायनीस खाण्यासाठी येथे खवय्ये गर्दी करुन जमले होते.
अगदी ऐसपैस जाग असलेल्या मनालीने सुरु झाल्यापासुन अगदी मोजक्या दिवसात रसिकांचे मन आणि पोट काबीज केलेले दिसतेय.
मजा आली. फार आवडले.
तर आता बार बार लगातार. मनालीत.
No comments:
Post a Comment