सेलब्रेशन करायला काय राजाभाऊंना काहीही कारण पुरते.
आज संध्याकाळी उत्सव साजरा करायला राजाभाऊ सपत्नीक पोचले माटुंग्याला.
काल "अंबा भवन" बद्दल धोंडोपंतांनी लिहिलेले वाचल्यानंतर राजाभाऊंना कधी तेथे पोचतो असे झाले होते. खरं तर न्याहारी करायलाच जायचे होते पण आज सकाळी सात वाजल्यापासुन ते खुप बिझी असल्यामुळे "अंबा भवन " कडे संध्याकाळी पोचले. ही त्यांची ह्या ठिकाणी जाण्याची पहिलीच वेळ.
दुर्दैव राजाभाऊंची, तेथे पोचण्याची एवढी धडपड केली पण भवन त्यांच्यापासुन लांबच राहिले. खुप गर्दी, गाडी उभी करायला पण जागा मिळाली नाही. होता है कभी कभी ऐसाभी होता है ।
मग काय ते पोचले आपल्या नेहमीच्या ठिकाणी म्हणजे "राम आश्रय " मधे पोचले. आज तेथे मन नाही रमले.
पातळी काय फक्त प्रचाराचीच घसरते होय . खाण्याची नाही घसरत काय ?
नीर डोसा आणि कोकोनट सेवया काही तितकेसे चविष्ट नव्हते. रसम अगदीच बंडल. ( हे राजाभाऊंचे वैयक्तिक मत आहे )
कुठेतरी लांब गाडी उभी करुन "अंबा भवन " मधे जायला पाहिजे होते
No comments:
Post a Comment