Monday, January 31, 2022

राजाभाऊ , तुम्ही जेवायला बसलाय आणि तुपाच्या भांड्‍याने अगदी तळ गाठला की हो.

 राजाभाऊ , तुम्ही जेवायला बसलाय आणि तुपाच्या भांड्‍याने अगदी तळ गाठला की  हो.




महाराष्ट्राच्या घडाभाजीची आणि गुजरातच्या उधीयु ची राजाभाऊंच्या पोटात युती

 महाराष्ट्राच्या घडाभाजीची आणि गुजरातच्या उधीयु ची राजाभाऊंच्या पोटात युती





Bun maska and Irani chai at Soda water bottle Openerwala

 Bun maska and Irani chai at Soda water bottle Openerwala




मस्त पैकी थंडी आणि त्याची मजा लुटण्यासाठी .....

 मस्त पैकी थंडी आणि त्याची मजा लुटण्यासाठी .....




म्हैसुर पाक, लाडु, आणि पुरणपोळी रामा नायककडची.

 म्हैसुर पाक, लाडु, आणि पुरणपोळी

रामा नायककडची.




एक से क्या होता है. ये तो मेरी कॅवीटी मे चला गया

 भांजे 

एक से क्या होता है. ये तो मेरी कॅवीटी मे चला गया





लपले ग लाडू लपले , आणि राजाभाऊ फसले

 Suranga Daté  मस्तच. Thanks.

"हसले गं बाई हसले" गीत -पी. सावळाराम , संगीत - वसंत प्रभू

स्वर - लता मंगेशकर 

या भावगीताच्या चालीवर ....

लपले ग लाडू लपले , आणि राजाभाऊ फसले ।।

तीळ भाजुनि खोबरे भाजुनी , पाकात ते हरखुनी गेले

राजाभाऊंना गंध लाडूचा अगदी वेडे करून गेले ।

सांगायची चोरी झाली, वर्षा विचारी काय जहाले

राजाभाऊ डबा शोधती , नैवेद्यातही नाही दिसले ।

फ़ळीवर नाही,फडताळात नाही , राजाभाऊ असे कसे रुसले

फ्रीज मध्ये दुधामागे लपलेले लाडू मग ही ही करून हसले |

At Home

 



उकडीच्या मोदकांनी भरलेला डबा.

 समजा खाण्यावर खुप बंधने आलेली असतात. महाप्रचंड भुक लागलेली असते, आता रात्रीपर्यंत बहुदा उपाशीच रहावे लागणार याची पक्की खात्री असते.

आणि अश्या वेळी समोर येतो तो 

उकडीच्या मोदकांनी भरलेला डबा.

घरच्या साजुक तुपावर बंधन नसते तर किती बरं झाले असते.

लांजा बसस्थानकासमोरील सरपोतदार ह्यांची खानावळ

 पण काहीही म्हणा, राजाभाऊंचे खरे मन रमते ते ह्या अश्या साध्यासरळ भोजनात.

आता मुंबई-गोवा हमरस्त्यावर कुठे जेवायचे ह्याच्या चिंतेत असलेल्या राजाभाऊंना कोणीतरी लांजा बसस्थानकासमोरील सरपोतदार ह्यांची खानावळ सुचवली.




जेवण रुचकर होते.

 कठोर परीश्रमास पर्याय नाही असे म्हणत प्रयत्नांती कमी केलेले सहा किलो वजन .

त्यातले चार किलो परत मिळवायला फारसा प्रयास करावा लागला नाही.

त्या चार किलो मधल्या अर्ध्या किलोस कारणीभुत आहे,  

" महाराजा भोग."

एक तर एकाचेच राजाभाऊंना वेड लागलेले असते, सध्या "महाराजा भोग " चे दिवस आहेत. 

जीवनामधले अनेक आनंदाचे क्षण साजरे करतांना त्यांना सर्व प्रथम जर का कोणते भोजनालय आठवत असेल तर ते " महाराजा भोग "




जसा सोनेरी पिठलं , नारिंगी भजी,

 Suranga Daté 

यांनी आज फेसबुकवर मी टाकलेल्या फोटोंवर अप्रतिम कविता लिहीली आहे.

"आयुष्य कसं सप्तरंगात बुड्लेल असावं ...

जसा सोनेरी पिठलं , नारिंगी भजी,

पिवळी धमक पुरणपोळी ,

शुभ्र मांडे , बिस्कीट रंगाची भाकरी ,

लाल मिरचीचा ठेचा 

आणि

हिरव्यागार शेतात

निळ्या आभाळा खाली खाल्लेला हुरडा..

किंवा

एखांदी गडद निळी काशिद्याची इरकल ,

नाहीतर संत्र्याच्या रंगाशी शर्यत करणारी

तलम नारायण पेठी;

झ्हालच तर हिरवीगार रेशमी,

ताम्हिणी घाटातल्या हिरवाईची आठवण देणारी

उत्कृष्ट धारवाडी काशिद्याची आणखी एक .....

पंत ,

साड्यांमध्ये सुधा मेजवान्या असतात ,

घेउन टाका ! :-)) "

जिलेबी, मठ्ठा

 


मठ्ठा सोबत असता तर बहार आली असती.

एक जिलेबी घेतली , मठ्ठात बुडवुन खाल्ली.

दुसरी  जिलेबी घेतली , मठ्ठात बुडवुन खाल्ली.

तिसरी जिलेबी घेतली , मठ्ठात बुडवुन खाल्ली.

चौथी ........

Fish Curry Rice

 


Puranpoli

 


ते ही अशी समोर शेतातली भाजी तोडली आणि ही अशी चुलीवर शिजवलेली तर

 भर दुपारची टळुन गेलेली वेळ. 

जेव्हा तुम्हाला आज उपाशीच रहावे लागणार अशी पक्की खात्री असतांना जर समोर अनपेक्षितरित्या गरमागरम चविष्ट, रुचकर, उत्तम, सर्वोत्तम , सर्वश्रेष्ठ जेवण आले तर ? 

आणि ते ही अशी समोर शेतातली भाजी तोडली आणि ही अशी चुलीवर शिजवलेली तर ?

राजाभाऊंना किती खावु असे झाले, हाताला चटके बसतील अशी चुलीवरची गरमागरम तांदळाची भाकरी, मेथीची भाजी, पिठले आणि पावट्याची खिचडी, सोबत कांदा.

ज्यांनी येवढे उत्तम आदरातिथ्य केले त्यांचे कितीही आभार मानले तरी ते थोडेच.

"अन्नदाता सुखी भव"

Monday, January 24, 2022

तर खालुन पाचगणीला जाणारे चार घाट आहेत.

 शहाणी लोकं पाचगणीला जातातां सरळ वाईमार्गे पसरणी घाटातुन जातात, उतरतात. पण असा सरळधोप मार्गानी जातील ते राजाभाऊ कसले? काल त्यांना पाचगणीला अश्यामार्गाने जायचे होते व अश्यामार्गाने उतरायचे होते ज्या घाटातुन सर्वसामान्य पर्यटक सहसा जात नसावेत. परत नुसतेच पाचगणीला जायचे नव्हते तर त्याच्या आजुबाजुच्या डोंगरमाथ्यांवरही जायचे होते, असे डोंगरमाथे की ज्यावरुन खालचे दरीचे, खाली असणाऱ्या धरणांचे विहंगम दृश्य दिसते. ह्या भागात छोटी छोटी अनेक धरणॆ आहेत. सर्वत्र वर जाणारे, उतरणारे रस्ते उत्तम अवस्थेत आहेत.

तर खालुन पाचगणीला जाणारे चार घाट आहेत.

१. नेहमीचाच वाई-पाचगणी पसरणी घाट.

२.पाचवड-बावधन-नागेवाडी डॅम

३.कुडाळ-कर्हर-महूडॅम

४.मालदेव-सालघर-भिलार.

राजाभाऊ मालदेव-सालघर-भिलार ह्या घाटातुन वर चढले व कुडाळ-कर्हर-महूडॅम ह्या घाटातुन खाली उतरले.

कालच्या पाचगणी सहलीचे details-

७:३० पुण्यातून निघालो.

९:०० भुईंजला ब्रेकफास्ट

१०:०० मालदेव खिंड

१०:३० भैरवनाथ, मार्ली

११:०० दिवदेव, strawberries

११:३० कड्यावरचे दत्तमंदिर

१२:०० सायघर, जननी, साईबाबा

दुपारी १ ते २ जेवण, झालावाडी

२:१५ तानाजी पुतळा, गोडवली

२:३० केदारेश्वर, दांडेघर

२:४५ नागेवाडी डॅम view point

३:१५ Mapro icecream

४:०० गणपती, गणेशपेठ

५:०० भालेघर view point

७:३० पुण्यात घरी परतलो

तसेच  पाचवड-बावधन-नागेवाडी डॅम ह्या घाटाच्या घाटमाथ्यावरही ते गेले. परंतु त्या मार्गे जायचे नसल्यामुळॆ ते परत खाली उतरले. अर्धा वाई-पाचगणी घाट पण उतरुन गेले. वर मालदेवचा डोंगरमाथाही चढुन गेले.

आणि हो गावांमधे स्टॉबेरी भरपुर खाल्या हे साऱ्या सफरीचे हायलाईट.




Jhalawadi at Panchgani

 पाचगणीत राजाभाऊंचे जेवणासाठी एक ठरलेले भोजनगृह आहे. तेथे गुजराती जेवण उत्तम मिळते.








फिस्ट इंडीया कंपनी

 डेलीकसी आणि डेलीकेट हे दोन शब्द मनात उमटले जेव्हा माखनी पनीरचा पहिला घास  घेतला आणि अगदीच तशीच प्रतिक्रिया उमटली जेव्हा केशरयुक्त बदाम शोरबा या सुपचा पहिला चमचा काय ओठाला लावला तेव्हा. आणि त्या सोबतचा वारकी पराठा म्हणजे क्या कहना. भाजीला एकदम पर्फेक्ट मॅच.

लाजबाब. प्रशंशा, तारीफ करावी तेवढी थोडीच. बढीया. फेसबुकवर या रेस्टॉरंट्बद्दलच्या चांगले रिव्ह्यु वाचले होते तेव्हापासुन केव्हा एकदा पुण्याला जातो व येथे जेवायला जातो असे राजाभाऊंना झाले होते. पुण्याला पोचल्यापोचल्या लागलीच मग राजाभाऊ "फिस्ट इंडीया कंपनी" मधे पोचले.

राजाभाऊंनी अवधी फुड आयुष्यात पहिल्यांदाच खाल्ले आणि ते अवधी जेवणाच्या व ते खावु घालणाऱ्या "फिस्ट इंडींया कंपनी"च्या प्रेमात पडले नसतील तर नवलच.

अवधी जेवण. घास घेतल्या बरोबर तोंडात विरघळणारे जेवण 

मऊ मुलायम असे ते पनीर व केशर युक्त ती लाजबाब ग्रेव्ही. सोबत वारकी पराठा. बहार आली.

बिलकुल तेल नसलेले, अजीबात मसालेदार, चमचमीत नसलेले, अगदी राजाभाऊंना हवे असते तसे हे जेवण होते.

राजाभाऊ "फिस्ट इंडीया कंपनी " वर फिदा झाले आहेत

https://www.zomato.com/pune/feast-india-company-erandwane











द इटरी " ह्या फ़ोर पॉईंट्स बाय शेरेटॉन" मधल्या रेस्टॉरंटमधे.

 पंचतारांकीत हॉटेलमधे मिळणारे बुफे जेवण म्हणजे राजाभाऊंचे जीव की प्राण. 

सध्या त्यांचे जीवाचे पुणे चालले आहे. नीअरबाय.कॉम वर राजाभाऊंना एक चांगली डील मिळाली, आणि ती ही महागाईच्या काळात. चक्क ५०% टक्के सुट. एकावर एक फ्री. मग काय राजाभाऊ पोचले विमाननगर येथील "द इटरी " ह्या फ़ोर पॉईंट्स बाय शेरेटॉन" मधल्या रेस्टॉरंटमधे.

कमी किंमतीच्या मुळॆ बुफे स्प्रेड तसा मर्यादीत होता पण जे काही होते ते अत्यंत चविष्ट होते. ह्या रेस्टॉरंटची अंतर्गत सजावट उत्कृष्ट आहे. मजा आली. सर्वात जास्त आवडले असेल तर ते फ्रुट सॅलड विथ कस्ट्रड. आधीच ते राजाभाऊंची आवडीचे, मग काय हाण गणप्या हाण.

जेवण खुप आवडले. येथे परत जायला खुप खुप आवडॆल पण हे रेस्टॉरंट घरापासुन खुप दूर असल्यामुळे ते कठीणच दिसते.