Thursday, February 02, 2023

भोजनप्रिय राजाभाऊंवर अखेर नियतीनी सुड उगवला तर

भोजनप्रिय राजाभाऊंवर अखेर नियतीनी सुड उगवला तर.

डबा दिसतोय  त्यात गवारीची भाजी आहे, राजाभाऊंसाठी खास.







मस्त भेळ आणि शेवपुरी

 राजाभाऊ बाहेर चुकुन सुद्धा भेळ,पाणीपुरी, शेवपुरी खात नाहीत, भिती वाटते. 

ह्यावेळी गुहागरला गेलो असतांना समुद्रकिनाऱ्यावर भिडेकाकुंचा भेळपुरीचा स्टॉल आहे हे आठवले आणि मग काय , मस्त भेळ आणि शेवपुरी.

बऱ्याच वर्षापुर्वी त्यांच्या घरी चारपाच वेळा जेवायला गेलो होतो. तेव्हा ते पर्यटकांसाठी जेवण बनवत असतं.

या खायला

 


संयमी राजाभाऊंनी आपल्या मनावर अखेर विजय मिळवला

 संयमी राजाभाऊंनी आपल्या मनावर अखेर विजय मिळवला, जीभेवर ताबा मिळवला असे खरे तर नाही म्हणता येणार.

लालचेपोटी राजाभाऊंनी केक वरच्या स्टॉबेरी अलगद काढल्या, चांगल्या धुतल्या , अगदी संपुर्णपणे त्यावरचे क्रीम निघुन जाईपर्यंत.



हॉटेल लक्ष्मी

 एखादे उपहारगृह अगदी ग्रेट असेल  असे नाही पण तुम्ही तेथे जात रहाता, कदाचीत साधी थाळी खायला मिळत असल्यामुळे असावे.

पुण्याहुन थेऊरला गणपतीच्या दर्शनाला निघालेले राजाभाऊ पोचले पुणे-सासवड रस्तावर  खास ’लक्ष्मी हॉटेल" मधे जेवणासाठी.

खरं म्हणजे घरुन निघतांना देवस्थानात जेवायचे असे त्यांच्या मनात होते पण काय झाले देव जाणे ,दाने दाने पर लिखा है खानेवाले का नाम.

हॉटेल लक्ष्मी

भाडले वस्ती,देवाची उरळी,

पुणे सासवड  रस्ता

मो.क्र. ८३८००६९३२५ / ९९७५०२८७२१




आशा डायनिंग हॉल.

 आशा डायनिंग हॉल.

जेव्हा थाळीची किंमत रु.३५\- होती तेव्हापासुन आपटे रोड, पुणे येथील ”आशा डायनिंग हॉल मधे राजाभाऊ जेवायला जात आहेत.






श्रेयस

राजाभाऊंच्या पुणे मुक्कामी ते "श्रेयस" मधे जेवायला गेले नाहीत असं कधी होणे नाही.





गोविंदा

 रात्रीची अकरा-सव्वाअकराची वेळ. उपहारगृहाच्या समोर तुमची गाडी उभी रहाते, आणि ऐकायला लागते 

"बंद हो गया "

आजच्या रात्री पोराला चांगलसुरकं खायला घालु ह्या विचाराने राजाभाऊंनी इथंतिथं कुठेही जाण्याचा विचार न करता गाडी हाणली होती.  रात्र ही तशी फार होत चालली होती. भुकेनी मनावर आणि शरीरावर ताबा मिळवायला सुरवात झाली होती. आणि अश्यावेळी "बंद झाले " हे ऐकणे नकोसे होऊन गेलेले. 

अरे देवा, काय करु, कसं करु, कुठे जावु, काय खावु ?

पुढे "सोहम" मधे जावुन ते उपहारगृह उघडे आहे का हे पहाण्याची अंगात ताकद नव्हती आणि पुन्हा एकदा सुखसागर मधे जावुन पावभाजी खाण्याची इच्छा नव्हती.

राजाभाऊंनी मनातल्या मनात परमदयाळु राधे गुरु मॉं यांचा धाव सुरु केला. एकदा मॉं यांचा तर दुसऱ्यांदा क्रिस्ना, क्रिस्ना, हरे क्रिश्ना जप सुरु केला. भगवान श्रीकृष्णाच्या इस्कॉन मधल्या "गोविंदा" मधे जावुन परमेश्वराचा धावा न करुन कसं चालेल ?

विनंती करण्यासाठी राजाभाऊ गाडीतुन खाली उतरले, राजाभाऊंना बघुन त्या गृहस्थांचे मन द्रवले, एकदम फायनल ऑर्डर द्या म्हणाले.

मग काय आपलं नेहमीचेच, दम आलु काश्मीरी आणि डाल फ्राय.

जेवल्यावर त्या गृहस्थाचे आभार मानायला राजाभाऊ त्याला शोधत होते पण ते कुठे गुप्त झाले हे भगवानच जाणो.



वसंत सागर

 कोणत्याही उपहारगृहात जा खुप गर्दी असते. कितीतरी वेळ प्रतिक्षा करावी लागते. कंटाळा येतो आणि राजाभाऊंना ते हे असे वाट बघणे आवडतही नाही. 

मग त्यावरचा उपाय त्यांनी शोधला. 

एक अशी जागा जेथे खायला हवे असल्यास तुमच्या गाडीत आणुन दिले जाते. जागेसाठी वाट बघणॆ नको.

मग काय. बार बार लगातार.




कपात आधी एका मोठाल्या पातेल्यातले दुध आणि मग पिंपातला चहा.

 आता दुपारी चहाची तल्लफ आली खरी. हल्ली शहरामधे साधा चहा प्यावा म्हटले तरी कठीण होवुन गेले आहे, ह्या कॉफी डे, स्टासबक्सच्या काळात.

तल्लफ आली आणि राजाभाऊ पोचले गायत्री चहा पिण्यासाठी. पण हाय रे राम, आज रविवार. बंद. 

मग राजाभाऊ सिंधी चहा पिण्यासाठी गेले. 

कपात आधी एका मोठाल्या पातेल्यातले दुध आणि मग पिंपातला चहा.





खास मत्सप्रेमींकरता..

 खास मत्सप्रेमींकरता..