तुफानी बरसात. जणु काही वादळच. भिमाशंकरच्या जंगलात वाट चुकलेले ते, भटक भटक भटकुन , अनेक डोंगर चढउतार करुन कधी तरी रात्री भिमाशंकरला पोचलेले ते . झोपायला थंडगार, ओलावलेली जमीन आणि समोर आलेला आणखीन एक भलामोठा डोंगर. क्षणभर वाटले आता त्यावर चढाई करायची तरी कशी ?
गरमागरम भाताच्या एक चांगलासा डोंगर आणि बोटं व साथसाथ जीभ भाजवणारी डाळ.
अन्नदाता सुखी भव ! त्या तश्या रात्रीत भुकेल्या जीवास पुन्हा एकदा स्वयपाक करुन वाढणाऱ्या त्या बाईंचे आभार मानावे तेवढे थोडेच.
परमसुख , परमसौख्य , परमभाग्य म्हणतात ते हेच.