Wednesday, December 15, 2021

गुज्जु बेन ना नास्ता

 "गुज्जु बेन ना नास्ता"

ये क्या हो रहा है राजाभाऊ ? ये क्या हो रहा है ?

आपल्या घराजवळ "गुज्जु बेन ना नास्ता " हे एक दुकान सुरु झाले आहे ज्यात जास्त करुन गुजराती पदार्थांचा नास्ता, जेवण मिळते ह्याची कानो कान खबर तक त्यांना नव्हती.  यावर विश्वास ठेवणॆ कठीण, पण तसे झाले खरे. मग एकदा कधीतरी उडत उडत ही बातमी त्यांच्या कानावर आली, युट्युबवर माहिती काढली, पण खाणे मागवायचे काही झाले नाही, विशेष कारण असे काही नाही, पण मागवले नाही हे मात्र खरे.

आज राजाभाऊंचा प्रकटदिन. हा दिवस साजरा करायला "गुज्जु बेन ना नास्ता" मधुन गुजराती पद्धतीचे जेवण मागवु असे काल ठरले. प्रत्येक प्रयोगाच्या आधी एक ट्रेलर असतो. एक छोटीसी झलक म्हणुन मग कालच त्यांनी " थेपले-लोणचे-बटाटा सुकी भाजी-श्रीखंड, खांडवी, व पनीर समोसा मागवला. 

बटाटा सुकी भाजी बरोबर ठेपले बेहद्द आवडले, श्रीखंड तर मस्तच आणि खांडवी देखील. पण पनीर समोसे काही फारचे रुचले नाही.

आज येथुन जेवण मागवण्याचा बेत राजाभाऊंनी रहित केला.  त्यांच्या मुलांना "कॉपर चिमणी " मधुन जेवण मागवायचे आहे. मग काय घरीच गुजराती पध्दतीचे जेवण बनवले गेले.

बचेंगे तो और भी खायेंगे.

No comments: