Wednesday, August 16, 2023

ओ पुणे

 पुण्याला पोहोचल्यावर राजाभाऊंनी फेसबुक उघडले आणि "पुणे ईट आऊट " नामक ग्रुप उघडला. रिचर्स करण्यासाठी. पुण्यात जवळपास काय नविन रेस्टॉरंट आली आहेत का ते शोधण्यासाठी. 


त्यात त्यांना ’नर्हे" मधले "ओ पुणे" हे रेस्टॉरंट सापडले.  त्याचा रिव्हु उत्तम होता. मग काय राजाभाऊंच्याने रहावते काय ? दुसऱ्याच दिवशी रात्री ते " ओ पुणे" येथे पोचले जेवण्यासाठी. प्रशस्त जागा, उत्तम अंतर्गत सजावट पहाता मन प्रसन्न झाले.


स्टार्टर्स मधे "पनीर रोझाली कबाब" मागवले. समोर आली उत्त्म सजवलेली डीश. पहाताच दिल खुष झाले. पनीर रोलमधे चीज टाकुन केलेली तंदुरी डीश. चव मस्त होती. आवडली. पण झाले काय की त्यानीच पोट भरले. मग काय पुढे काहीच मागवले गेले नाही. आणखी एक गोष्ट. पनीर जरासे तिखट वाटत होते. कदाचीत काळेकाका व काळेकाकुंना तिखट खाण्याची सवय नसल्यामुळे असेल.


Tuesday, August 08, 2023

आइकिया

 एरवी काकुंनी खरेदीसाठी बाहेर चल सांगितल्यावर नाखुष असलेले राजाभाऊ "आइकिया" मधे खरेदी करायला जायचे म्हटल्यावर अगदी उत्साहाने तयार होतात.


कारण एकच. त्यांचे कॅफे. Sunday, August 06, 2023

लाल भोपळा व राजाभाऊ यांचे विळाभोपळ्याएवढे सख्य.

 लाल भोपळा व राजाभाऊ यांचे विळाभोपळ्याएवढे सख्य.

श्रेयसच्या महाराष्टीय भोजन महोत्सवात "बाकर भाजी" खुप आवडली. आधी वाटले बाकरवडीची भाजी असेल. हाणल्यावर कळाले की ही तर लाल भोपळ्याची भाजी.
हमुस

 दुबईत रहाणारा भाऊ जेव्हा घरी येतो तेव्हा राजाभाऊंना आता आपल्या दोन्ही पुतण्या भेटणार याचा प्रचंड आनंद होतो.

तसेच आणखी एक गोष्ट आपल्या मनासारखी आणि पोटासाठी बनणार ह्या विचारांनीच वेडेपिसे व्हायला होते.

राजाभाऊंची वहिनी येतांना "कुबुस" ची पाकिटे आणते आणि मग बेत रंगतो तो "हमस, कुबुस आणि सॅलॅडचा"

भरपुर ऑलीव्ह ऑईल टाकुन जेव्हा राजाभाऊ "हमस" खातात तेव्हा त्यांची ब्रम्हानंदी टाळी लागते, ते भान विसरुन मग जेवणाचा आस्वाद घेतात.

काबुली चण्यापासुन बनवतात. 

काबुली चणे सहा सात तास भिजवुन मग ते उकडुन, थंड झाल्यावर मग त्यातले पाणी काढुन मिक्सरमधुन पेस्ट करायची.मिठ, 

सफेद तिळ, ऑलीव्ह ऑईल, दही, लसुण टाकुन. वरुन लिंबु पिळायचे. 

मग तयार झालेल्या हमुसवर ऑलीव्ह ऑईल टाक टाक टाकायचे आणि मग त्याची मजा लुटायची. पिट्टा ब्रेडबरोबर पण हमस मस्त लागतो.

अन्नदाता सुखी भव., 

Hummus, Coriander Hummus,  Kuboos , Chilli Sauce and green salad (with cheese cubes inside)


दयाराम दामोदर

 हजारदिड हजार वर्षे झाली. दयाराम दामोदरकडची सुतारफेणी खावुन. ही सुतारफेणी म्हणजे काळेकाकुंची परमप्रिय. आणि जवळजवळ तेवढीच वर्षे झाली असतील दयाराम दामोदरकडचे खोबरा पॅटीस खावुन. हे राजाभाऊंना काल अगदी प्रकर्षाने जाणवले आणि मग काय नास्ता माटे डी.दामोदर मां.

पण कोणत्याही गोष्टीचे निर्भेळ सुख मिळु नये असे का नियती सांगत असते ? 

गेल्या खेपेस खोबरा पॅटीस मिळाले नव्हते. काल खोबरा पॅटीस मिळाले तर त्यासोबत चटणी नाही. लॉजीक काय तर उपवासाच्या दिवशी आम्ही चटणी बनवत नाही. 

हाय, किसीके पेट मे भुक पैदा कर देना और उसे चटनी बिना अधुरी छोड देना, भगवान तुने ये अच्छा नही किया. 

आता चटणी शिवाय खोबरा पॅटीस ? काय हा घोर प्रसंग. त्यात आधीच इन्दौरनी ह्या खोबरा पॅटीस बद्दल वाईट आदत लावुन ठेवलेली. 

बाबांनो असं करु नका, चटणीशिवाय खोबरा पॅटीस मग तो कितीही चांगला असो माणुस कसं काय खावु शकतो ?

खोबरा पॅटीस खावुन दिल नाय भरला, मग सुरळीच्या वड्या, खांडवी.  ह्या सुरळीच्या वड्या एकदम टॉप. बढीया. रस्तावर उभे राहुन हा कार्यक्रम झाला, मग सुतारफेणीचा मुख्य कार्यक्रम.

सुतारफेणी थंडगार दुधाबरोबर खुप छान लागते असे ऐकलेले, पण अजुनपर्यंत हा दुग्धशर्कारा योग काही जुळुन आलेला नाही. अर्थात त्यासाठी सुतारफेणी घरापर्यंत पोचायला लागते हा भाग वेगळा. आणि सोबत म्हैसुर पाकचा  एकच तुकडा उगीचच नावाला.
शनिवार सकाळ. "राम आश्रय" मधे

 शनिवार सकाळ. "राम आश्रय" मधे
सयाजी

 दोन दिवस जीवाचे पुणे करुन घेतले. 

 मात्र एका ठिकाणी समजुतीचा घोटाळा झाल्यामुळे पदरी निराशी पडली.

"शिगरी " आणि "शिगरी ग्लोबल ग्रील " हे दोन वेगळे प्रकार आहेत हे त्यांना ठावुकच नव्हते.  दुबईवरुन आलेल्या आपल्या पुतणीला ग्रील्ड खाद्यपदार्थ खावेसे वाटत होते म्हणुन घेवुन ते पोचले औंध ला. "शिगरी " मधे.  आधीच येथे जे हवे ते मिळाले नाही म्हणुन आणि त्यांचा बुफे स्प्रेड तेवढा आकर्षक न वाटल्यामुळे त्यांनी तो बुफे जेवण जेवायचे टाळले. मग काय एखादी भाजी, तेवढीशी मजा नाही आली.

मग रात्री त्यांनी  "बार्बेक्यु नेशन " मधे जाण्याचे ठरवले.  "बार्ब्येक्यु नेशन " ला फोन करुन करुन राजाभाऊ थकले. जागा मिळायला तयार नाही. सगळी कडे फुल. येवुन बघा, जागा झाली तर देवु. एक दिड तास वेटींग . एक तर आपण पैसा मोजायचा आणि अमर्यादित प्रतिक्षा करत रहायचे सांगितले कोणी.  मग ते सेनापती बापट रस्त्यावरच्या "मेनलॅंड चायना" मधे गेले.

आजची सकाळ उजाडली ती वादावादीने. राजाभाऊंना "आशा डायनींग हॉल " मधे जेवायला जायचे होते आणि बाकीच्यांचा नेहमीप्रमाणेच विरोध. मग ते पोचले "सयाजी " मधे.हिचकी

 "आयकीया" आणि त्यांचे कॅफे  राजाभाऊंच्या अत्यंत आवडते. 

मुंबईमधे आर सिटी मॉल मधे "आयकीया" उघडल्याचे कळले आणि मग राजाभाऊंची पावले तेथे वळली. 

तुला काय हवे ते येथे खरेदी कर हे आमिष काळेकाकुंना दाखवुन ते शिरले कॅफे मधे "व्हे. रॅप’ व उत्तम कॉफीसाठी. 

पोट तुडुंब भरले. रात्रीच्याला जेवणाची तेव्हा तरी इच्छा राहिली नव्हती. पुढचे पुढे.

काळेकाकुंची मनोसक्त खरेदी झाली. रात्र झाली. आता काय व कुठे ?

पुतणी म्हणाली " काका, "हिचकी" मधे जेवायला जावु". काकापेक्षा तिची नजर तेज. मग काय , काका ऐकल्यावाचुन राहतो काय?

राजाभाऊंचे पोट जरी आकंठ भरले असले तरी "मोहाला शरण जावे" हे त्यांचे तत्वज्ञान असल्यामुळे समोर आलेल्या "पनीर आले लबाबदार व परोठे" यांनी त्यांचे मन चळले. त्यांचा विश्वामित्र झाला.

इतरांसाठी "टायगर झिंगा व चिकन तिक्का बिर्याणी"

पोटाला फुलस्टॉप. 

"आता मुकाट्याने सरळ घरी जायचे".
एशिया किचन बाय मेनलॅंड चायना

 आज राजाभाऊंची तकदीर खुल गयी, किस्मत का दरवाजा समझो खुल गया ।

आधीच मिळालेली गिफ्ट कुपनं त्यात वरती मिळालेले झोमोटो प्रोम चे डिस्काउंट, मग काय.

कालपासुन वेध लागले होते " एशिया किचन बाय मेनलॅंड चायना " मधे जेवायला जायचे. पण आज का कोण जाणॆ कोणालच फारसे जेवण पसंद आले नाही.कॉपर चिमणी

 काकु बदमाश की काकुंची पुतणी बदमाश. 

एकजण दुसरीकडे बोट दाखवते, तिला पुढे करते, दुसरी काकीला पुढे करते.

आणि दोघींनाही वाटलं आपल्या मनात काय आहे  ,आपण सहजच म्हणुन सुरु केलेले संभाषण कुठे घेवुन जाणार आहे ते काळेकाकांना कळणारचं नाही

"घरी रात्रीच्याला जेवायला काय करायला सांगायचे आहे " 

ते 

"बघ तुच काय ते ठरव, मी काही बोलत नाही "

हा सुरु झालेला लपवाछपवीचा खेळ काळेकाकांनी तसाच मग पुढे सुरु ठेवला, त्यांच्या मनात काय आहे, कुठे जायचे आहे हे त्यांना चांगलेच ठावुक होते, पण आपण कशाला बोला करत त्यांनी अनेक पर्याय सुचवायला सुरवात केली.

"बर्गर किंग, मॅकडॉनल्ड, डॉमिनो पिझ्झा, सबवे " 

खरं म्हणजे तिघांना जायचे होते त्या वरळीच्या कॉपर चिमणी मधे.

मग काय राजाभाऊ सहकुटुंब सहपरीवार अखेरीस पोचले ते पुतणीला सी.बी. खिलवण्यासाठी. कॉपर चिमणी मधे जाणे आणि कडक मसाला रुमाली रोटी , काबुली नान न खाणे असे कधी होणे नाही. 

येथले काबुली नान मस्त असतात, नान वर काजुचे, अननसाचे, चेरीचे तुकडे, किसमीस वगैरे. सोबत आपले नेहमीचेच दम आलु काश्मिरी.


वैशालीची आणि तेथे मिळणारा चीज म्हैसुर डोसा

 वैशालीची आणि तेथे मिळणारा चीज म्हैसुर डोसा ह्याची आठवण फार येवुन राहिली होती. आता वैशाली पुण्यात, राजाभाऊ मुंबईत, कसं काय व्हायच ?


मग काळेकाकुनी तोड काढली आणि तोडीसतोड असा चीज म्हैसुर डोसा घरी बनवला. 
समथींग फिशी

 आयुष्यात प्रत्येक गोष्टीला प्रथमवेळ असते व ती केव्हा येते हे सांगणे कठीण असते. 


पुण्यावरुन परततांना वाशीला जेवायचे असे आधीच ठरले होते. राजाभाऊंनी लोणावळ्याला "मनशक्ती" मधे मिसळपाव, बटाटावडा पाव खाण्यासाठी उतरण्याचा विचार केला खरा, पण कोणीतरी तो हाणुन पाडला. असो.


वाशीला "कॅफे विहार" मधे खायला, जेवायला जाताजाता जन्म गेला पण कधीच त्याच्याच डोक्यावर असलेल्या " समथींग फिशी " मधे साधे डोकावणे पण झाले नाही.


आज मुंबईला परततांना राजाभाऊंनी "समथींग फिशी" मधे जाण्याचे ठरवले.


स्टफड टॉमेटो, बटर नान व बटर कुलचा,


जेवण खुपच आवडले. आता नेहमी येथेच जेवायला यायचे असा निश्चय करुन राजाभाऊ बाहेर पडले.