Sunday, August 06, 2023

सयाजी

 दोन दिवस जीवाचे पुणे करुन घेतले. 

 मात्र एका ठिकाणी समजुतीचा घोटाळा झाल्यामुळे पदरी निराशी पडली.

"शिगरी " आणि "शिगरी ग्लोबल ग्रील " हे दोन वेगळे प्रकार आहेत हे त्यांना ठावुकच नव्हते.  दुबईवरुन आलेल्या आपल्या पुतणीला ग्रील्ड खाद्यपदार्थ खावेसे वाटत होते म्हणुन घेवुन ते पोचले औंध ला. "शिगरी " मधे.  आधीच येथे जे हवे ते मिळाले नाही म्हणुन आणि त्यांचा बुफे स्प्रेड तेवढा आकर्षक न वाटल्यामुळे त्यांनी तो बुफे जेवण जेवायचे टाळले. मग काय एखादी भाजी, तेवढीशी मजा नाही आली.

मग रात्री त्यांनी  "बार्बेक्यु नेशन " मधे जाण्याचे ठरवले.  "बार्ब्येक्यु नेशन " ला फोन करुन करुन राजाभाऊ थकले. जागा मिळायला तयार नाही. सगळी कडे फुल. येवुन बघा, जागा झाली तर देवु. एक दिड तास वेटींग . एक तर आपण पैसा मोजायचा आणि अमर्यादित प्रतिक्षा करत रहायचे सांगितले कोणी.  मग ते सेनापती बापट रस्त्यावरच्या "मेनलॅंड चायना" मधे गेले.

आजची सकाळ उजाडली ती वादावादीने. राजाभाऊंना "आशा डायनींग हॉल " मधे जेवायला जायचे होते आणि बाकीच्यांचा नेहमीप्रमाणेच विरोध. मग ते पोचले "सयाजी " मधे.







No comments: