Saturday, December 31, 2022

ह्या ३१ डिसेंबरच्या रात्री

 पोट नुसतं तुडुंब भरलयं. आकंठ खाणे झाले आहे ह्या ३१ डिसेंबरच्या रात्री. अगदी, अगदी.


नुसती सुस्ती येवुन राहिली आहे. रात्रीचे टीव्हीवरचे कार्यक्रम बघण्यासाठी जागे रहाणे नकोसे झाले आहे. आईसक्रिम मागवण्याचा बेत तहकुब केला आहे. नाही म्हणजे तसा उदयपुरवरुन मागवलेला "मलई घेवर" सारा संपुन गेला आहे.


काळेकाकुंनी आज जरासा आगळावेगळा बेत केला, काय ते नेहमीचेच जेवण. आज जरासा खासा बेत. 

Waldof Salad.

Mashed Potato.

Chutany Sanadwich.


दिल खुष झाले. पण तेवढे "Potato Leek Soup" सुप करायचे राहिले.  असं कसं राहिले असे जर का विचारलेच असते तर रात्री १२ वाजता फुटणारे फटाके आठ वाजताच फुटले असते. 

नविन वर्षाला करीन म्हणाली आहे खरी. बघुया उद्याचे उद्याला.




Wednesday, December 28, 2022

पंचम पुरीवाला

गॉडची कसम. काल रात्री St.Thomas' Cathedral मधे  Festival Music "For Christmas & Midnight Holy Eucharist  ला जातांना राजाभाऊंच्या मनातही नव्हते आज आपण बोरीबंदरच्या  "पंचम पुरीवाला" कडे पुरीभाजी खायला जावु. नाही म्हणजे बराच काळ त्यांच्या मनात येथे जाण्याचे घाटत होते खरे पण ते एकंदरीत टाळत होते.

मग काल रात्री एक संकल्प,  जो कधीही पुरा न करण्यासाठी सोडला जातो, तो संकल्प सोडण्याआधी शेवटच्या म्हणुन पुऱ्या खावुन घ्याव्यात,   मग नव्यावर्षी वजननियंत्रणाला एकदा का सुरवात झाली की मग जवळजवळ वर्षभर हे असे तेलकट खाणे काही व्हायचे नाही असे आपल्या मनाला समझावत राजाभाऊ "पंचम पुरीवाला " कडे पोचले. काल रात्री तेथे बऱ्यापैकी गर्दी होती. काही काळ थांबाव ही लागले.

ही अशी बटाट्याची रस्सेदार भाजीची चव राजाभाऊंच्या आवडीची.  सोबत अशीच भोपळ्याची रस्साभाजी पण असते. पण ती नाही कधी खाल्लेली. "पंचम पुरीवाला " कडे संपुर्ण जेवण जरी मिळत असले तरी संबंध आयुष्यात राजाभाऊंनी ह्यांच्याकडे पुरीभाजी शिवाय दुसरे काहीच खाल्लेले नाही. त्यात परत अनेक प्रकारच्या पुऱ्या, जसे की पालक पुरी, मसाला पुरी इ.इ. मिळत असल्या तरी साध्याभोळ्या राजाभाऊंची पसंती ही फक्त साधी पुरी व साधीच भाजी ह्याला असते. 

महंगाईके जमानेमे अवघ्या पत्तीस रुपयामधे काम भागले.


Repostt














रामा नायक श्रीकृष्ण बोर्डींग

 I swear to God.  परमेश्वरा शप्पथ. आता परत ह्या वास्तुची पायरी चढायची नाही. बस झाले, किती सहन करायचे ? अमर्यादित काळाला काही बंधन ?  राजाभाऊंनी मनाशी ठरवलं, आता ठरलं म्हणजे ठरलं. 

आधीच भुक खवळलेली, धीर धरणे कठीण होत चाललेले.  दुपारचे जवळजवळ सव्वादोन वाजत येत चाललेले. आधीच भोजन करायला झालेला उशीर, जेवणाची वेळ टळुन गेलेली. ह्या अश्या मनाच्या आणि पोटाच्या अवस्थेत रांगेत उभे राहुन आपला नंबर कधी येईल ह्याची वाट बघणं नकोसे होत चाललेले. इनमिन दहापंधरा मिनिटॆच असावीत  पण ती किती प्रदिर्घ होवुन गेलेली.

अखेर आत बोलवणे आले. त्या बाई उठल्यानंतर ह्या जागी बसा करुन आज्ञा झाली. 

जेवण झाले. पानं उचलली. पण ..

एक चमचा वाटीत बुडला. वाटीत साबुदाणा पायसम. चमचा, चमच्यात पायसम, चमचा तोंडात, पायसम पोटात.

पुन्हा एक चमचा. पुन्हा एक.

चमचा काही साबुदाणा पायसम मधे बुडायचा थांबेना, पायसम काही संपता संपेना.

अखेरीस अन्नाने भरलेले ताट समोर आले, त्या आधी ताक , दही व स्वीट डिश ( कोणता पदार्थ होता हे संपला तरी कळले नाही ) आले.

एक वाटी गरमागरम रसम पोटात गेले, अगम्य चवीच्या अगम्य भाज्या खावुन झाल्या. तीनापैकी एक चवळीची व दुसरी कोबीची एवढेच कळले.

मग खरा आडवा हात मारणे सुरु झाले.

एक मुद भात रसम बरोबर.

एक मुद भात सांभार बरोबर.

एक मुद भात डाळीबरोबर.

आणि 

एक मुद भात दह्याबरोबर. 

चेवलेला भुकाग्नी शांत, अंतरात्मा तृप्त. 

विडा चघळता चघळता, परमेश्वरा, कृपा करुन माझ्या म्हणण्याचा विपर्यास करु नकोस रे, मला मी परत येणारच नाही असे म्हणायचे नव्हते. मला असं म्हणायचे होते की मी गर्दीच्या वेळात "रामा नायक श्रीकृष्ण बोर्डींग " मधे जेवायला येण्याचे टाळीन म्हणतोय. या पुढे जरा लवकरच येत जावु असे खरं तर मला बोलायचे होते.









सरसो का साग आणि मक्का दि रोटी. "ओये काके" मधे


सरसो का साग आणि मक्का दि रोटी. "ओये काके" मधे





चुल पे उदिंयो, मटन भाकरी

 It's Party Time.

वाहा रे वाहा तेरी माया

काकुने आज चुल पे उदिंयो, मटन भाकरी शिजाया.

गरमागरम तांदळाची भाकरी आणि चुलीत भाजलेली बटाटी.

रात्रीची आतुरतेने वाट पहाणारे राजाभाऊ.





जो हात पुढे झाला तो राजाभाऊंचा हात नव्हता.

 जो हात पुढे झाला तो राजाभाऊंचा हात नव्हता.






राजधानी रसवोरा

 पॅलेडीयम मॉल मधल्या फुडहॉल मधे शिरतांना राजाभाऊ नेहमीच डोळ्याला झापड लावत आलेले. 

"राजधानी "चे "राजधानी रसवोरा" काय झाले आणि गुजराथी थाळीची किम्मत दुपटी पेक्षा  काय वाढवली गेली. मनात येथे जेवायला जाण्याची जबरदस्त लालसा पण दामाजीपंतांची तेथे राजाभाऊंना नेण्याची इच्छा नसणे. आपले उगीच इकडेतिकडे न बघता सरळ फुडहॉल मधे शिरलेले बरे. आता या फुडहॉल मधे अनेक खाद्यपदार्थ चवीसाठी बाहेर ठेवलेले असतात,त्यांची बेकरी जबरदस्त आहे , पण ती गोष्ट वेगळी.

आज राजाभाऊंना नवा शोध लागला. ह्या "राजधानी रसवोरा" नी मधल्या वेळात खाण्यासाठी काही पदार्थ ठेवले आहेत.  आत धडक शिरण्यापुर्वी जरा किंमतीचा अंदाज घ्यावा करत काऊंटरवर मेन्यु चाळला आणि एका पदार्थाने त्यांचे लक्ष वेधुन घेतले आणि पोटाला तेथे नेण्यासाठी भाग पाडले.

सराफा, इन्दौर आणि भुट्टे का कीस. राजाभाऊंचा विक पॉईंट . मग ही डिश  मागवणे आलेच आणि ह्याला काही इन्दौरची सर नाही हे बोलणे ही खाताखाता आलेच. 

मागे कितीतरी वर्षापुर्वी "स्वाती" मधे , "सम्राट"  मधे, "सोहम" मधे " पानकी " खाल्याची अंधुकशी आठवण.

 "तृप्ती " मधे नेहमीच हा पदार्थ खायला खायला जावुन न खाता बाहेर राजाभाऊ पडलेले.  कारण एकच. एवढे पैसे देण्याचे जीवावर आलेले. 

पण आज कोणतीही सबब न सांगता "पानकी " खायचीच खायची ठरवल्यामुळे  मग "राजधानी रसवोरा" मधे ती मागितली.  हा एक मस्त पदार्थ आहे.

आता येथे परत कोणाला तरी घेवुन यायचे असे ठरवत ते दोघे मग मजेत बाहेर पडले.

Old post

पण शेवटचा दाणा हा नेहमीच खवटच का निघतो

 खिशात हात घातल्यावर काल खालेल्या शेंगांपैकी काही शिल्लक असलेल्या शेंगा हाती लागणे म्हणजे बोनसच .

पण शेवटचा दाणा हा नेहमीच खवटच का निघतो

Monday, December 26, 2022

क्रिम सेंटर

 राजाभाऊंची जीवाची मुंबई काय जीवाचा नाताळ चाललाय. नुसती चंगळ चालली आहे.


आज राजाभाऊ गिरगाव चौपाटीवरच्या "क्रिम सेंटर" मधे जेवायला गेले. त्यांना तेथे छोले भतुरे खायचे होते जे "क्रिम सेंटर" मधे फार प्रसिद्ध आहेत.


पण आयत्या वेळी विचार बदलला. विचार बदलुन पस्तावले. एकही सिझलर्स खातांना राजाभाऊंना मजा आली नाही. सिझलर्स आणताना त्यातुन ज्या वाफा निघतात, चुरचुर आवाज येतो त्याचा पत्ताच नाही, त्यात ते जरासे थंड पण होते. 


एक तर चांगलीच निराश झाली व एवढे मोठे पैसे वाया गेल्याचे वाईट वाटले.













Saturday, December 24, 2022

आइकिया

 जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही हे मात्र खरं.


राजाभाऊंनी डायटींगला दोन दिवसापुर्वी सुरवात केली आणि आज "आइकिया" मधे मजा मारली.


जाऊद्या म्हटले नाताळ आहे.


काळेकाका जरा जपुन.