Wednesday, December 28, 2022

राजधानी रसवोरा

 पॅलेडीयम मॉल मधल्या फुडहॉल मधे शिरतांना राजाभाऊ नेहमीच डोळ्याला झापड लावत आलेले. 

"राजधानी "चे "राजधानी रसवोरा" काय झाले आणि गुजराथी थाळीची किम्मत दुपटी पेक्षा  काय वाढवली गेली. मनात येथे जेवायला जाण्याची जबरदस्त लालसा पण दामाजीपंतांची तेथे राजाभाऊंना नेण्याची इच्छा नसणे. आपले उगीच इकडेतिकडे न बघता सरळ फुडहॉल मधे शिरलेले बरे. आता या फुडहॉल मधे अनेक खाद्यपदार्थ चवीसाठी बाहेर ठेवलेले असतात,त्यांची बेकरी जबरदस्त आहे , पण ती गोष्ट वेगळी.

आज राजाभाऊंना नवा शोध लागला. ह्या "राजधानी रसवोरा" नी मधल्या वेळात खाण्यासाठी काही पदार्थ ठेवले आहेत.  आत धडक शिरण्यापुर्वी जरा किंमतीचा अंदाज घ्यावा करत काऊंटरवर मेन्यु चाळला आणि एका पदार्थाने त्यांचे लक्ष वेधुन घेतले आणि पोटाला तेथे नेण्यासाठी भाग पाडले.

सराफा, इन्दौर आणि भुट्टे का कीस. राजाभाऊंचा विक पॉईंट . मग ही डिश  मागवणे आलेच आणि ह्याला काही इन्दौरची सर नाही हे बोलणे ही खाताखाता आलेच. 

मागे कितीतरी वर्षापुर्वी "स्वाती" मधे , "सम्राट"  मधे, "सोहम" मधे " पानकी " खाल्याची अंधुकशी आठवण.

 "तृप्ती " मधे नेहमीच हा पदार्थ खायला खायला जावुन न खाता बाहेर राजाभाऊ पडलेले.  कारण एकच. एवढे पैसे देण्याचे जीवावर आलेले. 

पण आज कोणतीही सबब न सांगता "पानकी " खायचीच खायची ठरवल्यामुळे  मग "राजधानी रसवोरा" मधे ती मागितली.  हा एक मस्त पदार्थ आहे.

आता येथे परत कोणाला तरी घेवुन यायचे असे ठरवत ते दोघे मग मजेत बाहेर पडले.

Old post

No comments: