Friday, December 09, 2022

ए. रामा नायक उडीपी श्रीकृष्ण बोर्डींग

आज  राजाभाऊंनी किती वाट्या गरमागरम "रसम" प्याल्या याची मोजदाद ठेवली नाही. पण त्याने काय झाले पोटात तेवत असलेला अग्नी अधिकच प्रज्वलीत झाला, जणु अग्नीत तुपच.


शुद्ध, सात्विक अन्न.  तीन भाज्या, सहा पुऱ्या, रसम, सांबार, पापड, ताजे बनवलेले लोणचे, दही, आणि हवी असल्यास स्वीट डिश (त्याचे वेगळे पैसे) अर्थात हे झाले  मर्यादीत थाळीत. पण थाळीत भाज्या कोणत्या आहेत ते कधी फार कळत नाही. एकमात्र खरं त्यांची चव अप्रतिम असते


येथे केळीच्या पानावर अमर्यादीत भोजन देखील मिळते, पण मर्यादीत जेवणातच पोट एवढे भरते की बोलायची सोय नाही.


ता.क. आंब्याचे श्रीखंड अफलादुन होते.


जेवणाची सांगता दोन "बीडा" खाऊन झाली.













No comments: