Sunday, December 04, 2022

लॅंडमार्क / आस्वाद

 काही काही रेस्टॉरंटमधे गेल्यानंतर मनात एक प्रकारची अस्वस्थता येते. येथे जेवु नये असे वाटते. भले त्याची अंतर्गत सजावट चांगली असली तरी.


काल राजाभाऊंच्या बाबतीत असच झाले. सेनाभवनच्या समोरच्या कोहीनुर स्वेयर मधल्या वेस्टसाईडमधे कपडे खरेदी करायला जायचे व तेथे अनेक रेस्टॉरंट आली आहेत तेथे कोठेतरी जेवायचे असा बेत ठरला.


शिरल्यासमोर "लॅडमार्क" नामक रेस्टॉरंटचा बोर्ड दिसला. डीनर बुफे रु.५४९/=.


राजाभाऊ खुष झाले. आनंद गगनात मावेनासा झाला. आधीच बुफे परमप्रिय त्यात परत  किंमतही माफक.


राजाभाऊ मनोसक्त खरेदी केल्यावर "लॅंडमार्क" मधे पोचले.


"चालत नाही म्हणुन बुफे लावत नाही. हवे तर टेबलावर बुफे सर्व्ह करु"


राजाभाऊंच्याने हे लॉजीक काय आहे हे समजले नाही. तेथुनच नर्व्हसपणाला सुरवात झाली. एखादी पंजाबी डिश खाऊ असे मनाशी ठरवले खरे पण तेथे जेवावेसे वाटतच नव्हते.


मग काय राजाभाऊ तेथुन निघाले ते समोरच्या "आस्वाद" मधे थाळी खायला.








No comments: