Monday, December 05, 2022

पूर्णिमा रेस्टॉरंट

 दोन प्रश्न. दोघांना पडलेले दोन प्रश्न. दोघांना पडलेले वेगवेगळे दोन प्रश्न. 

वेगवेगळे दोन प्रश्न पण ते एकाच्याच संदर्भातले.

"आपल्या नवऱ्याला घराबाहेर तो पडला रे पडला की महाभयानक भुक कशी लागते ? " 

आणि त्याला पडलेला प्रश्न 

" अरे आपण या विभागामधे गेल्या हजारदिड हजार वर्षात लाखो वेळा आलेलो असु, पण एकदाही ह्या जागी आत शिरावेसे ह्या आधी कधीच कसे का वाटले नाही ? "

"पूर्णिमा रेस्टॉरंट" 

पुर्वी कधीतरी ह्या उपहारगृह कम भोजनालयाबद्दल राजाभाऊंनी त्यांच्या एका स्नेह्यांकडुन तेथल्या जेवणाची तारीफ ऐकलेली. त्याच वेळी राजाभाऊंनी ठरवले होते  जेव्हा केव्हा आपण "बॉम्बे हाऊस " कडे जावु तेव्हा ह्या उपहारगृहास जरुर भेट देवु. तेथे जाणे झाले खरे पण आत जाणे काही जमले नाही. सोबतच्या कोणाला तरी " याझदानी" मधे जावुन बनमस्काचहा खाण्यात जास्त दिलचस्पी जी होती आणि राजाभाऊंचे काय दिवस भरले आहेत का की त्या इच्छेविरुद्ध वागायचे ? 

तर आज " जहांगीर " मधे भरलेल्या एका चित्रप्रदर्शनाला जातांना अचानक राजाभाऊंच्या मनानी अचानक उचल खाल्ली व ते डोसे खाण्यासाठी "मधेच बसमधुन उतरुन "पूर्णिमा रेस्टॉरंट " मधे गेले.

छोटेसे आणि साधेच पण अगदी स्वच्छ असलेले हे उपहारगृह राजाभाऊंना खुप भावले. रवा डोसा ही खुप आवडला व सांबार देखील. त्यांना जसा हवा असतो अगदी तस्साच तो डोसा होता. अनेक खाद्यपदार्थ राजाभाऊंना मोहवत होते विशेष करुन "मिक्स फ्रुट हलवा ". पण त्यांनी आपल्या मनाला आवरले. 

आता पुढच्या वेळी मुद्दामुन, ठरवुन साऊथ इंडीयन मिल्स खाण्यासाठी येवु असे मनात ठरवुन राजाभाऊ बाहेर पडले.

https://www.zomato.com/mumbai/poornima-fort









Re-post


No comments: