Sunday, February 27, 2022

छोले कुलचे, ओये काके मधे

 


जळजळीत उन आणि थंडगार कलिंगड.

 जळजळीत उन आणि थंडगार कलिंगड.


कलिंगड खाऊन पोट भरु शकते हे आज राजाभाऊंना कळले.

गरमागरम बटाटा भजी

 





चना चाट


 

हे काय रताळ्याची खीर नाही केलीस

वास्तविक पहाता उपवासाची बटाट्याची भाजी, साबुदाणा खिचडी, उपवासाची मिसळ, रताळ्याची भाजी, रताळ्याचा कीस, राजगिऱ्याच्या पुऱ्या, वरीच्या तांदळाचा भात, पचडी , एवढं सारं खात असतांना " हे काय रताळ्याची खीर नाही केलीस " हा प्रश्न विचारल्याबद्दल राजाभाऊंच्या डोक्यावर टेंगुळच यायला हवे होते.

ह्या साऱ्या उपवासाच्या पदार्थाच्या सोबत आणखी काही खाता खाता ते आज वाचले

कुल्फी. ज्योतीबाच्या देवळाजवळ


 

ओल्याकाजुगराची उसळ

 काळेकाकांवर काळेकाकु एकदम नाखुष का झाल्या ?

काळेकाकाच्याकडे बघुन ते वेटर एकदम खुष होवुन स्मितहास्य करुन का राहिले ? 

कारण एकच "दोन"

या दिवसात चाहे इकडची दुनिया तिकडे होईल, पण दुनियाकी किसीभी ताकद काळेकाकुंना ओल्याकाजुगराची उसळ खाण्यापासुन रोखु शकत नाही.

स्थळ. कोल्हापुरी चिवडा. गिरगाव.

फोटो काढायला झालेला क्षणिक विलंब आणि काळेकाकांच्या हातुन   खातांना  टेबलावर पडुन वाया गेलेले दोन काजुगर.

सोबत पुरी वगैरे ना मागवत नुसतीच उसळ मागवल्याने विचारात पडलेले वेटर.

आणखीन एक ओल्याकाजुगराची उसळ मागवल्यावर एकदम खुष झाले.

दिलखुलास हसत आत उसळ आणण्यासाठी गेले.


old post


Wednesday, February 23, 2022

ओले काजु आले



 

सजावट

 



उडीपी बोर्डींग. फोर्ट.

 आज राजाभाऊंनी आकंठ भोजन केले. मनासारखे. भरपेट. कितीतरी बऱ्याच दिवसानंतर. आत्मा तृप्त.

रसम, सांबार, दोन मुद भात, मद्रास काकडीची भाजी, चवळीच्या शेंगाची भाजी, चवळीच्या दाण्यांची आणखीन एक भाजी. मस्त लोणाचे. 

वरती पायसम पण.

उडीपी बोर्डींग. फोर्ट.

उडीपी बोर्डींग. फोर्ट.

प्रकाश दुग्धमंदिर.

 काल राजाभाऊंनी एक रुचीप्रयोग केला.

प्रकाश दुग्धमंदिर. फडाकेवाडी समोर.

राजाभाऊंनी मागवलेली काहीशी तिखट असलेली दहीमिसळ. 

काळेकाकुंनी मागवलेली गोडुस असलेली उपवासाची दहीमिसळ.

एक चमचा दहीमिसळीचा, एक चमचा उपवासाच्या दही मिसळीची. 

तिखट आणि गोड असे आलटुन पालटुन खातांना मजा आली.

आस्वाद

 अखेरीस आज तडफडणारा जीव शांत झाला, जिव्हेची तृप्ती झाली, आत्मा समाधान पावला आणि आधीच लंबोदर असलेले राजाभाऊ काहीसे अधिकच लंबोदर होवुन राहिले.

किती वाट बघायला लागली, एक साधी गोष्ट पण ती मिळवायला किती प्रतिक्षा करायला लागली ?  जेव्हा जेव्हा जागतीक स्तरावरचे मानांकन मिळालेल्या मिसळीचा "आस्वाद" घ्यायला जायचे तेव्हा तेव्हा बाहेर प्रतिक्षेत असलेली गर्दी बघुन राजाभाऊ हबकुन जायचे व माघारी फिरायचे. पुढे "प्रकाश" मधे जायचे. भुलेल्या पोटी अन्नाची वाट बघत रहाणे हे फार क्लेषकारक असल्यामुळे. आज हे दुष्टचक्र संपायचे होते. सेनाभवनवरुन पुढे जातांना राजाभाऊंनी "आस्वाद" च्या बाहेर गर्दी किती आहे ह्याची टेहाळणी केली. कमी गर्दी दिसली तेव्हाच ठरले होते आज येथेच. काम आटोपले आणि मग काय काळेकाकुं सोबत काळेकाका "आस्वाद" मधे , मिसळ आणि पोळाउसळ खायला.

आत शिरायला, टॆबल मिळायला फारशी वाट बघायला जरी लागली नाही तरी पण नशिबी जो विलंब व्हायचा होता तो होवुन गेला.  अशी जागा मिळाली की टेबल आणि खुर्ची यांच्यामधे राजाभाऊंचे पोट आडवे आले. दोघांच्या मधे शिरता आले तरी बसता नाही आले. मग योग्य ते टेबल मिळायला अंमळ थांबावे लागले.

टॉमेटो सार. पोळाउसळ  आणि ज्या मिसळीला पुरस्कार मिळाला ती मिसळ, दही मिसळ.शेवटी खरवस.