Monday, February 21, 2022

गोविंदा





 हरे क्रिस्न, हरे क्रिस्न.

आज सात्विक आहार.

कांदा, लसुण वर्जीत.

कधी तरी बंधनं , पथ्य झुगारुन द्यावीसी वाटतात. 

या खेपेस ही भावना अंमळ उशीराच मनात निर्माण झाली म्हणायचे. 

मग राजाभाऊंनी काळेकाकुंना सकाळी सांगितले , "आज गोविंदा आपण दिवसभर भटकायला जायचे"

का कोण जाणे गिरगाव चौपाटी वरच्या इस्कॉन मधल्या " " मधे जाणॆ राजाभाऊंनी सोडले होते , ते उपहारगृह जणु विस्मरणात गेले होते. मग आज अचानक ते  स्मरले आणि राजाभाऊंची गाडी सात्विक जेवण जेवायला "गोविंदा" मधे पोचली. 

हे एक छानसे उपहारगृह आहे, सकाळी गेल्यामुळे गर्दीही फारसी नव्हती. निवांत बसता आले.

दम आलु काश्मिरी, खस्ता रोटी आणि सोबत कांदा ? अं.हं, चक्क कोबी.  

जेवणाची चव अप्रतिम होती. आज जेवण खुप आवडले.मग काय बोटं चाखत खाणे काय असते याचा पहिला अनुभव राजाभाऊंनी घेतला.






No comments: