Tuesday, December 21, 2021

साऊथ ऑफ विंध्याज

 साऊथ ऑफ विंध्याज " मधे राजाभाऊंनी जेवणाची मजा किती लुटली त्यासाठी. आनंद , परमानंद.

एक तर ताटातले सर्व पदार्थ आवडीचे ( एक सोडुन, पालकची भाजी ) त्यात परत मस्त माहोल. मग काय राजाभाऊंनी आडवा हात मारला.

एक वाटी पायसम आणि आणखीन एक वाटी पायसम, परत एक वाटी पायसम. अवियल, व्हे.स्टू, भेंड्याची भाजी, दही भात, सांबार भात, लेमन सेवया, एक वाटी घट्ट दही, सोबत अनेक प्रकारची लोणची. ह्या "साऊथ ऑफ विंध्याज " मधे जाण्याचे आणखीन एक कारण होते. अप्पम. जेवणाच्या टेबलाजवळ एक टॉली उभी रहाते , तिच्यात मग अप्पम बनवत रहातात. अप्पम तयार झाला रे झाली की डायरेक्ट पानात, गरमागरम. मग काय अप्पम वर अप्पमवर राजाभाऊंनी जो ताव मारला की बस रे बस.

स्थान ग्रहण केले. समोर एक गृहस्थ पाण्यानी भरलेला मग आणि भांड घेवुन उभे. गुलाबपाण्यानी हात धुवायचे व सुवासिक हातांनी भोजन ग्रहण करायचे.

आधी समोर आला तो ताकाचा एक ग्लास. ताक बाकी मस्तच होते, अजुन एक ग्लास चालले असते. त्यानंतर "आरंभ" समोर यायला सुरवात झाली. मस्तपैकी गरमागरम कांद्याची भजी. येथे जरा राजाभाऊंचा गोंधळ उडला, कांद्याची भजी खावुन झाल्यानंतर त्यांनी "स्टार्ट्र्स " आणायला सांगितले. मग त्यांना कळाले की कांदा भजी हीच स्टार्ट्र्स होती . मग समोर आले ते रसम, एकदम कडक. त्यानंतर भोजनाचे भरलेले ताट. सोबत घट्ट दही आणि दही भात. शेवटी सांबारभात, लेमन सेवया आणि मग पुनरागमन.

जेवण एवढे आवडले, एवढे आवडले की बोलायची सोय नाही. आज राजाभाऊ अगदी समाधानाने जेवले.

पण परत जाणॆ नाही. थाळीचा दर बघुन जीभ बाहेर येते.









No comments: