Saturday, December 25, 2021

मराठीने भुलवले अमराठींना. विनय

मराठीने भुलवले अमराठींना. 

कालच्या मराठी भाषा दिनाचे औचित्य साधुन मराठी माणसाच्या मराठमोळं खाद्यपदार्थ मिळणाऱ्या उपहारगृहात जावुन मराठी माणसांचे लाडके असे मिसळ व बटाटावडा खाण्याचे ह्या मराठी राजाभाऊंच्या मनी आले. 


काही कारणॆ ते काल राहुन गेले. रुखरुख लागुन राहिली.


मग काय आज भल्या सकाळी राजाभाऊंनी "विनय" गाठले. जणु त्यांचे दरवाजे उघडावयासी राजाभाऊ तेथे गेले असे जरी म्हणता येत नसले तरी जाणॆ हे जरासे लवकरच होते.  लवकर असुनही बऱ्यापैकी काय चांगलीच गर्दी होती.


"विनय" चे जवळजवळ ८० % ते ९० % आश्रयदाते हे अमराठी असावेत असे जर का म्हटले तर तो अतिशयोक्ती अलंकाराचा प्रयोग म्हणता येणार नाही.   "विनय" ची भुरळच तशी आहे.


मिसळपाव. बटाटावडा पाव. दही मिसळ.  


कुरकुरीत असे बाह्यआवरण असलेला साबुदाणावडा खाण्याचा विचार मात्र आता मराठी प्रेमाचा अतिरेक नको म्हणुन तेवढा मनातच ठेवावा लागला.


एखाद्याला असे बोलणॆ योग्य ठरेल.

Old post



No comments: