Thursday, December 23, 2021

माणदेशी महोत्सव.

 Old post 


गेले चारपाच दिवस झाले राजाभाऊंची बैचैनी खुप वाढली होती, आतुरतेने वाट बघणॆ, बघणे म्हणजे किती पहाणे ? केव्हा एकदा शनिवार रविवार उजाडतो असं झालं होतं.


शनिवार उजाडला. अनेकदा असं होतं की आपण ज्याची वाट बघत असतो तो दिवस उजाडला तरी त्या दिवशी आपण कशासाठी , कसली किंबहुना वाट बघत होतो हे विसरुन जातो. राजाभाऊचं आता वय झाले, विस्मरण लवकर होते, होते खरे आणि ते पण ज्याच्या साठी ते जगत आहेत त्याचे.


काळेकाकुंनी आठवण करुन दिले नसती तर किती बरं झाले असते, निदान निराशा तरी पदरी पडली नसती. 


हे खावु का ते ? हे खाईन, ते खाईन असे मनात मांडॆ खाणारे राजाभाऊ रिकाम्या पोटाने आत शिरले आणि रिकाम्या पोटाने बाहेर आले. कसले मांडे नी कसलं काय !


काय पन नाय. 


आता भणंग, उसाचा रस, चणे शेंगदाणे के काय खाणे झाले ? 


केवढे बेत रचले होते पण खाण्याचा, जेवणाचा एकही स्टॉल नसावा ? 


कोण तो वर्तमानपत्रात बातमी देणारा  ? राजाभाऊंच्या समोर आणा त्याला म्हणावं.


पण एक मात्र खरे, रिकाम्या पोटाने जरी बाहेर पडले ह्याच्या अर्थ असा होत नाही की रिकाम्या हाताने ते बाहेर आले.


तशे खरेदी मात्र दणकट झाली, आपली पिठं, कडधान्य, चटण्या, कणसं,अमुक तमुक.


माणदेशी महोत्सव.


No comments: