Saturday, December 25, 2021

 जाभूंळपाड्याला सकाळी राजाभाऊ पोचले. तेथले कडकडीत ऊन बघुन ते नाराज झाले. थोडातरी पाऊस असायला हवा होता असे राजाभाऊंना राहून राहून वाटुन राहिले होते. 


पण त्या सकाळी राजाभाऊंना कुठे ठाऊक होते ही आपली नाराजगी आज येथेच, ह्याच जाभूंळपाड्यात दूर व्हायची आहे, पाण्याच्या वर्षाव झाला नाही म्हणुन काय झाले, ते जे काही परमप्रिय मिळाले ना, बस रे बस, भरुन पावले, जिवनाचे सार्थक झाले.


केवळ चहा पिण्यासाठी दुपारी एका ठिकाणी राजाभाऊ आत शिरले काय आणि आधीच आपले तुंदलतनु असलेल्या पोटाचा घेरा आणखीन बऱ्यापैकी थोडा वाढवुन बाहेर काय आले. 


चहा पिता पिता राजाभाऊंची नजर एके ठिकाणी चांगलीच खिळून राहिले, डोळे चमकू लागले, हात आणि पोट जरा जास्तच शिवशिवत राहिले.


अर्थात समाधान हे ज्याचे त्याचे. कुणाचे एका घासात पण होवु शकते तर कुणाचे पाचव्या नगात.


उकडीचे मोदक. उत्तम, सर्वोत्तम, सर्वश्रेष्ठ उकडीचे मोदक. मोदक आणि मोदक. पोटात गेले ते उकडीचे मोदक. बांधुन घेतले ते उकडीचे मोदक. 


चविष्ट उकडीचे मोदक. परमप्रिय उकडीचे मोदक.


आता वेध पुढच्या महिन्यातल्या खेपेची.




No comments: