गेलॉर्ड.
चर्चगेट, मुंबई येथील एक रेस्टॉरंट व बेकरी. या ठिकाणी जेवायला राजाभाऊ एकदाच गेले होते. होते असं केव्हा तरी. एखाद्या जागी परत जाणॆ होत नाही. त्याला काही कारण असेल असे नाही. पण त्यांच्या बेकरीत मात्र राजाभाऊंचे वरचे वर जाणॆ होते. कधी विविध प्रकारचे उपलब्ध असलेले पाव घेण्यासाठी, उत्तम दर्जाच्या पेस्ट्री, केक घेण्यासाठी, व्हे. पॅटीस खाण्यासाठी आणि हो नाताळाच्या दिवसात प्लम केक घेण्यासाठी.
ह्या ठिकाणाची एक आठवण राजाभाऊंच्या मनात घट्ट बसली आहे.
रात्री ते येथे काहीतरी खात बसले होते. बाहेर एका टॅक्सीतुन दोघेजण उतरले. अगदी साधी दिसणारी माणसं पायात चप्पल, बुशशर्ट. चेहरा ओळखीचा वाटतो म्हणुन निरखुन पाहिले तर काय गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर. एवढे साधे राजकीय व्यक्तीमत्व आयुष्यात कधी पाहिले नव्हते.
No comments:
Post a Comment