प्रत्येक वेळी अटकमटक चटक उसळ मधे लिंबु पिळतांना एक भीती सतत वाटत रहाते.
आणि ती बऱ्याच वेळा खरीही ठरते.
कितीही काळजी घेतली, कितीही बिया काढुन टाकल्या तरी नेमकी एखादी बी त्या उसळीमधे जावुन पडतेच.
बोटांनी ती अलगद काढायला जावी तर नेमकी तळाशी जावुन गायब होते.
चमच्यानी ती शोधुन काढुन टाकण्याचे असफल झालेले प्रयत्नानंतर मग प्रत्येक घासासरसी भीती वाटत रहाते, नेमकी ह्या घासाबरोबर ती बी चावली जाणार आणि तिच्या कडवडपणा तोंडात पसरणार, उसळीची मजा घालवणार.
No comments:
Post a Comment