Wednesday, December 15, 2021

गुज्जु बेन ना नास्ता

 पुन्हा एकदा "गुज्जु बेन ना नास्ता"

गेल्या आठवड्यामधेच " गुज्जु बेन ना नास्ता" मधुन नास्ता मागवुन झाला होत, खुप आवडला होता.

परवाचाच दिवस. 

राजाभाऊंनी काळेकाकुंना सांगितले "तुझी तब्बेत बरोबर दिसत नाही. आज तुझा विश्रांतीचा दिवस. आपण सकाळी बाहेरुन जेवण मागवायचे." (काय हा मोठा कळवळा? सारे काही आपल्यासाठीची खटपट, खटाटोप )

बाहेरुन म्हणजे "गुज्जु बेन ना नास्ता" मधुन.  राजाभाऊंना खुप भुक लागली होती. दुकानात भोजन व्यवस्था सुरु होण्यास वेळ होता, राजाभाऊंच्याने धीर धरवत नव्हता त्यांनी दुकानवाल्यांना नुसते भंडावुन सोडले. अखेर झोमॅटोबाबा प्रसन्न झाले, दार उघडले मग काय पुढच्याच क्षणी ऑर्डर.

या दुकानात बसुन जेवणाखाण्याची सोय नाही. घरी मागवावे लागते किंवा पार्सलतरी घावे लागते.

मटर पनीर, छोले आणि सुरती डाल 

मटर पनीरची चव अफलादुन होती, बोटे चाटत चाटत भाजी खाली. पनीर तर एकदम मऊमुलायम. बढीया.

पण एक गडबड झाली. भाज्या पंजाबी मागवल्या गेल्या, अगदी गुजराती पद्धतीने बनवलेल्या असल्यातरी. आता पुढच्या वेळी केवळ "शाक आणि शाक"

No comments: