Sunday, June 17, 2007

पण असे का ?

मला समजत नाही की
काम करत असताना आपले दोन्ही हात बरबटलेले असतात, नेमकी तेव्हाच नाकाला खाज का येते ?

बस थांब्यावर ऊभी असलेली बस पकडण्यासाठी समोरुन धावत येणारी माणसे बघुन देखील , ज्यात वयोवृद्ध , बायका, मुले सुद्धा असताना, त्यांच्या कडे कानाडोळा करीत बसचालक बेदरकारपणे न थांबता, त्यांना न घेता निघुन का जातो ?

बसमधे माणसे चढत असताना त्यांना पुर्णपणे आत येवु देण्याआधीच बसचालक घंटी मारुन बस सुरु करायला का लावतो?

ट्रेन मधे आतील माणसे उतरण्याआधीच रानट्यासारखी फलाटावरील माणसे हल्लाबोल का करतात ?

शेवटचा शेंगदाण्याचाच दाणा नेमका खवट का असतो ?

हवामान वेधशाळेचे पावसाच्या संबंधी अनुमान नेहमीच कसे चुकते ?

रविवारी उपहारग्रुहात प्रचंड गर्दी असते, तासनतास आपला नंबर येण्यासाठी भुलेल्या पोटी ताटकळत उभे रहायला लागते, घाईगर्दीत चांगले , निवांत खायला मिळणार नाही हे ठावुक असतानादेखील लोक ईतर दिवशी न जाता रविवारीच का जातात ?

साडीच्या दुकानात दुसरीने निवडलेली साडीच नेमकी आपल्या मनात का भरते ?

जेव्हा आपल्याला प्रचंड भुक लागलेली असते तेव्हाच नेमके बायकोला खायला काहीतरी करायचा कंटाळा आला असतो व भुक नसते तेव्हा खाईये खाईये हा आग्रह का होतो ?

पुण्यात दुकानात, उपहारग्रुहात भल्या सकाळीच पदार्थ संपलेले कसे असतात ?

देवदर्शनासाठी शेकडो, हजारो मैलचा प्रवास करुन , तासंनतास दिवसभर रांगेत उभे राहुन, भक्तांना फक्त एक-दोन सेकंद मुर्तीचे दर्शन सुद्धा धडपणे मिळत नाही

येखादे ठिकाण , जागा, गाव, शहर आपल्याला खुप खुप आवडलेले असते, तेथे परत भेट द्यायचीच हा आपण ठाम निश्चय परत परत केलेला असतो, पण परत जाणे होतच नाही .

अपुर्ण.

No comments: