Thursday, June 14, 2007

श्रीमती प्रतिभाताई पाटील यांचे अभिनंदन


आपल्या श्रीमती प्रतिभाताई पाटील यांचे राष्टपतीपदाच्या उमेदवार म्हणुन सर्वमताने निवड झाल्याबद्द्ल त्यांचे हार्दीक अभिनंदन . त्या भारताच्या पहिल्या महिला राष्टपती असतील. आणि ह्या पहिल्या मराठी वक्‍ती असतील तसेच पहिल्यांदाच राष्टपतीपद आपल्या महाराष्टातील वक्‍तीला मिळणार आहे.

गेल्याच महिन्यामधे मला त्यांना अगदी जवळुन पहाण्याची , ऐकण्याची संधी मिळाली होती. कल के कलाकार संमेलनाला श्रीमती प्रतिभाताई पाटील प्रमुख पाहुण्या म्हणुन खास राजस्थान वरुन आल्या होत्या. त्यांचे तेव्हाचे मोजकेच व समर्पक भाषण ऐकुन मी फार प्रभावित झालो होतो.
श्रीमती प्रतिभाताई पाटील यांचे हार्दीक अभिनंदन व त्यांना शुभेच्छा.

आपल्या महाराष्टातील सर्व मराठी राजकीय पक्ष श्रीमती प्रतिभाताई पाटील यांच्या पाठीशीच आपापसातले मतभेद व खेकडाव्रुत्ती विसरुन रहातील ही आशा.

महाराष्ट्रात कॉंग्रेसशी एकनिष्ठ असलेल्या मोजक्‍या ज्येष्ठ व्यक्तींमध्ये प्रतिभा पाटील यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. खानदेश कन्या व विदर्भाच्या स्नुषा असलेल्या प्रतिभाताई सध्या राजस्थानच्या राज्यपाल आहेत. शांत व विनयशील स्वभाव हा प्रतिभाताईंच्या व्यक्तिमत्त्वाचा गुणविशेष. प्रतिभाताईंचे वडील (कै.) नारायणसिंह ऊर्फ नानासाहेब पाटील जळगावमधील नामवंत विधिज्ञ होते. वयाच्या बाराव्या वर्षी प्रतिभाताई मातृप्रेमाला पारख्या झाल्या. त्यानंतर मावशीने त्यांचा सांभाळ केला. प्रतिभाताईंचे शालेय शिक्षण जळगाव येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये (हल्लीचे आर. आर. विद्यालय), तर महाविद्यालयीन शिक्षण मूळजी जेठा महाविद्यालयात झाले. त्यांचे थोरले काका रावसाहेब दिवाण बहादूर डोंगरसिंग पाटील हे स्वातंत्र्यपूर्व काळात लेजिस्लेचर कौन्सिलचे सतत बारा वर्षे सदस्य होते. त्या अर्थशास्त्र व राज्यशास्त्र हे विषय घेऊन एम. ए. झाल्या. विद्यार्थिदशेत त्यांनी केवळ अभ्यासावर भर न देता खेळाडूवृत्ती जोपासली. महाविद्यालयीन जीवनात त्यांनी टेबल-टेनिस विजेत्या म्हणून नाव कमावले होते. एवढेच नव्हे, तर आंतरमहाविद्यालयीन सामन्यांतही त्यांनी अजिंक्‍यपद प्राप्त केले होते. प्रतिभाताईंनी १९६२ मध्ये जळगाव मतदारसंघातून प्रथमच प्रचंड मताधिक्‍याने निवडणूक जिंकली, त्या वेळी त्यांचे वय २५ वर्षे होते. आमदार असतानाच त्यांनी १९६५ मध्ये एल. एल. बी.ची पदवी मिळविली होती. आमदार झाल्यानंतर त्यांचा विवाह सात जुलै १९६५ रोजी डॉ. देवीसिंह शेखावत यांच्याशी झाला. श्री. शेखावत उदारमतवादी असल्याने पत्नीला त्यांनी राजकारणात केवळ सहकार्यच केले नाही, तर प्रोत्साहनही दिले. जळगावचे प्रतिनिधित्व केल्यानंतर पुढील निवडणुकीत त्यांनी एदलाबाद (आताचा मुक्ताईनगर) मतदारसंघ निवडला व त्या प्रचंड मतांनी निवडून गेल्या. त्या सतत पाच वेळा विधानसभेवर निवडून आल्या. त्यांनी १९६७ पासून १९७७ पर्यंत सतत दहा वर्षे मंत्रिपद भूषविले. अनेक खाती सांभाळून त्यांनी महाराष्ट्रात उत्कृष्ट कार्य केले. "पुलोद' सरकारच्या काळात त्यांनी विरोधी पक्षनेतेपद यशस्वीरीत्या भूषविले. प्रतिभाताईंची कार्यपद्धती व कॉंग्रेसबद्दलची ध्येयनिष्ठा लक्षात घेऊन त्या वेळचे पंतप्रधान राजीव गांधी यांनी त्यांची राज्यसभेच्या उपाध्यक्षपदी निवड केली. हे जळगाव जिल्ह्यालाच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राला भूषणावह होते. राजकारणाबरोबरच अंध विद्यार्थ्यांसाठी शिक्षण संस्था; तसेच जळगावमधील अभियांत्रिकी महाविद्यालय हे त्यांच्या शैक्षणिक कार्याचे मानबिंदू ठरले आहेत.

4 comments:

Yogesh said...

सही :))

Parag said...

>>>>She hails from Rajasthan and was born in a Rajput family and later married to a Maratha.

He ulata ahe I think. She is born as Maharashtrian and later on married to Rajasthani. Can you please confim?

xetropulsar said...

She doesnt hail from Rajastan....shes from Maharashtra...

Read this

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/2123747.cms

कृपया दुरुस्ती करावी.

HAREKRISHNAJI said...

Dear Parag and Xetropulsar,

You are right. Thanx for the correction, I had downloaded the info from weikepedia.