Saturday, June 02, 2007

आज मेरे पास बंगला है, गाडी है, दौलत है और मा (धरती मा ) भी है

बलराज सहानींचा "दो बिघा" हा काळजाला घरे पाडणारा चित्रपट आज आठवला, कारण काय तर तिन बिघा. उत्तर प्रदेशातील न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे सुपरस्टार अमिताभ बच्चन यांना पुणे जिल्ह्यात खरेदी केलेल्या जमिनीवरही पाणी सोडावे लागण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. पवना धरणालगतच्या पाले गावामध्ये अमिताभ बच्चन यांनी एकूण वीस एकर जागा खरेदी केली होती.शेतकरी नसणाऱ्या कोणालाही शेतजमीन खरेदी करता येत नाही, हा त्यातील प्रमुख आक्षेप होता. ........- सकाळ
पवनाकाठचा धोंडी" ही गो.नी.दा. ची कादंबरी याद असेलच. काळ बदलला, आधुनीक काळात धोंडीची जागा बिग बी घेतली, गंगामैयाकी कसम, मै पहलेसे ही खानदानी किसान ही हूं ! वैसे देखा जाये तो वो दौलतपुर आहेना यु. पी. त, आपला जिलाहा बाराबंकी, हा बराबर, आमी मुळचे तेथेलेच, पोटापाण्याच्या मागे मागे लागुन फिरत फिरत येथे आलो , काय पण ही जागा आहे, हा पवना लेक, यो तिकोना, पल्याड तुंगी, , तबीयत खुश झाली, आता कुठेच जायचे नाही, झाली भटकंती ती बास तेवढीच. आता येथेच डेरा टाकायचा, या लाल, तांबडया मातीत कष्ट करुन, घाम गाळुन शेती करायची, चार पैसे कमवायचे, मुलाबाळांची सोय करायची, विचार आता पक्काच. मित्रांनी अलीशान मोटारगाडया भेट दिल्याच आहेत, मुंबई- लोनावळातर आता तासाभरावर, पहाटे उठावे, शेतावर जावे, ढवळ्यापवळ्याची जोडी नांगराला जुंपावी की जमीन नांगरता नांगरता, मुलाने पाठोपाठ त्यात बियाणे पेरीत यावे, बायकोनी मस्त पैकी भजन म्हणावे " आधी बीज येकले, अंकुरले, आधी बीज येकले ", दुपार व्हावी , नव्या सुनबाईंनी झुणका, भाकर, मिरचीचा ठेचा, मटकेका दह्याचा फक्क्ड बेत आखत, शेतावर जेवण घेवुन यावे, बांधावरी आम के पेड के नीचे बसुन खाना हाणावा, दुपारला मस्त पैकी ताणुन द्यायचे.
पडद्यावर नव्हे तर प्रत्यक्षात हे द्रुश्य, सुरक्षारक्षकानी सांगीतल्या प्रमाणे कुंपणापलीकडे उभे राहुन, आपल्या वडिलोपार्जित जमीनीचा कित्येक वर्षे सांभाळलेला तुकडा, परस्पर विकला गेल्याचे दुःख आणि चिंता चेहऱ्यावर उमटवत , याच मातीत गाडल्या गेलेल्या कुलदैवताला, देवीला गाऱ्हाणे घालत , मुळचा खराखुरा शेतकरी हताश होत पहात असेल.
संदर्भ - बातमी, लोकसता, १५/०५/०७

No comments: