Monday, June 11, 2007

भाषणे भाषणे व भाषणे

कोणत्याही समारंभात भाषणे ऐकायची म्हटले की माझ्या पोटात भलामोठा गोळा येतो. एकदा का माईक हातात आला की बोलणाऱ्याला आपण किती वेळ बोलावे, काय काय बोलावे आणि का बोलावे याचे भान रहात नाही.

शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. आधी सत्कार वगरै असावा, नक्की लक्षात नाही, प्रमुख पाहुणे म्हणुन तत्कालीन ब्रु.म.न.पा. आयुक्त श्री. शरद काळे होते. ते भाषण करायला उभे राहिले. भाषण सुरु झाले. " आपण व कलावंत यांच्या मधे मी येवु इच्छीत नाही. मी सुद्धा गाणे ऐकायला आलो आहे ". झाले भाषण संपले. लगेचच मुख्य कार्यक्रम सुरु झाला. सर्वांनी गाणे मस्त पैकी मजेत ऐकले.

शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. सर्व तरुण कलावंत. एका बुजुर्ग, वयोवृद्ध कलावंताचे भाषण सुरु झाले,(मला कोणाचाही अनादर करायचा नाही,पण आजची तरुण पिढी ही खरच खुप गुणी आहे हे त्यांनी लक्षात ठेवायला हवे होते ) आमच्या वेळी कसे होते, आता काय ही भीषण परीस्थिती आली आहे, तरुण कलांवंतावर तोंडसुख घेवुन झाले, उपदेशाचे मार्गदर्शनापर बोल ही सुनावुन झाले. गाणे म्हणजे काय, कसे असावे, ही पिढी किती बेजबाबदार आहे, नुसती पळाते आहे, वगैरे वगैरे. वरती मी या विषयावर एके ठिकाणी तीन तास बोललो होते (पोटात गोळेच गोळे ) हे पण सांगुन झाले. कार्यक्रमातील मजाच निघुन गेली.

प्रसंग तिसरा. प्रमुख पाहुण्यांकडे खरच जास्त वेळ नव्हता, वेळात वेळ काढुन ते केवळ कबुल केले होते म्हणुन ते अती महत्वाच्या कार्यक्रमामधुन मधुनच आले होते. परत जाण्याची खरच निकड होती आणि हे सर्वांनाच माहीती होते, सांगुनही झाले होते, पण प्रत्येकालाच आपले विचार मांडण्याची संधी दडवायची नव्हती. शेवटी मुख्य कार्यक्रम घाईघाईने आटोपता घ्यावा लागला.

1 comment:

प्रशांत said...

खरंय तुमचं म्हणणं. हल्ली भाषणबाजी आणि प्रमुख पाहुण्यांची सरबराई इत्यादि गोष्टींचा अतिरेक झाल्यामुळे मुख्य कार्यक्रमाचा बेरंग झाल्याची अनेक उदाहरणं आहेत. त्यात "प्रायोजक" हा घटकही भर घालतो हे दुर्दैव!
-प्रशांत